Sunday , July 26 2026
Breaking News

न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून बायपास रद्द व्हावा, शेतकरी संघटनेची मागणी

Spread the love

 

बेळगाव : हलगा-मच्छे बायपासचे अनधिकृतरित्या काम सुरू असल्याचा आरोप शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे.
बायपासचे काम सुपिक जमिनीतून करण्यात येत असून शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याचेही शेतकरी सांगत आहेत. सदर कामाचा खटला न्यायप्रविष्ट आहे. तरीही बायपासचे काम बेकायदेशीरपणे सुरूच आहे. ते तात्काळ थांबवून न्यायालयाच्या निकालापर्यंत काम थांबवून तो रद्द व्हावा, अशी मागणी वडगाव शेतकरी संघटनेच्यावतीने करण्यात आली.
या मागणीचे निवेदन श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष रमाकांत कोंडूसकर यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. हलगा-मच्छे बायपास करताना हा रस्ता सुपिक जमिनीतून करण्यात येत आहे. यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनीवर गदा येत असून त्यांच्या उपजीविकेचा प्रश्न ऐरणीवर येत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. तसेच या कामामुळे शेतकऱ्यांना समस्या येत आहे. सदर प्रकरण न्यायप्रविष्ट असूनही काम होत असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत, असेही शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सांगितले.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *