Tuesday , July 28 2026
Breaking News

बेळगाव

बेळगावात मटका अड्ड्यावर सीसीबीचा छापा; तीन आरोपींना अटक

  बेळगाव : बेळगाव शहरातील मार्केट पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत बेकायदेशीरपणे सुरू असलेल्या मटका व्यवसायावर सीसीबी पोलिसांनी छापा टाकला आहे. या कारवाईत तिघा आरोपींना मुद्देमालासहित रंगेहाथ पकडण्यात आले आहे. बेळगावच्या जुन्या मोडका बाजार परिसरातील खंजर गल्लीमध्ये हा मटका अड्डा सुरू होता. सीसीबी पोलीस निरीक्षक मंजुनाथ नायक आणि त्यांच्या पथकाने मिळालेल्या खात्रीशीर …

Read More »

बी के मॉडेल हायस्कूलमध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम

  बेळगाव : येथील बी. के मॉडेल हायस्कूल मध्ये ‘पोक्सो’ कायदा जनजागृती कार्यक्रम संपन्न झाला. प्रमुख पाहुणे म्हणून तृतीय सत्र न्यायालय वरिष्ठ न्यायाधीश श्री. आर. एम. शिरूर, शिक्षण इलाख्याचे सर्व शिक्षण अभियान प्रमुख श्रीबसवराज मिलानहट्टी हे उपस्थित होत. मुख्याध्यापक श्री. एस. एन. जोशी अध्यक्षस्थानी होते. पाहुण्याचे स्वागत करण्यात आल्यानंतर न्यायाधीश …

Read More »

माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण सोहळा संपन्न

  बेळगाव : विश्व भारत सेवा समिती संचलित माध्यमिक विद्यालय, कर्ले येथील 2025-2026 दहावीच्या विद्यार्थ्यांचा सदिच्छा समारंभ, पारितोषिक वितरण आणि सेवानिवृत्त चित्रकला शिक्षक श्री. नागेश मारुती पाटील यांचा सत्कार असा तिहेरी कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष श्री. विजयराव परशुरामभाऊ नंदीहळी होते. सेवानिवृत्त शिक्षक श्री नागेश पाटील यांच्या हस्ते …

Read More »

अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपीला ५ वर्षांची कोठडी

  बेळगाव : कारगाडी शिकवण्याच्या बहाण्याने अल्पवयीन मुलीला लैंगिक त्रास देणाऱ्या मन्नूर (ता. जि. बेळगाव) येथील एका इसमाला अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय, विशेष जलदगती पोक्सो न्यायालय -01 बेळगावच्या न्यायाधीश श्रीमती सी. एम. पुष्पलता यांनी आज बुधवारी 5 वर्षे कारावासाच्या शिक्षेसह 10,000 रुपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. शिक्षा झालेल्या इसमाचे …

Read More »

अनुजा बाळेकुंद्री यांची शिवा लोहारला ११ हजारांची आर्थिक मदत

  माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून सुपूर्द केला धनादेश; डोळ्याच्या उपचारासाठी सहकार्याचा हात बेळगाव : फटाक्यांच्या आतषबाजीत डोळा गमावलेल्या शहापूर येथील शिवा लोहार याच्या उपचारासाठी मदतीचा ओघ सुरू असून समाजातील विविध घटक त्याच्या मदतीसाठी पुढे येत आहेत. समाजसेविका माधुरी जाधव यांच्या माधुरी जाधव फौंडेशनच्या माध्यमातून श्रीमती अनुजा बाळेकुंद्री यांनी शिवाला पुढील उपचारासाठी …

Read More »

हंदीगनूर महालक्ष्मी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळा उत्साहात

  बेळगाव : हंदीगनूर येथे श्री महालक्ष्मी देवी यात्रोत्सव मंडपाच्या मुहूर्तमेढ सोहळ्याचा कार्यक्रम मंगळवार (दि. १० मार्च) सकाळी उत्साहात पार पडला. जवळपास ५८ वर्षांनंतर हांदीगनूर तसेच परिसरातील म्हाळेनट्टी, बोडकेनहट्टी, होसोळी, कट्टनभावी, कुरिहाळ खुर्द आणि कुरिहाळ बुद्रुक या सहभागी गावांच्या संयुक्त विद्यमाने श्री महालक्ष्मी देवीची यात्रा येत्या १४ एप्रिल रोजी आयोजित …

Read More »

अंगणवाडीतील रिक्त पदे ९० दिवसांत भरण्याचे निर्देश : मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर

  बंगळूर : राज्यातील अंगणवाडी केंद्रांमध्ये कोणतेही पद रिक्त झाल्यास ते ९० दिवसांच्या आत भरले जावे, असे निर्देश जिल्हाधिकारी आणि जिल्हा पंचायतांच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना देण्यात आले असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी बुधवारी विधानसभेत दिली. प्रश्नोत्तर तासात गुर्मे सुरेश शेट्टी (कापू मतदारसंघ) यांच्या प्रश्नाला उत्तर देताना …

Read More »

“जय, जय महाराष्ट्र” गीत म्हणणाऱ्या तिघांवर खडेबाजार पोलिस स्थानकात गुन्हा

  बेळगाव : टी-२० विश्वचषक स्पर्धेतील भारत आणि न्यूझीलंड अंतिम सामन्यात भारतीय संघाने विश्वविजेतेपद मिळवताच राणी कित्तूर चन्नम्मा चौक येथे आनंदोत्सव साजरा करताना “जय जय महाराष्ट्र माझा” हे गीत म्हणून आनंद साजरा करण्यात आला, याचे पोटशूळ उठलेल्या काही कन्नडधार्जिण्यानी खडेबाजार पोलिस स्थानकात तिघांवर गुन्हा दाखल केला आहे. विनायक उर्फ गणपत …

Read More »

“परीक्षा म्हणजे क्षमतांची कसोटी; आत्मविश्वासाने सामोरे जा!” : सीमाकवी रवींद्र पाटील

  गोजगे हायस्कूलमध्ये दहावी विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ उत्साहात बेळगाव (प्रतिनिधी) : “परीक्षा ही केवळ गुणांची स्पर्धा नसून विद्यार्थ्यांच्या क्षमतेची आणि आत्मविश्वासाची खरी कसोटी असते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी भीती न बाळगता सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरे जावे. तसेच विद्यार्थ्यांनी गुणांसोबत गुणवान, संस्कारवान आणि जबाबदार नागरिक बनणेही तितकेच आवश्यक आहे. मोठी स्वप्ने …

Read More »

सीमाभागात कन्नड सक्तीसाठी कन्नड संघटनांकडून प्रादेशिक आयुक्तांवर दबाव

  बेळगाव : सीमाभागातील कानडी संघटनांच्या तथाकथित कार्यकर्त्यांनी आज सकाळी प्रादेशिक आयुक्तांची भेट घेऊन सीमाभागात भाषिक सक्ती करण्यासाठी आणि स्थानिकांच्या अधिकारांवर गदा आणण्यासाठी दबाव टाकला. मंगळवारी सकाळी काही कार्यकर्त्यांनी प्रादेशिक आयुक्त के. एम. जानकी यांच्या दालनात धाव घेतली. केवळ स्वतःचे राजकीय अस्तित्व टिकवण्यासाठी या तथाकथित कार्यकर्त्यांनी प्रशासनावर ‘कन्नड सक्ती’साठी दबाव …

Read More »