Sunday , September 20 2026
Breaking News

श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवस उत्साहात

Spread the love

 

बेळगाव : श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आयोजित श्री दुर्गामाता दौडीचा तिसरा दिवशी उत्साहात पार पडला. प्रसन्न वातावरण, दुमदुमणाऱ्या घोषणा आणि ध्येयमंत्राने वातावरणात स्फुरण चढले होते. युवक – युवती आणि अबालवृद्धांसह दिव्यांगांच्या उपस्थितीतने हि दौड विशेष लक्षवेधी ठरली.
देव, देश आणि धर्मरक्षणाच्या संदेश देण्यासाठी आयोजिण्यात आलेली श्री दुर्गामाता दौड राणी चन्नम्मा चौकातील श्री गणेश मंदिरापासून सुरुवात झाली. ध्वजारोजनाने सुरुवात झालेली दौड काकतीवेस रोड, खडक गल्ली, कोर्ट परिसर, चव्हाट गल्ली, पी.बी. रोड, आरटीओ सर्कल पासून पुढे मार्गस्थ होऊन किल्ला येथील दुर्गामाता मंदिरात येऊन थांबली. यावेळी जय भवानी, जय शिवाजी च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमला होता. ठिकठिकाणी महिलांनी शिवभक्तांचे औक्षण करून दौडचे स्वागत केले. भगवे फेटे, पांढरे पोशाख आणि फुलांची बरसात यामुळे दौडमध्ये सहभागी प्रत्येकाचा उत्साह द्विगुणित झालेला पाहायला मिळाला. या दौडमध्ये तरुण-तरुणींसह आबालवृद्ध, महिला आणि दिव्यांगांनीही सहभाग घेतला होता. शहर पोलीस आयुक्त याडा मार्टिन मारबानीयांग यांनी दौडचे स्वागत केले.

रविवारी होणारी श्री दुर्गामाता दौड शहापूर येथील नाथ पै सर्कल पासून सुरु होणार आहे. त्यानंतर लक्ष्मी गल्ली, कारभार गल्ली, मारुती गल्ली, छत्रपती संभाजी रोड, सराफ गल्ली, गाडे मार्ग, होसूर बसवाण गल्ली, आनंदवाडी, वडगाव रोड, अळवण गल्ली, दाणे गल्ली, खडे बाजार, कोरे गल्ली मार्गे गोवावेस येथील बसवेश्वर सर्कल येथे येऊन सांगता होणार आहे.

About Belgaum Varta

Check Also

‘बेळगांवचा कैवारी’चा अभिनव उपक्रम; गणेशोत्सवात ‘ज्ञान दान’

Spread the love  बेळगाव : गणेशोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाचा सण असला तरी सामाजिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *