Monday , December 23 2024
Breaking News

कर्नाटक

योगा, प्राणायामचे धडे महालक्ष्मी कोविड सेंटरमध्ये

खानापूर (प्रतिनिधी) : योगा, प्राणायामचे धडे आता खानापूर शहरातील शांतिनिकेतन स्कूलमध्ये श्री महालक्ष्मी सांसर्गिक रोग व आपत्ती निवारण समिती यांच्यावतीने सुरू करण्यात आलेल्या श्री महालक्ष्मी कोविड केअर सेंटरमध्ये खानापूर पतंजली योग समितीच्यावतीने नुकताच पार पडले. या प्रशिक्षणाचे धडे योग समितीचे योग शिक्षक अरविंद कुलकर्णी व आकाश अथणीकर यांनी यावेळी रूग्णाना …

Read More »

ऑनलाईन, ऑफलाईन अध्ययन मार्गसूची जाहीर; एक जुलैपासून शैक्षणिक वर्षारंभ

बंगळूरू : सध्याचे शैक्षणिक वर्ष (२०२१-२२) १ जुलैपासून सुरू होणार असून सार्वजनिक शिक्षण विभागाने पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी भौतिक (फिजीकल) वर्गाऐवजी ऑनलाईन व ऑफलाईनमध्ये अभ्यासक्रम शिकविणार्‍या नवीन मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.मागील वर्षाप्रमाणे, १६६२ व्हिडिओ पाठ संवेदना कार्यक्रमांतर्गत चंदन वाहीनीवर शिकविले जातील. एफएम रेडिओवरही ऑडिओ धड्यांचे प्रसारण होईल.पहिली ते दहावीच्या …

Read More »

अनाथ श्रीशैल करतोय  भिक्षुकांची अन्नदान सेवा!

भेलगाड्याचा व्यवसायही बंद : भाड्याच्या घरात कुटुंबाचा उदरनिर्वाह निपाणी (संजय सूर्यवंशी) : गतवर्षीपासून सुरू झालेल्या कोरोना संसर्गामुळे सर्वच व्यवसायावर मोठा परिणाम झाला आहे. शिवाय हातावर पोट असणाऱ्या कुटुंबियांची मोठी वाताहात झाली आहे. त्यामुळे अनाथ असलेल्या श्रीशैल स्वामी यांचा भेळचा गाडा ही बंद झाला. स्वतःच्या कुटुंबाचे जेवणाचे अडचण असताना तरीही भाड्याच्या …

Read More »

बोरगाव येथे दिव्यांगांना लसीकरण

निपाणी : बोरगाव कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा अनेकांना फटका बसला. ही लाट ओसरावी यासाठी महिला व बाल विकासमंत्री शशिकला जोल्ले, खासदार अण्णासाहेब जोल्ले यांच्याकडून निपाणी मतदारसंघात ४ ठिकाणी कोविड केअर सेंटर सुरु करण्यात आले आहेत. शिवाय इतर सोयी सुविधा पुरवित नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रयत्न करीत असल्याचे ग्रामीण भाजप अध्यक्ष पवन पाटील यांनी …

Read More »

कोविड लससाठी खानापूर तालुका राज्य सरकारी नोकर संघाच्यावतीने निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : कोविड लस देण्यासंदर्भात कर्नाटक राज्य सरकारी नोकर संघ खानापूर तालुका संघटनेच्यावतीने तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे याना गुरूवारी दि. १० रोजी निवेदन देण्यात आले.निवेदनात म्हटले आहे. की, सरकारी नोकरासाठी व त्यांच्या कुटुंबांसाठी खास कोविड लसीचे कॅप पुढील आठवड्यात आयोजन करण्यात यावे.यावेळी तालुका वैद्याधिकारी डॉ. संजीव नांद्रे यानी …

Read More »

रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी ग्राम पंचायतीच्यावतीने होणार रोप लागवड

खानापूर (प्रतिनिधी) : सरकारच्या रोहयो योजनेअंतर्गत भुरूनकी (ता. खानापूर) ग्राम पंचायतीच्या हद्दीत हजारो रोपाची लागवड करण्यासाठी खड्डे काढण्याचे काम युध्दपातळीवर सुरू आहे.कोरोनाच्या महामारीमुळे सर्वत्र कामे बंद आहेत. नागररिकांना कामे मिळणे कठीण आहे. तेव्हा भुरूनकी गावाच्या नागरिकांना उद्योग खात्री योजनेअंतर्गत कामे मिळावी यासाठी रोप लागवड योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे.यासाठी …

Read More »

मिराशी वाटरे ग्रामस्थांचे तहसीलदाराना निवेदन

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील मिराशी वाटरे गावच्या नागरिकांनी कचरा डेपो विरोधात तहसीलदाराना निवेदन सादर केले.मिराशी वाटरे सर्वे नंबर ८ मधील गायरानमध्ये मोहिशेत ग्राम पंचायतीच्यावतीने कचरा डेपोचे नियोजन करण्यात येत आहे. याला मिराशी वाटरे ग्रामस्थांचा विरोध असून याठिकाणी कचरा डेपो होऊ देणार नाही, असे निवेदन मिराशी वाटरे ग्रामस्थांनी तहसील कार्यालयावर …

Read More »

सँबो युनियन ऑफ एशियाच्या जनरल सेक्रेटरीपदी रघुनाथ शिंत्रे

निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा : देशभरातून एकमेव निवड निपाणी : सँबो युनियन ऑफ एशियाची बैठक ताश्कंद येथे पार पडली. त्यामध्ये युनियनच्या जनरल सेक्रेटरीपदी निपाणी येथील मेस्त्री गल्लीतील रहिवासी रघुनाथ शिंत्रे यांची संपूर्ण भारतातून एकमेव निवड झाली आहे. त्यामुळे निपाणीच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. केंद्रे हे सध्या गोवा येथे …

Read More »

खानापूर युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण

खानापूर : खानापूर महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्यावतीने तिवोली येथे मास्कचे वितरण करण्यात आले.मास्क वितरणावेळी सीमालढ्यातील जेष्ठ कार्यकर्ते गोपाळ हेब्बाळकर यांनी खानापूर युवा समितीतर्फे सुरू असलेल्या कार्याचे कौतुक केले, तसेच यापुढे खानापूर तालुक्यातील महाराष्ट्र एकीकरण समिती, मराठी भाषिक व युवकांनी एकत्र येत सीमालढ्याला बळकटी द्यावी, असे मत व्यक्त केले.गावातील सर्व नागरिकांना …

Read More »

लोंढ्यात सापडलेल्या बेवारस मृतदेहावर अंत्यसंस्कार

खानापूर (प्रतिनिधी) : लोंढा ता. खानापूर येथे ३ जून रोजी जखमी अवस्थेत सापडलेल्या बेवारस इसमाला खानापूर सरकारी दवाखाण्यात दाखल करण्यात आले. मात्र त्याचा उपचारांती मृत्यू झाला. त्यानंतर इसमाच्या मृत्यूची ओळख पटविण्यासाठी बेळगाव येथील शवगृहात पाठविण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र पोलिसांनी बेवारस मृत्यूदेहाचे अंत्यसंस्कार करण्यासाठी कदंबा फाऊंडेशन संघटनेचे अध्यक्ष जाॅर्डन गोन्साल्विस …

Read More »