बेळगाव : बेळगाव येथील भाजपा नेत्या डॉ. सोनाली सरनोबत यांची कर्नाटक राज्य भाजप महिला मोर्चा सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. वैद्यकीय क्षेत्रासोबत सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात आपली विशेष ओळख निर्माण केलेल्या डॉ. सोनाली सरनोबत या सामाजिक बांधिलकी आणि समर्पणासाठी ओळखल्या जातात. डॉ. सोनाली सरनोबत यांनी खानापूर तालुक्यातील दुर्गम भागात …
Read More »कँटोन्मेंट निवासी क्षेत्र महानगरपालिकेकडे हस्तांतरित करण्यासंदर्भात १५ दिवसांत सर्वेक्षण अहवाल सादर करण्याचे निर्देश
बेळगाव : कँटोन्मेंट बोर्डाच्या एकूण १७६३.७८ एकर क्षेत्राचे तसेच विविध बाबींचा समावेशासह संपूर्ण सर्वेक्षण करून १५ दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिले आहेत. आज मंगळवारी (१६ जुलै) संरक्षण मंत्रालयाच्या सहसंचालकांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या व्हिडिओ कॉन्फरन्सनंतर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात झालेल्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते होते. बेळगाव कँटोन्मेंट …
Read More »शांताई वृद्धाश्रम व उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण
बेळगाव : बेळगावच्या शांताई वृद्धाश्रम आणि उषाताई गोगटे शाळेत डेंग्यू लसीकरण करण्यात आले. भरतेश वैद्यकीय महाविद्यालयातील विद्यार्थी आणि माजी महापौर विजय मोरे यांच्या पुढाकारातून डेंग्यू जनजागृती व लसीकरण करण्यात आले. शांताई वृद्धाश्रमातील सदस्य व कर्मचाऱ्यांना डेंग्यू प्रतिबंधक लसीचे वाटप केले. तसेच उषाताई गोगटे शाळेत आयोजित डेंग्यू लसीकरण शिबिराचा सुमारे …
Read More »वीज बिल माफ करण्यासाठी विणकरांचे धरणे आंदोलन
बेळगाव : पावसाळी अधिवेशनात यंत्रमागधारक विणकरणाचे वीजबिल माफ करण्याचा प्रस्ताव मांडण्यात यावा, या मागणीसाठी जिल्ह्यातील विणकरांनी बेळगाव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे सत्याग्रह केला. निषेध मोर्चा काढून जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या यंत्रमागधारकांनी थकबाकीचे बिल भरणार नाही, अशा घोषणा देत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. शासनाने विजेच्या दरात वाढ केल्याने विजेवर चालणाऱ्या यंत्रमाग विणकरांचे जगणे …
Read More »कर्नाटक राज्य रयत संघटनेतर्फे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्य रयत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नूतन जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांची बेळगाव येथे भेट घेतली. यावेळी संघटनेचे राज्य कार्याध्यक्ष राजू पोवार, अध्यक्ष चुन्नाप्पा पुजारी व पदाधिकाऱ्यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. शिवाय शेतकऱ्यांच्या विविध समस्या बाबतचे निवेदन सादर केले. राजू पोवार यांनी, शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी कर्नाटक राज्य रयत …
Read More »गर्भलिंग तपासणी करणाऱ्या हॉस्पिटलवर धाड
बेळगाव : पीएनडीटी कायद्याचे उल्लंघन करून गर्भलिंग तपासणी करणाऱ्या मूडलगी येथील हॉस्पिटलवर राज्य आरोग्य विभाग प्राधिकरण आणि राज्य तपासणी आणि देखरेख समितीने छापा टाकला. मूडलगी येथील इक्रा सर्जिकल आणि मॅटर्निटी हॉस्पिटलचे डॉ. कुतेझुल्ला कुब्रा हे गर्भ लिंग तपासणी करत असल्याची माहिती आरोग्य विभागाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे तसेच …
Read More »डिजिटल न्यूज असोसिएशन सदस्यांनी घेतली जिल्हाधिकाऱ्यांची भेट
बेळगाव : बेळगावातील डिजिटल न्यूज असोसिएशन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे स्वागत केले तसेच त्यांच्या समवेत विविध मुद्द्यांवर चर्चा केली. डिजिटल न्यूज असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांना डिजिटल पत्रकारीते संदर्भात आवश्यक असणाऱ्या मुद्द्यांबाबत विवेचन केले. त्यानंतर बोलताना जिल्हाधिकारी म्हणाले की, सध्याच्या युगात डिजिटल न्यूजने नवी क्रांती घडविली …
Read More »म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) व्यापाऱ्यांनी घेतली स्थायी समिती अध्यक्षांची भेट
बेळगाव : येथील म. फुले भाजी मार्केटबाबतची माहिती सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी महापालिकेला दिली असून, महापालिकेकडून भाजी मार्केटची माहिती तयार करण्यात आली आहे. यासंदर्भात म. फुले भाजी मार्केट (झेंडा चौक) येथील व्यापारी सोमवारी (ता. १५) आयुक्तांची भेट घेण्यास गेले होते. मात्र, त्यांची भेट झाली नाही. यामुळे …
Read More »विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा १८ जुलै रोजी २४ वा पदवीदान समारंभ
बेळगाव : विश्वेश्वरय्या तांत्रिक विद्यापीठाचा 24 वा दीक्षांत समारंभ 18 जुलै रोजी आयोजिण्यात आला आहे, अशी माहिती व्हीटीयूचे कुलपती डॉ. एस विद्याशंकर यांनी दिली. बेळगावमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी हि माहिती दिली. गुरुवार दि. 18 जुलै रोजी विश्वेश्वरय्या विश्वविद्यालय ज्ञान संगम प्रांगणातील डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम …
Read More »स्वच्छ पिण्याच्या पाण्याचाच पुरवठा करा : जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन
बेळगाव : दूषित पिण्याच्या पाण्यामुळे अनेक प्रकारच्या आरोग्याच्या समस्या निर्माण होत असल्याने पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यापूर्वी जलकुंभांचे नमुने घेऊन त्यांची चाचणी करावी. पाणी पिण्यायोग्य असेल तरच पुरवठा करावा, अशा सक्त सूचना जिल्हाधिकारी मोहम्मद रोशन यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात सोमवारी (१५ जुलै) विविध विभागांच्या अधिकाऱ्यांच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी ते बोलत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta