Saturday , October 19 2024
Breaking News

बेळगाव

फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत आमदार अनिल बेनके यांची बैठक

  बेळगाव : सोमवार दिनांक 22 ऑगस्ट 2022 रोजी फुलबाग गल्ली येथे समाज प्रमुखांसमवेत बेळगांव उत्तर मतदारसंघाचे आमदार अनिल बेनके यांनी बैठक घेतली. बेळगांव उत्तर भागातील चालु असलेली विविध विकासकामे तसेच आगामी विकासकामांबद्दल आमदार अनिल बेनके यांनी समाज प्रमुखांची बैठक घेतली आणि समाजप्रमुखांच्या मागणीनुसार बेळगांवमध्ये लवकरच हायटेक गो-शाळा बांधण्यात येणार …

Read More »

सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळाकडून विविध मागण्यांसंदर्भात पोलिस आयुक्तांना निवेदन सादर

  बेळगाव : मध्यवर्ती सार्वजनिक श्रीगणेशोत्सव महामंडळ बेळगावतर्फे पोलिस आयुक्तांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. प्रामुख्याने गणेशोत्सव काळात उदभवणाऱ्या समस्यांबाबत चर्चा करण्यात आली. शहरात सुमारे 357 हुन अधिक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ आहेत. या मंडळांना विविध परवानग्या घ्याव्या लागतात त्यासाठी जिल्हा प्रशासनाने जुन्या मनपा इमारतीत, टिळकवाडी येथील येथील मनपा कार्यालय, तसेच …

Read More »

जारकीहोळींना घरी पाठविणेचा कत्तींनी विडा उचलला…

संकेश्वर  (महंमद मोमीन) : यमकनमर्डी विधानसभा मतदार संघाचे आमदार सतीश जारकीहोळी यांना घरी पाठविणेचा विडा राज्याचे वन आहार व नागरी पुरवठा मंत्री उमेश कत्तीं यांनी उचलला आहे. नुकत्याच पार पडलेल्या मारुती अष्टगी अभिनंदन कार्यक्रमात मंत्रिमहोदयांनी जारकीहोळी यांना पाठवून देण्याची भाषा केली आहे. मंत्री उमेश कत्तीं म्हणाले, हुक्केरी विधानसभेची निवडणूक मी …

Read More »

ग्रंथपाल ग्रंथालयाचा कणा आहे : प्रा. स्वरूपा इनामदार

  बेळगाव : कोणत्याही ग्रंथालयाचे ग्रंथपाल स्वतः जबाबदारी घेऊन काम करत असतात. पुस्तकांची ठेवण, त्यांचे जतन, हाताळणी, वाचकांशी सुसंवाद, साहित्यिक उपक्रमाचे आयोजन अशी विविधांगी कामे काळजीपूर्वक करतात म्हणून ग्रंथपाल हा ग्रंथालयाचा कणा आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ लेखिका प्रा. स्वरूपा इनामदार यांनी काढले. ग्रंथपाल दिनाच्या निमित्ताने तारांगण व जननी ट्रस्टच्या वतीने …

Read More »

आ. श्रीमंत पाटील यांच्याकडून अपघातात जखमी विद्यार्थिनींना धीर

  अथणी येथे ३२ जणींवर उपचार : मृत बस चालकाच्या कुटुंबीयांचे सांत्वन अथणी : दोन दिवसांपूर्वी अथणीजवळ अपघातात जखमी झालेल्या विद्यार्थ्यांची माजी मंत्री व कागवाडचे आ. श्रीमंत पाटील यांनी भेट घेतली. डॉक्टरांकडून उपचाराबाबत माहिती घेताना उपचारात हयगय करू नका, अशी सूचना त्यांनी दिली. सर्व विद्यार्थ्यांची त्यांनी विचारपूस करत धीर दिला. …

Read More »

निच्छित ध्येय गाठण्यासाठी अचूक नियोजन हवे : कल्लाप्पा मोदगेकर

जे. के. फाउंडेशन आणि प्रगतिशील परिषदतर्फे व्याख्यान आणि गुणी विद्यार्थ्यांचा सत्कार सोहळा संपन्न बेळगांव :  कला जीवनात परिपक्व आणि आनंददायी अनुभव देते;  कोणतेही क्षेत्र कमी दर्जाचे नसून आपण त्याला आत्मीयतेने स्वीकारणे अत्यंत गरजेचे आहे. जीवनात यशस्वी होण्यासाठी स्वतःमध्ये बदल घडून आणले गेले पाहिजे; संघर्ष, जिद्द चिकाटी मेहनत, कार्यात सातत्य कायम …

Read More »

गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनीतर्फे विविध स्पर्धा

बेळगाव : गुरुवर्य वि. गो. साठे मराठी प्रबोधिनी, बेळगाव या संस्थेतर्फे सन 2022 – 23 या शैक्षणिक वर्षात इयत्ता आठवी तसेच इयत्ता दहावी या वर्गात शिकत असलेल्या सीमाभागातील विद्यार्थ्यांसाठी मराठी भाषा स्पर्धा तसेच इयत्ता पाचवी ते इयत्ता दहावी या विद्यार्थ्यांसाठी कवी द. रा. किल्लेकर यांच्या स्मरणार्थ हस्ताक्षर स्पर्धांचे आयोजन करण्यात …

Read More »

वॉकर्स ग्रुपचे बुधवारी संमेलन

  बेळगाव : चन्नम्मानगर येथील वॉकर्स ग्रुपचे दुसरे संमेलन बुधवारी (ता. 24) सायंकाळी 5 वाजता सुभाषचंद्रनगर नागरिक संघटना हॉल (उत्सव हॉटेलमागे) येथे होणार आहे. कोरोना महामारीमुळे सदर संमेलन तीन वर्षांनी होणार आहे. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. मिलिंद हलगेकर उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी सुभाषचंद्रनगर नागरिक संघटनेचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव असतील. …

Read More »

सत्यन्नावर कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी!

  बेळगाव : सत्यन्नावर कुटुंबीयांनी सामाजिक बांधिलकी जपत आपल्या मुलीचा वाढदिवस माहेश्वरी अंध शाळेत साजरा केला. सत्यन्नावर कुटुंबीयांनी आपली मुलगी सुचित्रा सत्यन्नावर हिच्या वाढदिवसप्रित्यर्थ माहेश्वरी अंधशाळेतील विद्यार्थ्यांना केक, चॉकलेट व अल्पोपहारचे वाटप केले. हल्ली वाढदिवसाच्या निमित्ताने हजारी रुपयांचा चुराडा करणार्‍या तरुणाईला सत्यन्नावर कुटुंबीयांनी समाजापुढे एक नवा आदर्श घालून दिला आहे, …

Read More »

शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी

  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी कपिलेश्वर मंदिराच्या वतीने शेवटच्या श्रावणी सोमवार निमित्त संपूर्ण मंदिर आकर्षकरित्या विद्युत रोषणाई, विविध फुलां-पानांपासून सजविण्यात आले होते. रविवारी रात्री 12 वाजल्यापासून पंचामृत अभिषेक पहाटे पाच वाजेपर्यंत करण्यात आले. त्यानंतर एकादश रुद्राभिषेक करण्यात आला. श्रावण सोमवार निमित्त मंदिरामध्ये त्रिकाल पूजेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी …

Read More »