Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

उचगाव मराठी साहित्य संमेलनाचा मुहूर्तमेढ कार्यक्रम 8 जानेवारी रोजी

  उचगाव : उचगाव मराठी साहित्य अकादमी यांच्या विद्यमाने रविवार दिनांक 14 जानेवारी 2024 रोजी होणाऱ्या 22 व्या उचगाव मराठी साहित्य संमेलनाच्या शामियानाची मुहूर्तमेढ कार्यक्रम सोमवार दिनांक 8 जानेवारी 2024 रोजी सकाळी ठीक 9 वाजता या भागातील जागृत असे मळेकरणी देवीच्या आमराईमध्ये आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भाग्योदय …

Read More »

हॉकी बेळगावतर्फे 8 जानेवारीपासून भव्य हॉकी स्पर्धेचे आयोजन

  बेळगाव : हॉकी इंडिया आणि हॉकी कर्नाटकशी संलग्न असलेल्या हॉकी बेळगाव संघटनेतर्फे येत्या सोमवार दि. 8 ते शुक्रवार दि. 12 जानेवारी 2024 या कालावधीत मुला -मुलींच्या भव्य आंतरशालेय आणि आंतर महाविद्यालयीन निमंत्रितांच्या हॉकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. टिळकवाडी येथील नेताजी सुभाष चंद्र बोस (लेले) मैदानावर ही स्पर्धा साखळी …

Read More »

कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी : डॉ. सोनाली सरनोबत

  बेळगाव : कर्नाटकातील काँग्रेसचे सरकार हे हिंदुत्व विरोधी आहे. अयोध्येतील राममूर्ती प्रतिष्ठापनेचे काम जोरदार होणार आहे. या पार्श्वभूमीवर हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर अकारण जुने खटले उकरून काढून गुन्हे दाखल करण्याचे काम काँग्रेस सरकारने सुरू केले आहे. हे अत्यंत दुर्दैवी क अन्यायकारक आहे, असा आरोप भाजप बेळगाव जिल्हा महिला ग्रामीण विभागाच्या अध्यक्षा …

Read More »

मुलांनी फुले तोडली म्हणून अंगणवाडी मदतनीसाचे नाक कापले

  बेळगाव : महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांच्या मतदारसंघातच महिला सुरक्षित नसल्याचा प्रत्यय देणारी घटना घडली आहे. संपूर्ण बेळगाव जिल्ह्यातच महिलांवरील अत्याचाराच्या घटना एकापाठोपाठ एक उघडकीस येत आहेत. वंटमुरी गावात महिलेला विवस्त्र करून मारहाण करण्यात आली होती. ती विस्मरणात जाते न जाते तोच अंगणवाडी मदतनीस महिलेचे नाक कापून …

Read More »

मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक गुरुवारी

  बेळगाव : १७ जानेवारी हुतात्मा दिन गांभीर्याने पाळण्यासंदर्भात तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यासाठी मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सभासदांची बैठक गुरुवार दिनांक ४ जानेवारी २०२४ रोजी दुपारी ३.०० वाजता मराठा मंदिर बेळगाव येथे बोलावण्यात आली आहे. सभासदांनी वेळेवर उपस्थित राहावे असे आवाहन अध्यक्ष श्री. दीपक दळवी व कार्याध्यक्ष मनोहर किणेकर …

Read More »

शिक्षणमंत्री मधू बंगारप्पा यांच्या राजीनाम्याची मागणी करीत अभाविपचा रास्ता रोको

  बेळगाव : चेक बाऊन्स फसवणूक प्रकरणात दोषी ठरलेले शिक्षणमंत्री मधु बंगारप्पा यांनी राजीनामा देऊन नैतिक जबाबदारी स्वीकारावी, या मागणीसाठी आज अखिल भारतीय विद्यार्थी परिषद बेळगाव यांच्या वतीने आरपीडी सर्कलमध्ये रास्ता रोको करण्यात आला. यावेळी अभाविप कार्यकर्ते रोहित यांनी सांगितले की, शिक्षण मंत्री मधु बंगारप्पा यांच्या विरोधात चेक बाऊन्स प्रकरणी …

Read More »

सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्या एकपात्री प्रयोग

  बेळगाव : सार्वजनिक वाचनालय बेळगावच्यावतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त उद्या बुधवार दि. 3 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी 5:30 वाजता “मी सावित्री ज्योतिराव फुले” या एकपात्री प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. महात्मा फुले रोड, शहापूर येथील मराठा सांस्कृतिक भवन येथे हा एकपात्री प्रयोग होणार आहे. सदर प्रयोग साताऱ्याच्या प्राध्यापिका कविता …

Read More »

पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे हे प्रत्येकाचे कर्तव्य : विशाल सुर्वे

  बेळगाव : ‘पर्यावरणाचा ऱ्हास टाळणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे. पालकांनी आपल्या पाल्यांना बालपणीच कमीत कमी विजेचा वापर कसा करावा, पाण्याची बचत कशी करावी आणि प्लास्टिकचा वापर कसा टाळावा याचे मार्गदर्शन केले तरच आपल्या धरणीमातेचे रक्षण होईल आणि धरणीमाता स्वच्छ व हिरवीगार होईल, न होऊन येत्या दहावीस वर्षात मोठ्या समस्येला …

Read More »

प्रेम प्रकरणावरून नावगे गावात दोन गटात हाणामारी

  बेळगाव : एका मुलीसाठी दोन गटात तुफान हाणामारी झाल्याची घटना नावगे गावात घडली. प्रेमप्रकरणावरून दोन गटात वाद झाला. हे प्रकरण इतके वाढले की, वादाने हिंसक रूप धारण केले. या घटनेनंतर गावात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रेमप्रकरणातून तरुणांमध्ये झालेल्या वादावादीत पंचाच्या घरावर मध्यरात्री दगडफेक करून घर, कार, …

Read More »

सीमावासीयांना सुद्धा वैद्यकीय सहायता निधीचे कवच!

  बेळगाव : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी वैद्यकीय मदत कक्ष उभा केला आहे. त्यातून महाराष्ट्रातील असंख्य लोकांना वैद्यकीय सुविधा मिळाल्या आहेत. आजपर्यंत सुमारे दीडशे कोटी रुपयांचा निधी या वैद्यकीय मदत कक्षाद्वारे वाटप करण्यात आला आहे. हीच वैद्यकीय सेवा सीमाभागातील लोकांसाठी लागू करण्यात आली होती. मात्र त्यासाठी लागणारी कागदपत्रांची पूर्तता …

Read More »