बेळगाव : चारधाम यात्रेसाठी बेळगाव शहरातील फर्निचर व्यावसायिक नारायण पाटील, कल्लाप्पा सक्रोजी आणि तानाजी सुतार हे आज रवाना झाले त्यांना शुभेच्छा व निरोप देण्याचा कार्यक्रम रविवारी दुपारी उत्साहात पार पडला.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील खानापूर रोडवरील अमर फर्निचर येथे आयोजित या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अमर फर्निचरचे मालक यल्लाप्पा अकनोजी हे होते. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मुतगेकर व बेळगाव जिल्हा सुतार संघटना अध्यक्ष यल्लाप्पा रेमानाचे हजर होते. कार्यकर्माची सुरवात मान्यवरांचा हस्ते दीप प्रज्वलनाने झाली. उपस्थितांचे स्वागत यल्लाप्पा रेमानाचे यांनी केले. यानंतर चारधाम यात्रेकरूंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन यल्लाप्पा अकनोजी यांनी सत्कार केला. राजेंद्र मुतकेकर यांनी प्रास्ताविक करून केदारनाथ, भद्रीनाथची माहिती सांगितली.
याप्रसंगी बेळगावातील सुतार संघटनेचे अध्यक्ष व जयश्री फर्निचर्सचे मालक यल्लाप्पा रेमानाचे यांनी समयोचित विचार व्यक्त करून सर्व सुतार, फर्निचर व्यवसायिक व प्लायवुड, हार्डवेर ग्लास दुकान मालकांच्यावतीने चारधाम यात्रेकरुंना शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमास तुकाराम घाडी, मनोहर निलजकर, दिलीप शुभजी, विजय बाळेकुंद्री, अमर अकनोजी, परशरम गोडसे, सुरेश बोकडे, विनायक धामणेकर, नेसरीकर, आनंद अकनोजी वगैरे अनेक फर्निचर व्यावसायिक, प्लायवुड, हार्डवेर ग्लास दुकानदार, हितचिंतक व निमंत्रित उपस्थित होते
Belgaum Varta Belgaum Varta