Sunday , December 14 2025
Breaking News

खानापूर

सिंगीनकोप, गर्लगुंजी भागात वीट व्यवसायाला प्रारंभ

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका हा वीट व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. खानापूर तालुक्यातील वीट बांधकामासाठी प्रसिद्ध आहे. त्यामुळे याभागातील गर्लगुंजी, इदलहोंड, सिंगीनकोप, गणेबैल, अंकलेसह नंदगड, हेब्बाळ, शिवोली, चापगाव अशा विविध भागात वीट व्यवसाय मोठ्याप्रमाणात चालतो. यासाठी डिसेंबर ते एप्रिलपर्यंत वीट व्यवसाय केला जातो. परंतु यंदा अवकळी पाऊस डिसेंबरपर्यंत झाला. त्यामुळे जमिनीत …

Read More »

हलशीत भाताच्या गंजीला आग, ३० पोती भाताचे नुकसान

खानापूर (प्रतिनिधी) : हलशीतील (ता. खानापूर) गावचा सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात शुक्रवारी दि. ३१ डिसेंबर रोजी मध्य रात्री अज्ञातानी भाताच्या गंजीला आग लावल्याची घटना घडली. याबाबत घटना स्थळावरून मिळालेली माहिती अशी की, हलशी (ता. खानापूर) येथील शेतकरी नामदेव सोमू गुरव यांच्या सर्वे नंबर ३/१ मधील कक्केरी शेतात साठून ठेवलेल्या …

Read More »

ताराराणी हायस्कूलमध्ये पालक मेळावा संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर येथील ताराराणी हायस्कूलमध्ये बालक-पालक व शिक्षकांची जागर सभा संपन्न झाली. यावेळी बोलताना प्रमुख वक्ते प्रा. अरविंद पाटील यांनी पालकत्वाची व्याप्ती आणि जबाबदारी समजावून देताना अनेक संदर्भ जोडून पालकत्व किती छान असते? याबद्दल आपल्या शैलीत समजावून देण्याचा प्रयत्न केला. कालचा पालक आणि संगणक, मोबाईल आणि इंटरनेट जमान्यातील …

Read More »

बैलाच्या हल्ल्यात तिवोलीचा शेतकरी गंभीर जखमी

खानापूर (प्रतिनिधी) : तिवोलीतील (ता.खानापूर) गावचा शेतकरी दिनकर लाटगावकर (महाराज) यांना गुरूवार दि. ३० डिसेंबर रोजी दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास बैलाने पायाला शिंगाने गंभीर जखमी केले असुन रक्त प्रवाह जास्त प्रमाणात झाला. याची माहिती माजी आमदार व डीसीसी बँक संचालक अरविंद पाटील व भाजपा युवा नेते पंडित ओगले यांना देण्यात …

Read More »

निडगलजवळ वाहनाच्या धडकेने गाईचा मृत्यू

खानापूर (वार्ता) : निडगल (ता. खानापूर) येथील गावच्या नाल्याजवळ बुधवारी दि. 29 रोजी सायंकाळी वाहनाची धडक बसून गाईचा मृत्यू झाल्याची घटना घडली. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, निडगल गावाजवळील नाल्याजवळ गर्लगुंजीहून खानापूरकडे जाणार्‍या ईको मारूती व्हॅनने निडगल गावचा शेतकरी श्रीकांत पाटील यांच्या गाईल जोराची धडक दिल्याने गाय बाजुच्या खड्ड्यात …

Read More »

दुर्गमभागातील जांबोटी कन्नड शाळेला शिक्षण मंत्र्यांची भेट

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुका हा अतिदुर्गम व मागासलेला तालुका म्हणून परिचित आहे. कर्नाटक राज्यातील सर्वात मागासलेला शिक्षणाच्या सोयीपासून वंचित राहिलेला तालुका म्हणजे खानापूर तालुका अशी ओळख आहे. नुकताच बेळगावात झालेल्या अधिवेशनासाठी आलेल्या शिक्षण मंत्री बी. सी. नागेश यांनी खानापूर तालुक्यातील मागासलेल्या दुर्गमभागातील शाळांचा दौरा करताना जांबोटी येथील मराठी प्राथमिक …

Read More »

मास्केनट्टीत तलावात पडून मृत्यू झालेल्या युवकाच्या कुटुंबाचे डॉ. सरनोबत यांच्याकडून सांत्वन

खानापूर (वार्ता) : खानापूर तालुक्यातील भुरूनकी ग्राम पंचायत हद्दीतील मास्केनट्टीतील जाणू विठ्ठल जंगले (वय 22) याचा रविवारी दि. 19 रोजी गावापासून जवळ असलेल्या अमृत गावडा तळ्यात पडून मृत्यू झाला. ही बातमी समजताच खानापूर तालुका भाजपा प्रभारी डॉ. सोनाली सरनोबत यांनी मास्केनट्टीतील जंगले कुटुंबाची भेट घेऊन सांत्वन केले. तसेच नियती फाऊंडेशनच्या …

Read More »

तिवोलीच्या युवकाचा अपघातात मृत्यू

खानापूर (वार्ता) : तिवोली (ता. खानापूर) येथील युवकाचा खानापूर-जांबोटी रस्त्यावरील शुभम गार्डनजवळ ओमीनी व स्कूटी याची समोरासमोर जोराची धडक बसल्याने स्कूटी चालक राजू पिटर सोज (वय 34) याचा मृत्यू झाला. याबाबत खानापूर पोलीस स्थानकातून मिळालेली माहिती अशी की, तिवोली (ता. खानापूर) युवक राजू पिटर सोज हा गोव्यात नोकरीला होता. बुधवारी …

Read More »

हलशी येथे बसवाण्णा महाराजांच्या फोटोची विटंबना

खानापूर (वार्ता) : बेळगाव : कर्नाटकाची राजधानी बेंगळूरातील छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आणि अनगोळातील वीर संगोळ्ळी रायण्णा यांचा पुतळा विटंबनेवरून निर्माण झालेले तणावपूर्ण वातावरण हळूहळू थंड होत असतानाच खानापूरात जगज्योती बसवेश्वरांच्या फोटोची आणि लाल-पिवळ्या ध्वजाची समाजकंटकांनी विटंबना केल्याची घटना घडली आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील ऐतिहासिक हलशी गावात लाल-पिवळा जाळून …

Read More »

हेब्बाळच्या डॅममध्ये पडून महिलेचा मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : हेब्बाळ (ता. खानापूर) गावची मुलगी व गणेबैल गावची सुन श्रीमती लक्ष्मी मल्हारी गेजपतकर (वय 34) हिचा हेब्बाळच्या डॅममध्ये पडून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी दि. 20 रोजी घडली. हेब्बाळ येथील मारूती कल्लापा गुरव यांची कन्या असून तिचे सासर गणेबैल आहे. तिच्या पश्चात पती, एक मुलगा, एक मुलगी असा …

Read More »