Tuesday , May 26 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर तालुका विकास आघाडीची स्थापना

खानापूर (प्रतिनिधी) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचे औचित्य साधुन खानापूर तालुका विकास आघाडी स्थापना निमित्ताने पत्रकार परिषद खानापूर शहरातील शिवस्मारक येथील सभागृहात पार पडली. बैठकीच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष भरमाणी कल्लापा पाटील होते. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर तालुक्यात परकीयांचे आक्रमण होऊन राजकरण दुषीत झाले आहे. तालुक्यातील सरकारी कार्यालयात भ्रष्टाचार …

Read More »

पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षणसाठी डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांची निवड

निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील समाजसेवी वैद्यकीय सेवा देणारे डॉ. संजय पंत व डॉ.श्रद्धा पंतबाळेकुंद्री यांचे चिरंजीव डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांची पदव्युत्तर वैद्यकीय प्रशिक्षणसाठी ‘ऑल इंडिया कौन्सिलिंग’ मधून पहिल्या फेरीत एम.डी. मेडिसिन प्रशिक्षणसाठी वर्धा (नागपूर) येथे जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवला आहे. डॉ. निखिल पंतबाळेकुंद्री यांचे वैद्यकीय एमबीबीएस शिक्षण …

Read More »

हिजाब ही ईस्लामची अनिवार्य धार्मिक प्रथा नाही; सरकारचा उच्च न्यायालयात युक्तीवाद

बंगळूर : कर्नाटक सरकारने शुक्रवारी कर्नाटक उच्च न्यायालयासमोर असा युक्तिवाद केला, की हिजाब ही इस्लामची अत्यावश्यक धार्मिक प्रथा नाही आणि त्याचा वापर प्रतिबंधित केल्याने धार्मिक स्वातंत्र्याची हमी देणाऱ्या भारतीय संविधानाच्या कलम २५ चे उल्लंघन होत नाही. राज्याचे महाधिवक्ता प्रभुलिंग नावदगी यांनी न्यायमूर्ती अवस्थी, न्यायमूर्ती जे. एम. खाझी आणि न्यायमूर्ती कृष्णा …

Read More »

असोगा रेल्वे गेट बंदच, प्रवाशांचे हाल

खानापूर (प्रतिनिधी) : बेळगाव- लोंढा रेल्वे मार्गाचे दुपदरीकरण काम युध्दपातळीवर सुरू आहे. या रेल्वे मार्गावरील असोगा रेल्वे गेटचे काम गेल्या शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसापासून असोगा रेल्वेगेट बंदच त्यामुळे असोगा परिसरातील मन्सापूर, बाचोळी, कुन्टीनोनगर, त्याचबरोबर मणतुर्गा, नेरसा भागातील नागरिकांचे तसेच दुचाकी वाहनधारकांचे व ट्रक, ट्रॅक्टर आदी वाहनधारकांना …

Read More »

हिजाबला विरोध नाही : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : एसडीव्हीएस शिक्षण संस्था संचलित कला-विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुस्लीम विद्यार्थिनींना हिजाब घालण्यास आम्ही बंदी केलेली नाही. पण वर्गात हिजाब घालण्यास मनाई केल्याचे शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. ते म्हणाले, हिजाब हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याने त्यावर बोलणे इष्ट …

Read More »

बैलूर प्राथ. कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत, गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम संपन्न

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील बैलूर गावच्या प्राथमिक कृषी पत्तीन सोसायटीच्या नुतन इमारत व गोडाऊनचा काॅलम भरणी कार्यक्रम नुकताच पार पडला. या इमारतीसाठी माजी आमदार व डीसीसी बँकेचे संचालक अरविंद पाटील यांनी बेळगांव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या माध्यमातून ३० लाखाचा निधी मंजुर कामाचा शुभारंभ केला. यावेळी माजी आमदार व डीसीसी …

Read More »

खानापूर तालुक्यात २२०६० पोलिओ डोसचे उद्दिष्ट

खानापूर (प्रतिनिधी) : दरवर्षीप्रमाणे आरोग्य खात्याच्यावतीने यंदाही ० ते ५ वर्षाखालील बालकांना पोलिओ डोस रविवार दि. २७ रोजी देण्यात येणार आहे. यामध्ये ग्रामिण भागात तीन दिवस पोलिओ डोस तर शहरात चार दिवस पोलिओ डोस देण्यात येणार आहे. पोलिओ डोसचा शुभारंभ रविवारी दि. २७ रोजी सकाळी आठ वाजता होईल. यावेळी कार्यक्रमाला …

Read More »

सहकार महर्षी बसगौडांची पुण्यतिथी ज्येष्ठांच्या सन्मानाने : ए. बी. पाटील

संकेश्वर (प्रतिनिधी) : कोरोना महामारीमुळे सहकार महर्षी, कर्मयोगी बसगोडा पाटील यांची पहिली आणि दुसरी पुण्यतिथी साधेपणाने आचरणेत आली. तिसरी पुण्यतिथी येत्या रविवार दि. २० फेब्रुवारी २०२२ रोजी बेळगांव जिल्यातील शेकडो ज्येष्ठ नागरिकांच्या सन्मानाने आचरणेत येणार असल्याची माहिती माजी मंत्री ए. बी. पाटील यांनी एसडीव्हीएस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना दिली. ते पुढे …

Read More »

निपाणी महादेव मंदिरात २६ पासून महाशिवरात्रोत्सव

विविध स्पर्धा शर्यती रद्द : रांगोळीतून १२ ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती  निपाणी (वार्ता) : येथील महादेव गल्ली येथील पुरातन श्री महादेव मंदीर येथे शनिवारी (ता.२६) फेब्रुवारीपासून गुरुवार (ता.३) मार्चपर्यंत महाशिवरात्रोत्सव व रथोत्सव  होणार आहे. या निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवारी ३ मार्च रोजी दु. १ वा. रथोत्सव मिरवणूक …

Read More »

एकजुटीमुळे भविष्यात काँग्रेसची सत्ता

डी. के. शिवकुमार :  काकासाहेब पाटील यांनी घेतली भेट निपाणी(वार्ता) : नुकत्याच विधानपरिषद व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाले आहेत. काँग्रेस पक्ष संघटनेमुळे बेळगाव जिल्ह्यात काँग्रेसला चांगले यश मिळाले. त्यामुळे आगामी होणाऱ्या निवडणुकांबाबत चर्चा करण्यासाठी माजी आमदार काकासाहेब पाटील यांनी बेंगळूर येथे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार यांची भेट घेतली. यावेळी …

Read More »