Friday , December 12 2025
Breaking News

कर्नाटक

कुस्तीगीर संघटनेच्यावतीने तिर्थकुंडेत पैलवानाचा सत्कार

खानापूर (प्रतिनिधी) : तालुक्यातील कुस्तीगीर संघटनेच्यावतीने कोरोनाच्या महामारीत गेल्या दोन वर्षापासुन कुठेच कुस्तीचा आखाडाच झाला नाही. अशाने कुस्तीपटूनाही अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. कुस्तीपटूना खुराक मिळण्याचीही समस्या निर्माण झाली. आर्थिक संकट आल्याने त्यांना मदत व्हावी. यासाठी खानापूर तालुका कुस्तीगीर संघटनेचावतीने तिर्थकुंडेत (ता. खानापूर) येथे खुराक किट व प्रमाणपत्र देऊन कुस्तीपटूचा …

Read More »

डेंगू, चिकूनगुनिया लसीकरणाला गर्लगुंजीत सुरूवात

खानापूर : यंदाही गर्लगुंजी (ता. खानापूर) येथील मारूती मंदिरात डेंगू चिकूनगुनिया लसीकरण पार पडले. यावेळी ग्राम पंचायत सदस्य आणि सामजिक कार्यकर्ते प्रसाद पाटील यांच्याहस्ते मोहिमेला प्रारंभ झाला. गावातील युवा वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. गेल्या वर्षी आणि यंदा कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून आर्सेनिक अल्बम 300 या गोळ्यांचे वितरण त्यांचबरोबर …

Read More »

नुतन राज्यपाल थावरचंद गहलोत शपथबध्द

बंगळूर : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री थावरचंद गहलोत यांनी रविवारी (ता.११) कर्नाटकचे १९ वे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. मावळते राज्यपाल वजूभाई रुदाभाई वाला यांची ते आता जागा घेतील.कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमुर्ती अभय श्रीनिवास ओका यांनी गेहलोत यांना राजभवन येथे पद व गोपनीयतेची शपथ दिली. यावेळी मावळते …

Read More »

तळावडे शाळेच्या विद्यार्थीनीला केंद्राची शिष्यवृत्ती

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील अतिदुर्गम अशा जंगल भागातील तळावडे येथील सरकारी प्राथमिक मराठी शाळेची विद्यार्थीनी कुमारी अंकिता सलाम हिने केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयातर्फे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल विद्यार्थी योजनेंतर्गत घेण्यात आलेल्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केले. यशामुळे तिला इयत्ता नववी ते बारावी पर्यंतच्या शिक्षणासाठी ४८ हजार रूपयाची शिष्यवृत्ती देण्यात …

Read More »

हंचिनाळ येथे सर्पदंशाने महिलेचा मृत्यू

कोगनोळी : हंचिनाळ येथील पाटील मळ्यातील शेतात उसाचा पाला काढत असताना सापाने  पायाला दंश केल्यामुळे सौ रुपाली अमृत ढाले (वय 32) यांचे शुक्रवारी कोल्हापुरात खाजगी रुग्णालयात निधन झाले.याबाबत घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसारसौ रुपाली ढाले या रोजंदारी करून आपला उदरनिर्वाह चालवत होत्या. नेहमीप्रमाणे येथील गावालगत असलेल्या पाटील मळ्यात श्री. दादासो पाटील यांच्या …

Read More »

हबनहट्टीत लोकसेवा फौंडेशनच्यावतीने वृक्षारोपण उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : हबनहट्टी (ता. खानापूर) व बेळगाव जिल्ह्याचे दक्षिण तीर्थक्षेत्र म्हणून प्रसिद्ध असलेल्या हबनहट्टी येथे मलप्रभा नदीवर वसलेले, पंचक्रोशीतील काशी म्हणून प्रसिद्ध असलेले स्वयंभू मारुती तीर्थक्षेत्रात लोकसेवा फौंडेशन बेळगावचे अध्यक्ष श्री. विरेश बसय्या हिरेमठ यांच्या नेतृत्वाखाली तीर्थक्षेत्र हबनहट्टीच्या परिसरात पिंपळ, वड, बेलपत्र, पेरू, आंबा अशा वृक्षांच्या रोपांची लागवड करण्यात …

Read More »

बिडीत न्यू नवहिंद मल्टीपर्पजच्या शाखेचा वर्धापन दिन उत्साहात

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बिडी येथे येळ्ळूर येथील न्यू नवहिंद मल्टीपर्पज मल्टीस्टेट को-ऑप सोसायटीच्या बिडी शाखेचा 16 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा झाला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून उद्योजक विनोद पाटील, जवळी मेडिकलच्या सौ. प्रतिभा जवळी, न्यू नवहिंद मल्टीपर्पजचे खानापूर डिओ सी. डी. पाटील उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन …

Read More »

काळाचा घाला; देवदर्शनाहून येताना ट्रकला धडक; दोन युवक ठार

चिक्कोडी : भरधाव दुचाकीने ट्रकला मागून जोराची धडक दिल्याने झालेल्या अपघातात बेल्लद बागेवाडी (ता. हुक्केरी) येथील दोघा युवकांचा जागीच मृत्यू झाला. निपाणी-मुधोळ राष्ट्रीय महामार्गाजवळील कब्बूर टोल गेटजवळ शुक्रवारी (ता. 9) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. सिद्धार्थ अशोक खेमलापुरे (वय 26) आणि प्रमोद कऱयाप्पा नाईक (वय 26) अशी मृत …

Read More »

कारची झाडाला धडक हिरेहट्टीहोळी गावच्या युवकाचा अपघाती मृत्यू

खानापूर (प्रतिनिधी) : पारिश्वाड गाववाजवळ स्विप्ट कारची झाडाला जोराची धडक बसल्याने युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रात्री घडली. सदर युवक खानापूर तालुक्यातील हिरेहट्टीहोळी गावचा असून याबाबत पोलिसाकडून मिळालेली माहिती अशी की, हिरेहट्टीहोळी येथील युवक राहुल चंद्रकांत हणबर (वय १९) हा आपल्या मित्रासोबत खानापूरात गाडी रिपेरीसाठी सोडली होती. रिपेरी झाल्यानंतर रात्रीच …

Read More »

खानापूरात रेशन किट वितरणात सावळा गोंधळ

तहसीलदार कार्यालयासमोर धरणे खानापूर : लेबर कार्डधारकांना रेशन कीट देण्याऐवजी इतर लोकांना सरकारकडून आलेले रेशन किट वितरित करीत असल्याचा आरोप करीत सामाजिक कार्यकर्ते राजेंद्र कांबळे बैलुर, कामगारासह यांनी खानापूर येथील तहसीलदार कार्यालयासमोर धरणे धरले होते.या आंदोलनाला खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीतर्फे पाठींबा व्यक्त करण्यात आला व तहसीलदार कार्यालय येथे सुरू …

Read More »