Tuesday , September 17 2024
Breaking News

निपाणी

सीमाप्रश्न तज्ञ समिती अध्यक्ष धैर्यशील माने यांची निपाणी तालुका समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली भेट

  निपाणी : हातकणंगले लोकसभा मतदार संघातून निवडून आलेले नवनिर्वाचित खासदार व सीमाप्रश्न तज्ञ समितीचे अध्यक्ष श्री. धैर्यशील माने यांची तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी पदाधिकाऱ्यांनी भेट घेतली व सुरवातीला समस्त सीमाभाग मराठी भाषिक जनतेच्या वतीने खासदार माने यांचे खासदारपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व सीमा महाचिंतन शिबिर महामंथन शिबिर आयोजित …

Read More »

युवकांनी शेंद्रीय शेतीकडे वळावे : कृषी पर्यवेक्षक प्रमोद शिंगे

  एम. डी. विद्यालयात कृषी सप्ताह निपाणी (वार्ता) : ‘ॲग्रीकल्चर’ हेच आपले ‘कल्चर आहे’. ते आपण जपले पाहिजे. लोकांनी शेतकऱ्यांना मानसन्मान द्यावा. सुशिक्षित तरुणांनी शेती व्यवसायाकडे वळून सेंद्रीय शेतीच्या माध्यमातून विविध नवप्रयोग करावेत. कडधान्ये, औषधी वनस्पती लागवड करावी. फुलोत्पादन, फलोत्पादन, पशुपालन, कुक्कुटपालन, मत्स्यपालन, भाजीपाला व फळ प्रक्रिया जोड व्यवसायांच्या माध्यमातून …

Read More »

ग्रामस्थांनी एनएसएस शिबिराचा लाभ घ्यावा

  ग्रामपंचायत अध्यक्ष धनाजी पाटील; चिखलव्हाळमध्ये एनएसएस शिबिराचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : एनएसएस शिबिरांमुळे युवकांच्यात कार्य करण्याचा उत्साह वाढतो. वेगवेगळ्या सामाजिक कार्यात स्वतःला झोकून दिल्यावर समाजसेवा करण्याची आवड निर्माण होते. याशिवाय समाजात वेगळ्या प्रकारचे जनजागृतीही राष्ट्रीय सेवा योजना करत असते. याचा चिखलव्हाळ गावातील नागरिक आणि शिबिरार्थीनी लाभ घ्यावा, असे आवाहन …

Read More »

महिलावरील अन्यायाबाबत तक्रार नोंदवा

  उपनिरीक्षिका उमादेवी; महिला मुलींसाठी आपत्कालीन माहिती निपाणी(वार्ता) : महिला व मुलींनी कुणल्याही प्रकारचा अन्याय सहन करून घेऊ नये. कोणावरही अन्याय होत असल्यास पोलीस प्रशासनाची मदत घेऊन आरोपींना कठोर शिक्षा देण्यासाठी प्रयत्न करायला हवे. महिलांनी घर सांभाळत समाज आणि राष्ट्राची जबाबदारी घेतली पाहिजे. यासाठी आमच्याकडून आपल्याला सर्व सहकार्य मिळेल, अशी …

Read More »

निपाणी तालुका म. ए. समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली शिवाजी विद्यापीठचे व्ही. एन. शिंदे यांची भेट

  निपाणी : निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूरचे मुख्य सचिव रजिस्टर डॉक्टर व्ही. एन. शिंदे यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी विविध विषयांवर सविस्तर चर्चा झाली. शिवाजी विद्यापीठाने सीमाभागातील 865 गावातील सर्वसामान्य गरीब, कष्टकरी, शेतकरी मुलांना उच्च शिक्षण घेता यावे यासाठी एमबीए, बीसीए, एमसीए, बीएड यासारखे उच्च …

Read More »

माणकापूरमध्ये यंत्रमागधारकावर चाकूने हल्ला

  निपाणी (वार्ता) : माणकापूर येथे गुरुवारी (ता.४) पहाटे एका व्यक्तीने यंत्रमागधारकावर चाकू हल्ला केला. सागर कुंभार असे जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर मनोहर कोरवी असे संशयित हल्लेखोराचे नाव आहे. जखमी कुंभार यांना चिक्कोडी येथील हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. संशयिताने यापूर्वी माणकापूर ग्रामपंचायत मधील महिला कर्मचाऱ्यांना शिवीगाळ …

Read More »

नूतन मराठी विद्यालयात शालेय संसद निवडणूक

  निपाणी (वार्ता) : येथील शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयात सन २०२४-२५ शैक्षणिक वर्षासाठी वर्ग प्रतिनिधी, विद्यार्थिनी प्रतिनिधी तसेच शालेय प्रतिनिधींची निवड सार्वत्रिक निवडणुकीच्या माध्यमातून करण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांनी निवडणूक प्रक्रिया आधुनिक पद्धतीची ईव्हीएम मशीनच्या सहाय्याने पार पाडली. नूतन मराठी विद्यालयाच्या प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांच्याकडे विद्यार्थ्यांनी अर्ज …

Read More »

जी. आय. बागेवाडी कॉलेजचे चिखलव्हाळमध्ये बुधवारपासून विशेष श्रमसंस्कार शिबिर

  निपाणी (वार्ता) : बेळगाव येथील राणी चन्नम्मा विद्यापीठ आणि केएलई संस्थेच्या जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाच्या एनएसएस विभागातर्फे डॉ. श्रीपती रायमाने यांच्या नेतृत्वाखाली बुधवारपासून (ता.३) चिखलव्हाळमध्ये विशेष श्रमसंस्कार शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिर काळात शाळा मैदानाचे सपाटीकरण व स्वच्छता, ग्रामीण शौचालय, बेरोजगारी आणि स्वयंसेवकांद्वारे साक्षरता सर्वेक्षण करण्यात येणार आहे. …

Read More »

आमदार सतेज पाटील यांच्याकडून पाटील कुटुंबियांचे सांत्वन

  निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, कोल्हापूरचे आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांनी बोरगाव येथे भेट देऊन रावसाहेब पाटील कुटुंबियांचे सांत्वन केले. आमदार बंटी पाटील यांनी, रावसाहेब पाटील हे अत्यंत संघर्षमय जीवन जगले. त्यातून आलेल्या अनुभवातून सहकार, सामाजिक, धार्मिक व राजकीय क्षेत्रात यश मिळवले. कोणत्याही पदाची अपेक्षा न …

Read More »

काळम्मावाडी दुर्घटनेतील दोन्ही मृतदेहावर अंत्यसंस्कार

  कुटुंबीयांनी फोडला हंबरडा ; नागरिकांची गर्दी निपाणी (वार्ता) : वर्ग मित्रासमवेत काळम्मावाडी धरण क्षेत्रामध्ये पर्यटनासाठी गेलेल्या निपाणी येथील दोन तरुणांचे पाण्यात बुडालेले मृतदेह मंगळवारी (ता.२) सकाळी एनडीआरएफ तुकडीच्या जवानांनी शोधून काढले. प्रतीक प्रकाश पाटील (वय २२) आणि गणेश चंद्रकांत कदम (वय १८ दोघेही रा.आंदोलननगर, निपाणी) अशी मृत झालेल्या युवकांची …

Read More »