नवी दिल्ली : नवी दिल्ली येथील इंदिरा भवन येथे आयोजित ओबीसी काँग्रेस महिला राष्ट्रीय अधिवेशनाचे उद्घाटन विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या हस्ते पार पडले. या अधिवेशनास देशभरातून अनेक महिला प्रतिनिधींनी आपला सहभाग नोंदविला. या अधिवेशनादरम्यान खानापूरच्या माजी आमदार, एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी देखील सहभाग घेतला होता. …
Read More »नारीशक्तीत देश चालवण्याची ताकद; महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा
खानापूर : नारीशक्ती ही फार मोठी शक्ती असून महिला तालुका, जिल्हा तसेच देशही सक्षमपणे चालवू शकते, हे आपण अनेकदा पाहिले आहे. त्यामुळे महिलांचा सन्मान आणि सशक्तीकरणासाठी महिला दिन साजरा केला जातो, असे मत पंचहमी योजनेचे तालुका अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी यांनी व्यक्त केले. खानापूर तालुका पंचहमी योजना समितीच्या वतीने मंगळवारी …
Read More »खानापूर आगाराला ‘शक्ती’ योजनेतून १.७२ कोटी : पंचहमी हमी योजना बैठकीत विविध योजनांचा आढावा
खानापूर : तालुका पंचहमी हमी योजनांची मासिक बैठक शनिवारी (ता. ७) तालुका पंचायत सभागृहात झाली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी तालुका पंचहमी योजनेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी होते. यावेळी पंचहमी योजनांच्या विविध विभागीय अधिकाऱ्यांकडून योजनांच्या अंमलबजावणीचा आढावा घेण्यात आला. शक्ती योजनेबाबत खानापूर आगाराचे नियंत्रक दुर्गाई यांनी सांगितले की, जानेवारी महिन्यात शक्ती योजनेंतर्गत ६,०६,६३२ …
Read More »खानापूर तालुक्यातील माचाळी येथे अस्वलाच्या हल्ल्यात शेतकरी जखमी; सुदैवाने प्राणहानी टळली
खानापूर : खानापूर तालुक्यातील माचाळी येथे आज सकाळी सुमारे सात वाजण्याच्या सुमारास गावातील नागरिक बाबल खंडेकर यांच्यावर अस्वलाने हल्ला केल्याची घटना घडली. या हल्ल्यात त्यांना काही दुखापत झाली असली तरी सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. मिळालेल्या माहितीनुसार, बाबल खंडेकर हे सकाळच्या वेळी जंगल परिसरात गेले असताना अचानक समोर आलेल्या अस्वलाने …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना सदिच्छा समारंभ उत्साहात पार पडला. कार्यक्रम श्री. रायाप्पा कालमनकर यांच्या अध्यक्षतेखाली झाला. कार्यक्रमाची सुरुवात विद्यार्थिनींच्या ईशस्तवन व स्वागत गीताने झाली. यानंतर सन्माननीय व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते कार्यक्रमाचे दीप प्रज्वलन करण्यात आले व श्री. जोतिबा नावलकर व मुख्याध्यापक सी एस कदम …
Read More »रंगपंचमीच्या दिवशी मलप्रभा नदीत बुडून तरुणाचा मृत्यू
खानापूर : रंगपंचमीच्या दिवशी खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी घाटाजवळ एक दुर्दैवी घटना घडली असून गर्लगुंजी येथील एका तरुणाचा नदीत बुडाल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून सणाच्या आनंदावर विरजण पडले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गर्लगुंजी येथील संतोष सातेरी बिर्जे (वय 24 वर्षे) हा तरुण …
Read More »डॉ. अंजलीताई निंबाळकर या समाजकारण, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी नेत्या
नेत्या डॉ. अंजलीताई यांना खानापूर तालुका ब्लॉक कॉंग्रेसतर्फे महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा खानापूरच्या माजी आमदार तथा एआयसीसी सचिव व प्रख्यात स्रीरोगतज्ञ डॉ. अंजलीताई हेमंत निंबाळकर या समाजकारण, शिक्षण आणि महिलांच्या सक्षमीकरणासाठी कार्य करणाऱ्या प्रेरणादायी नेत्या आहेत. त्यांनी राजकारणाला केवळ सत्तेचे साधन न मानता समाजपरिवर्तनाचे माध्यम बनवले. खानापूर मतदारसंघाचे …
Read More »तोपिनकट्टी येथील श्री महालक्ष्मी हायस्कूलच्या दहावी विद्यार्थ्यांचा सदिच्छा (निरोप) समारंभ
खानापूर : आज दिनांक 07 मार्च 2026, श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे दहावीच्या विद्यार्थ्यांचा 2025-2026 बॅच सदिच्छा (निरोप) समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. भैरु य. शहापूरकर हे होते, तर प्रमुख वक्ते म्हणून मा. वाय. एन. पाटील यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक पि. …
Read More »नंदगड जेसीएस मराठी शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन उत्साहात साजरा
हलशी : नंदगड येथील जेसीएस मराठी मुला-मुलींच्या शाळेत आंतरराष्ट्रीय महिला दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या निमित्ताने दोन्ही शाळांमधील शिक्षिका व महिला कर्मचाऱ्यांचा विद्यार्थिनींच्या हस्ते शाल व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. कार्यक्रमात महिलांच्या सक्षमीकरणाचा संदेश देत स्त्री शिक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थिनींकडून उपस्थित महिला …
Read More »खानापूर तालुक्यातील कोंगळा परिसरात हत्तीचा उच्छाद; मोठे नुकसान
खानापूर : खानापूर तालुक्यातील भीमगड अभयारण्य परिसरातील कोंगळा गावात गुरुवारी (ता.५) हत्तीने शेतात घुसून केळी तसेच उन्हाळी वायंगणी भात पिकांची मोठ्या प्रमाणावर नासधूस केल्याची घटना घडली. या घटनेत शेतकरी जयवंत गावकर यांच्या शेतातील पिकांचे सुमारे ५० हजार रुपयांहून अधिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta