Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

14 डिसेंबरला अमित शहा दोन्ही मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा करणार

  नवी दिल्ली : महाराष्ट्र-कर्नाटक सीमा प्रश्नी महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खासदारांनी आज शुक्रवारी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान उपस्थित खासदारांनी सीमा भागातील मराठी भाषिकांवर होत असलेल्या अत्याचाराची माहिती गृहमंत्र्यांना दिली. त्याचबरोबर सीमा प्रश्नी कर्नाटकचे मुख्यमंत्री तणावाची परिस्थिती निर्माण करत असल्याची तक्रार ही त्यांनी केली. यावेळी बोलताना …

Read More »

महाराष्ट्र-कर्नाटक बससेवा पूर्ववत सुरू

  कोल्हापूर : गेल्या 72 तासांपासून बंद असलेल्या महाराष्ट्र आणि कर्नाटक बससेवा पुन्हा सुरु झाली आहे. त्यामुळे सीमाभागासह कर्नाटकात प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा आहे. सीमावाद उफाळून आल्यानंतर दोन्ही राज्यातील बससेवेवर विपरित परिणाम झाला होता. कोल्हापूरमधील सीबीएस स्थानकातून पहिली बस कोल्हापूर आजरा (व्हाया निपाणी) बस मार्गस्थ झाली. कन्नडिंगांनी महाराष्ट्रातील वाहनांवर …

Read More »

जानेवारीमध्ये महापौर-उपमहापौर निवड : अभय पाटील

  बेळगाव : जानेवारीच्या पहिल्या किंवा दुसऱ्या आठवड्यात बेळगावच्या महापौर-उपमहापौरांची निवडणूक होईल, बेळगाव मनपाच्या इतिहासात प्रथमच भारतीय जनता पक्षाचा झेंडा मनपावर फडकेल, अशी माहिती बेळगाव दक्षिणचे आ. अभय पाटील यांनी दिली. बेळगाव महानगरपालिकेवर निवडून आलेल्या भाजप नगरसेवकांची आ. अभय पाटील यांनी आज शुक्रवारी बैठक घेतली. तत्पूर्वी प्रसारमाध्यमांशी त्यांनी संवाद साधला. …

Read More »

हाॅकी बेळगाव आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धेचा शुभारंभ

  बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले ग्राऊंड) येथे आयोजन करण्यात आले असून आज सकाळी शुभारंभ करण्यात आला. यावेळी अध्यक्ष गुळाप्पा होसमनी, सचिव सुधाकर चाळके, शिवाजी जाधव, धारु चाळके, उत्तम शिंदे, रमेश गुर्जर, खलीद बेपारी, नामदेव …

Read More »

अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावातून तडीपार

  बेळगाव : बेकायदा अवैध धंद्यात गुंतलेल्या एका माजी नगरसेवकासह 5 जणांना बेळगावतून तडीपार करण्यात आले आहे. असा आदेश कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त तथा विशेष कार्यकारी दंडाधिकारी रवींद्र गडादी यांनी बजावला आहे. मार्केट पोलीस ठाण्याच्या कार्यक्षेत्रातून मोहम्मदशफी मोदीनसाब ताशीलदार (वय 68, रा. खंजर गल्ली) आणि इजारअहमद महंमदइसाक नेसरीकर …

Read More »

हाॅकी बेळगावतर्फे आंतर शालेय काॅलेज हाॅकी स्पर्धा आजपासून

  बेळगांव : हाॅकी बेळगावतर्फे आंतरशालेय व काॅलेज हाॅकी स्पर्धांचे आयोजन दि. 9 ते 11 डिसेंबर नेताजी सुभाष चंद्र बोस ( लेले ग्राऊंड ) येथे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेत इस्लामिया, बाशिबान, मदानी, द्यान मंदीर, भंडारी, हेरवाडकर, कॅंटोनमेंट, शानभाग, सेंट जाॅन, जी जी चिटणीस, फोनिक्स, महाविद्यालय तसेच जीएसएस, गोगटे, …

Read More »

…म्हणे महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका!

  बेळगाव : सीमाप्रश्नावरून हिरेबागेवाडी टोल नाक्यावर उच्छाद मांडून दोन्ही राज्यात तणावाचे वातावरण निर्माण केलेल्या कर्नाटक रक्षण वेदिकेने महाराष्ट्रात कन्नडिगांना धोका असल्याचा कांगावा करत त्यांना सुरक्षा देण्याची मागणी मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांच्याकडे केली आहे. त्यामुळे चोराच्या उलट्या बोंबा! या म्हणीचा प्रत्यय आला आहे. बेळगावात पोलिसांनी प्रवेशबंदी करूनही दोनच दिवसांपूर्वी बेळगावातील …

Read More »

गुजरातमध्ये भाजपचा विजय; बेळगावमध्ये विजयोत्सव!

  बेळगाव : गुजरात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या ऐतिहासिक विजयानंतर बेळगावात आज भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोष करत विजयोत्सव साजरा केला. गुजरात विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने दणदणीत विजय संपादन केला आहे. त्या आनंदात बेळगावात भाजप कार्यकर्त्यांनी आज विजयोत्सव साजरा केला. शहरातील चन्नम्मा चौकातील गणेश मंदिरात भाजप कार्यकर्त्यांनी पूजा केली. त्यानंतर मिठाई वाटून …

Read More »

दोन कारमध्ये भीषण अपघात : भाऊ-बहिणीचा जागीच मृत्यू

  मुडलगी : गुर्लापूरजवळील मुधोळ-निपाणी राज्य महामार्गावर बुधवारी रात्री टाटा टियागो कार आणि एर्टीगा कार यांच्यात झालेल्या अपघातात मोठा भाऊ आणि लहान बहिणीचा मृत्यू झाल्याची दुःखद घटना घडली. रायबाग तालुक्यातील कप्पाळगुड्डी गावातील दुंडाप्पा अडिवेप्पा बडिगेर (३४) आणि बहीण भाग्यश्री नवीन कंभार (२२) हे दोघे बुधवारी रात्री धारवाडहून कप्पाळगुड्डी या मूळ …

Read More »

शांतीनगर टिळकवाडी श्री गुरूदेव दत्त मंदिर येथे दत्त जयंती साजरी

  बेळगाव : शांतीनगर टिळकवाडी श्री गुरूदेव दत्त मंदिर येथे सालाबादप्रमाणे श्री दत्त जन्मोत्सव कार्यक्रम आयोजित केला होता. जन्मोत्सव सायंकाळी 06.06 मिनीटानी पार पडला. पुजेचा मान श्री. उदय नारायण पाटील व सौ. राजश्री उदय पाटील यांच्या हस्ते श्रींचा पाळणा पार पडला. पुरोहित श्री. दीनानाथ कुलकर्णी, कपील, राहूल, गणेश आणि संतोष …

Read More »