Sunday , July 26 2026
Breaking News

बेळगावकरांनी श्री स्वामी समर्थांच्या पालखी पादुकांच्या दर्शनाचा लाभ घ्यावा; अभय खोबरे यांचे आवाहन

Spread the love

 

बेळगाव : श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुकांच्या परिक्रमेचे आयोजन करण्यात येत असते. पालखी पादुकांच्या परिक्रमेचे हे २९ वे वर्षे आहे. महाराष्ट्रात परिभ्रमण करीत ही परिक्रमा बेळगाव शहरात विविध ठिकाणी १९ ते २६ जानेवारी पर्यंत मुक्कामी राहणार आहे.
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाची आस असतानाही असंख्य स्वामीभक्त, अबालवृद्ध, महिला यांना अक्कलकोट येथे स्वामींच्या दर्शनाला जाता येत नाही. अशांना दर्शन देण्यासाठी व त्यांची सेवा घेण्यासाठी श्री स्वामीच त्यांच्या गावी येतं असतात. श्रीस्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट न्यासाच्या वतीने श्री स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुकांच्या परिक्रमेचे अक्कलकोट येथून १६ नोव्हेंबरला प्रस्थान झाले आहे. महाराष्ट्रातील विविध शहरे आणि गावांना भेट देत, श्री स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुकांच्या परिक्रमेचे बेळगावात २० जानेवारीला आगमन होणार आहे. २५ जानेवारी पर्यंत परिक्रमेचा मुक्काम बेळगाव शहरात विविध ठिकाणी राहणार आहे. श्री स्वामी समर्थांच्या पालखी आणि पादुका दर्शनाचा बेळगाव परिसरातील भक्तांनी लाभ घ्यावा असे आवाहन श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळ अक्कलकोट उपाध्यक्ष अभय खोबरे यांनी केले आहे.

About Belgaum Varta

Check Also

राकसकोप तुडुंब भरण्याच्या उंबरठ्यावर; आता अवघ्या साडेचार फुटांची प्रतीक्षा!

Spread the love  वेस्ट वेअरवरून पाणी वाहू लागले; जुनी २४७० फूट पातळी गाठली बेळगाव : …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *