सीमाभागातल्या मराठी बहुभाषिक मतदारसंघातून निवडून येणाऱ्या लोकप्रतिनिधींशी चर्चा करणार बेळगाव : म. ए. युवा समिती सिमाभागची बैठक जत्तीमठ येथे पार पडली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी युवा समिती सिमाभागचे अध्यक्ष शुभम शेळके हे होते. कन्नड प्राधिकरणाची बैठक घेऊन मराठीसह इतर भाषा काढून फक्तच कन्नड भाषेच्या पाट्या सर्व सरकारी ठिकाणी लावण्याच्या निर्णयाचा …
Read More »युवा समिती बेळगाव यांच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव : आज शनिवार दि. 12/07/2025 रोजी सावगाव शाळेत युवा समिती बेळगाव यांच्या वतीने इयत्ता 1 लीच्या सर्व तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वितरीत करण्यात आले. हा उपक्रम दरवर्षी राबविण्यात येत असल्याने मुलांच्यामध्ये शिक्षणाची आवड निर्माण होत आहे. यावेळी युवा आघाडी सावगावचे अध्यक्ष श्री. यल्लाप्पा मा. पाटील, शाळेचे एसडीएमसी …
Read More »गणेशोत्सव मार्गावरील विद्युत खांब बदलण्यासाठी लोकमान्य टिळक महामंडळाकडून हेस्कॉमला निवेदन
बेळगाव : श्री लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाच्या वतीने महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली शुक्रवारी 11 जुलै रोजी हेस्कॉमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनीयर मनोहर सुतार यांना निवेदन देण्यात आले व गणेशोत्सव आगमन सोहळा व विसर्जन मिरवणुक मार्गावरील कमी उंचीचे विद्युत खांब बदलून त्या जागी जास्त उंची असलेले विद्युत खांब उभारण्याची मागणी करण्यात आली. गणेश …
Read More »बेळगावमध्ये उद्या लोकअदालतीचे आयोजन
बेळगाव : उद्या दि. १२ जुलै रोजी बेळगावमध्ये लोकअदालत आयोजित करण्यात येणार आहे. तसेच, सरकारी योजनांची माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी विधी सेवा प्राधिकरणातर्फे जनजागृती केली जाईल, अशी माहिती बेळगाव जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव संदीप पाटील यांनी दिली. आज बेळगावमध्ये पत्रकार परिषद घेऊन ते बोलत होते. संदीप पाटील म्हणाले की, …
Read More »फेसबुक फ्रेंड सर्कल आणि पत्रकार संघाच्या वतीने विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
बेळगाव – गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून फेसबुक फ्रेंड सर्कल आणि बेळगाव मिडिया असोसिएशन या पत्रकार संघाच्या संयुक्त विद्यमाने काल गुरुवारी शहापूर येथे गरीब गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. शहापूर नाथ पै चौक येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमाला फेसबुक फ्रेंड सर्कलचे संतोष दरेकर यांच्यासह सुधाकर चाळके, सामाजिक कार्यकर्ते विल्सन …
Read More »भारत विकास परिषदेचा राष्ट्रीय स्थापना दिवस उत्साहात
तसेच डॉक्टर्स डे आणि सीए डे देखील साजरा बेळगाव : भारत विकास परिषदेचा 63 वा राष्ट्रीय स्थापना दिवस तसेच डॉक्टर्स डे आणि चार्टर्ड अकौंटंट डे असा संयुक्त कार्यक्रम गुरूवारी सायंकाळी जीजीसी सभागृहात अपूर्व उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डॉ. सूरज जोशी आणि चार्टर्ड अकाऊंटंट संजीव अध्यापक उपस्थित …
Read More »मराठा लाईट इन्फंट्री येथे अग्निवीर विविध पदांसाठी २ ऑगस्टपासून भरती मेळावा
बेळगाव : मराठा लाईट इन्फंट्री रेजिमेंटल सेंटर बेळगाव येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे येत्या दि. 2 ते दि. 9 ऑगस्ट 2025 दरम्यान अग्निवीर जनरल ड्यूटी, अग्निवीर क्लार्क आणि अग्निवीर ट्रेडसमॅनसाठी युनिट हेडकॉटर्र कोटा (युएचक्यू) अग्निवीर भरती मेळावा आयोजित करण्यात आला आहे. सदर मेळावा फक्त युद्ध विधवा, सैनिक, माजी सैनिक …
Read More »अनगोळ येथे ३७ वर्षीय माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू
बेळगाव : राज्यात हृदयविकाराच्या झटक्यांचे प्रमाण वाढत असताना, बेळगाव शहरात गुरुवारी अशीच एक दुर्दैवी घटना घडली आहे. भारतीय सैन्यातून निवृत्त झालेल्या एका माजी सैनिकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. ही घटना बेळगाव शहरातील अनगोळ परिसरात घडली. इब्राहिम देवलापूर (३७) असे मृत माजी सैनिकाचे नाव आहे. भारतीय सैन्यात सेवा दिल्यानंतर ते …
Read More »आषाढी एकादशी निमित्त श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे भजनाचा कार्यक्रम…
बेळगाव : श्रीराम कॉलनी आदर्श नगर रहिवासी संघटनेतर्फे आषाढी एकादशी निमित्त भजनाचा कार्यक्रम पार पडला. दि. ०९/०७/२०२५ रोजी गंगा नारायण सभागृहात झालेल्या कार्यक्रमास योगगुरू डॉ. पटृनशेटी व महिला अध्यक्ष सौ. वर्षा घाडी यांच्या हस्ते दिपप्रज्वलन करण्यात आले. हंदीगनूर गावातील भजनी मंडळाच्या पंचवीस भगिनींनी भजनाचा कार्यक्रम अतिशय उत्कृष्टरित्या सादर केला. …
Read More »संतमीरा, शांतिनिकेतन, स्वामी विवेकानंद, देवेंद्र जीनगौडा, हनिवेल शाळा उपांत्य फेरीत
बेळगाव : गणेशपुर येथील संत मीरा इंग्रजी माध्यम स्कूल आयोजित विद्याभारती जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धेच्या उद्घाटनाच्या दिवशी प्राथमिक व माध्यमिक गटात संत मीरा अनगोळ, शांतिनिकेतन पब्लिक स्कूल खानापूर, स्वामी विवेकानंद खानापूर आणि हनिवेल खानापूर, देवेंद्र जीनगौडा शिंदोळी या शाळेनी प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करीत उपांत्यफेरीत प्रवेश केला. सकाळी स्पर्धेच्या उद्घाटनाला प्रमुख पाहुणे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta