Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

खेळाडूंचे कौतुक करणे हा प्रेरणादायी विचार आहे : माजी आमदार परशुरामभाऊ नंदिहळी

  बेळगाव : समाजात गुणवत्ता महत्त्वाची असते. खेळ हा जीवनात ऐक्य घडवितो. शिक्षणाने मनुष्याला लौकिकता मिळते. विद्यार्थी, शिक्षक व पत्रकार हे महत्त्वाचे घटक आहेत. त्यासाठी सन्मान करणे, आदराची भावना ठेवणे हे प्रत्येकाचे आद्यकर्तव्य आहे, असे मौल्यवान विचार माजी आम. परशुरामभाऊ नंदिहळी यांनी कावळेवाडीत वाचनालयाच्या सन्मान समारंभात व्यक्त केले. अध्यक्षस्थानी विजयराव …

Read More »

बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने गांधी जयंती साजरी

  बेळगाव : बेळगाव जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महात्मा गांधी यांची जयंती साजरी करण्यात आली. पक्षाचे बेळगाव जिल्हा अध्यक्ष अमोल देसाई यांनी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण केला व मिठाई वाटप करण्यात आले. यावेळी शाम मंतेरो, दुर्गेश मेत्री, आप्पासाहेब पाटील, इस्माईल मुल्ला, रामकृष्ण सांबरेकर, सानंद पाटील, …

Read More »

चांगळेश्वरी शिक्षण मंडळाचा सुवर्णमहोत्सव करण्याचा निर्णय

  माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत निर्णय बेळगाव : श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ हि शिक्षण संस्था व संस्थेचे पहिले हायस्कूल श्री चांगळेश्वरी हायस्कूल येळ्ळुर यांच्या स्थापनेला यावर्षी पन्नास वर्षे पूर्ण होत आहेत. या निमित्ताने संस्था व हायस्कूलचा संयुक्तपणे सुवर्णमहोत्सव भव्य प्रमाणात साजरा करण्याचा निर्णय आज संस्था, हायस्कूल व माजी विद्यार्थी यांच्या आज …

Read More »

चित्रकला स्पर्धेत दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग

  बेळगाव : आमदार अनिल बेनके यांच्यावतीने दसरा सणानिमित्त विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले असून, त्याचाच एक भाग म्हणून आज शालेय विद्यार्थ्यांसाठी चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या. नियोजित वेळेनुसार सरदार मैदानावर स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. मात्र पावसामुळे महिला विद्यालय इंग्रजी माध्यम, मराठी माध्यम शाळा, जीए महाविद्यालय आणि सरदार मैदानावरील सभागृहात …

Read More »

व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छेच्या विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय स्पर्धांसाठी निवड

  बेळगाव : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ बेळगाव संचलित व्ही. एस. पाटील हायस्कूल मच्छे (ता. जि. बेळगाव)च्या दोन विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय कुस्ती व कराटे स्पर्धांसाठी निवड झाली. बेळगाव जिल्हा पातळीवरील माध्यमिक शाळामधील 45 किलो कुस्ती वजनी गटामध्ये शुभम सुनिल चौगुले याने प्रथम क्रमांक मिळवला. तसेच कराटेमध्ये 53 किलो वजनी गटात वैभव …

Read More »

महात्मा गांधीजींच्या आदर्शांचे अनुकरण आवश्यक : खास. मंगला अंगडी

  महात्मा गांधी 154 वी जयंती साजरी बेळगाव : महात्मा गांधी हे अहिंसेच्या तत्त्वाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारे महान आत्मा होते. त्यामुळेच संपूर्ण जग त्यांचा आदर करते. रक्तक्रांतीशिवाय कोणत्याही देशाला स्वातंत्र्य मिळाल्याची उदाहरणे नाहीत. मात्र गांधीजींनी दाखवून दिले आहे की, अहिंसेच्या माध्यमातून शत्रूंचा पराभव केला जाऊ शकतो आणि आपण सर्वांनी …

Read More »

हिंडलगा कारागृहात कैद्याची आत्महत्या

  बेळगाव : येथील हिंडलगा कारागृहात पोक्सो कायद्यान्वये खटला सुरू असलेल्या कैद्याने रविवारी आत्महत्या केली. कित्तूर तालुक्यातील बच्चनकेरी गावातील मंजुनाथ नायकर (२०) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. एका मुलीचा लैंगिक छळ केल्याच्या आरोपावरून त्याच्याविरुद्ध कित्तूर पोलिस ठाण्यात तीन महिन्यांपूर्वी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आत्महत्येचे नेमके कारण …

Read More »

येळ्ळूरसाठी आजपासून दोन नवीन बसेस धावणार

  बेळगाव : आजपासून नवीन दोन बसेसचे उद्घाटन येळ्ळूर ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील यांनी केले व नागरिकांना दोन्ही बसेस चालू करण्यात आल्या. यावेळी ग्राम पंचायत अध्यक्ष सतीश बा. पाटील, के एस आर टी सी विभागीय अधिकारी श्री. पी. वाय. नाईक डेपो मॅनेजर विजय कुमार होसमनी, बसवराज मादेगौडा, ग्राम …

Read More »

मुरगोडजवळ घर कोसळून आई आणि मुलाचा मृत्यू

बेळगाव : मुसळधार पावसामुळे महादेव लक्षमप्पा बागिलद यांचे घर कोसळून बालक प्रज्वल (५) आणि आई यल्लवा महादेव बागिलद (४०) यांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना यरगट्टीजवळील माडमगेरी गावात घडली. घटनास्थळी तहसीलदार महांतेश मठद, सीपीआय मौनेश्वर मालीपाटील, पीएसआय बसनगौडा नेर्ली, एएसआय वाय. एम. कटगोळ तसेच महसूल विभागाच्या अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासणी केली …

Read More »

येळ्ळूरच्या शिवाजी हायस्कूलच्या खेळाडूची राज्य स्पर्धेसाठी निवड

  खानापूर (प्रतिनिधी) : येळ्ळूर येथील विश्वभारत सेवा समिती संचालित श्री शिवाजी हायस्कूलचा खेळाडू दैवदीप देवानंद धामणेकर याने बेळगाव येथील क्रीडांगणावर शिक्षण खात्याच्या वतीने नुकताच घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय थाळीफेक स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे त्याची राज्यस्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. त्याला क्रीडा शिक्षक संतोष मेलगे, मुख्याध्यापक मनोहर बाचीकर व सहशिक्षकांचे …

Read More »