Monday , December 15 2025
Breaking News

बेळगाव

मनोज जरांगे पाटील यांच्या पाठींब्यासाठी बेळगावात सकल मराठा समाजाच्या वतीने उद्या लाक्षणिक उपोषण

  बेळगाव : सकल मराठा समाज बेळगाव यांच्या वतीने शनिवार दि. २० जानेवारी रोजी सकाळी ९.३० ते दुपारी ३ पर्यंत बेळगाव जिल्हा रुग्णालयासमोर, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डन येथे लाक्षणिक उपोषणाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा योद्धा, मनोज जरांगे पाटील यांचे मुंबई येथे सुरु असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनास पाठिंबा म्हणून …

Read More »

म. ए. समितीच्या फलकाची प्रशासनाला कावीळ!

  बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचा कपिलेश्वर उड्डाणपूल येथे उभारण्यात आलेला मराठी भाषेतील फलक महापालिकेने पोलिस बंदोबस्तात हटवला. 22 जानेवारी रोजी आयोध्येत श्रीराम मंदिराचे उद्घाटन आणि राम मूर्ती प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी कपिलेश्वर उड्डाणपूलाशेजारी मराठी भाषेतील शुभेच्छा फलक उभारला …

Read More »

बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार

  बेळगाव : कर्नाटक राज्य दैनिक संपादक संघ यांच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील दैनिकांच्या संपादकांचा सत्कार संघाच्या बैठकीत बेंगलोर येथे करण्यात आला. दैनिक वृत्तपत्रांच्या अडचणींच्या विषयी या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. दैनिकांना मिळत असलेल्या जाहिराती आणि त्यांची बीले आणि प्रमाण तसेच दर वाढ या संदर्भात आपण सरकारकडे मागणी करावयाची आहे. यासाठी …

Read More »

येळ्ळूर येथील श्री चांगळेश्वरी हायस्कूलच्या वार्षिक क्रीडा स्पर्धा संपन्न

  येळ्ळूर : ज्यांच्याकडे शारीरिक तंदुरुस्ती आहे तोच आजच्या काळात खरा श्रीमंत आहे. त्यामुळे विद्यार्थ्यानी व्यसनापासून दूर राहून सदृढ आरोग्य जपणे महत्त्वाचे आहे असे उद्गार वेदांत को-ऑपरेटिव्ह सोसायटीचे संचालक व निवृत्त शिक्षक श्री. जयवंत खन्नूरकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना काढले. सन 2023-24 शैक्षणिक वर्षातील श्री चांगळेश्वरी शिक्षण मंडळ संचलित श्री …

Read More »

मराठी विद्यानिकेतनमध्ये डॉ. एन. डी. पाटील यांना अभिवादन

  बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे दिनांक 17 जानेवारी रोजी भाई एन. डी. पाटील यांच्या द्वितीय स्मृतिदिनानिमित्त अभिवादन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमांमध्ये प्रथमता एन. डी. पाटील यांच्या फोटोचे पूजन शाळेच्या शिक्षिका रेणू सुळकर व मंजुषा पाटील यांच्या हस्ते करण्यात आले यानंतर भाई एन. डी. पाटील यांच्या …

Read More »

इंधन टँकरखाली सापडल्याने वृद्ध महिलेचे दोन्ही पाय निकामी

  बेळगाव : खानापूर रोड गोवावेस सर्कल येथे आज सकाळी दहाच्या सुमारास मुस्लिम गल्ली अनगोळ बेळगाव येथील सुरया सय्यद (वय 79) ही महिला रस्ता ओलांडत असताना येणाऱ्या भारत पेट्रोलियमच्या केए 22 /1695 क्रमांकाच्या इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरच्या चाकाखाली सापडली. या अपघातात सदर महिलेचे दोन्ही पाय गुडघ्यापासून निकामी झाले. हा अपघात …

Read More »

22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान ऑटो एक्स्पो 24 व बेल्कॉन प्रदर्शन

  बेळगाव : 22 ते 25 फेब्रुवारी दरम्यान 4 दिवस सातवे क्रेडाई बेळगाव बेल्कॉन गृहनिर्माण व ऑटो एक्स्पो-2024 प्रदर्शन बेळगावी येथील सी पी एड मैदानावर होणार असल्याची माहिती क्रेडाईचे अध्यक्ष दीपक गोजगेकर यांनी सांगितले. पत्रकार परिषदेला संबोधित करताना अध्यक्ष दीपक गोजगेकर म्हणाले की, यश इव्हेंट्स, बेलागावी कॉस्मो राऊंड टेबलच्या सहकार्याने, …

Read More »

19 व्या येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी श्रीराम पवार यांची निवड

  येळ्ळूर : येळ्ळूर ग्रामीण मराठी साहित्य संघाच्या वतीने आयोजित 19 वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन रविवार (ता. 11) फेब्रुवारी 2024 रोजी श्री शिवाजी विद्यालयाच्या पटांगणात होणार आहे. या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ संपादक, लेखक, स्तंभलेखक राजकीय विश्लेषक व सकाळ माध्यम समूहाचे श्रीराम पवार यांची निवड करण्यात आली आहे. श्रीराम …

Read More »

घुमटमाळ मारुती मंदिराचा साफसफाई कार्यक्रम

  बेळगाव : जानेवारी रोजी अयोध्येत होणाऱ्या श्रीराम मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमानिमित्त देशभरातील मंदिरांची स्वच्छता करण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे त्याला अनुसरून सर्वत्र स्वच्छतेचे उपक्रम हाती घेतले जात आहेत. हिंदवाडी येथील घुमटमाळ मारुती मंदिर मध्ये ट्रस्टचे माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक सुनिल चौगुले आणि अनंत लाड यांच्या पुढाकाराने …

Read More »

हुतात्मा मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नीचा सत्कार!

  बेळगाव : संयुक्त महाराष्ट्रासाठी १७ जानेवारी १९५६ रोजी बेळगाव येथील झालेल्या आंदोलनात ज्यांनी हुतात्मा पत्करले ते कंग्राळी खुर्दचे मारुती बेन्नाळकर यांच्या पत्नी लक्ष्मी बेन्नाळकर यांचा तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने त्यांच्या घरी जाऊन सत्कार केला. कंग्राळी खुर्दच्या माजी ग्रामपंचायत अध्यक्षा रुक्मिणी निलजकर व माजी जिल्हा पंचायत सदस्य सरस्वती पाटील …

Read More »