बेळगाव : मराठी विद्यानिकेतन बेळगाव येथे आज दिनांक 10 मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज व संत बसवेश्वर यांची जयंती साजरी करण्यात आली व त्याचबरोबर दहावीच्या बोर्ड परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालेल्या सर्व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रथमता छत्रपती शिवाजी महाराज व संत महात्मा बसवेश्वर यांच्या फोटोचे पूजन करण्यात आले.
यावेळी शाळा सुधारणा समितीचे अध्यक्ष सुभाषराव ओऊळकर, उपाध्यक्ष सुरेश पाटील, सदस्य शिवाजी अतिवाडकर, मुख्याध्यापक नारायण उडकेकर, गजानन सावंत व्यासपीठावर उपस्थित होते. श्री. इंद्रजीत मोरे यांनी संत बसवेश्वर यांच्या विषयी आपले मनोगत व्यक्त केले. यानंतर इयत्ता दहावीच्या परीक्षेमध्ये प्रथम श्रेणीत शाळेचे 17 विद्यार्थी उत्तीर्ण झाले होते या विद्यार्थ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. यामध्ये शाळेत प्रथम व जिल्ह्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेली प्रेरणा पाटील त्याचबरोबर कुशल गोरल, पार्थ हदगल, वैभवी नलवडे, प्रणव कदम, श्रावणी सायनेकर, प्राजक्ता नातू, अथर्व गुरव, संयोगिता पाटील, समीक्षा सावंत, प्रियल चौगुले, मेघा भोगण, भक्ती कदम, रेणुका भातकांडे, करण पाटील, गौतमी उघडे, सेजल अगसगेकर या सर्व विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला..यावेळी शाळेचे शिक्षक बी. बी. शिंदे, डी एस मुतगेकर, सीमा कंग्राळकर, गौरी ओऊळकर, धीरज सिंह राजपूत, महेश हगीदळे, बी.एम पाटील, प्रसाद सावंत, दत्ता पाटील, हर्षदा सुंठणकर, रेणू सुखकर, शाहीन शेख, पद्मजा कुऱ्हाळकर, श्वेता सुर्वे, अरुण बाळेकुंद्री, बाळकृष्ण मनवाडकर, विद्यार्थी व पालक उपस्थित होते. सूत्रसंचालन सविता पवार व आभार शिल्पा सूर्यवंशी यांनी मांडले.