बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने चैत्रोत्सव अपूर्व उत्साहात जीजीसी सभागृहात साजरा करण्यात आला. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीप्रज्वलन करून तसेच भारतमाता व स्वामी विवेकानंदांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करण्यात आले. त्यानंतर शुभदायी गौरीदेवी पूजन करून महाआरती तसेच भजन गायन करण्यात आले.
भारत विकास परिषदेचे अध्यक्ष विनायक मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. जे. जी. नाईक, विद्या इटी आणि प्रा. अरुणा नाईक यांनी आपले विचार प्रकट केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांनी नवीन सदस्यांना शपथ देवविली. रजनी गुर्जर, रक्षा पाटील, अक्षता मोरे, उमा यलबुर्गी, पूर्णा प्रभू व स्वरा मोरे यांनी वैयक्तीक गीतांचे सुंदर सादरीकरण केले. त्यानंतर महिलांसाठी हळदीकुंकू तसेच विविध बौद्धिक स्पर्धा घेण्यात आले. विजेत्यांना व्ही. एन. जोशी यांच्या हस्ते गौरविण्यात आले.
ज्योती प्रभू यांनी नेटके सूत्रसंचालन केले. रोहिणी पाटील व उमा यलबुर्गी यांनी कार्यक्रम संयोजन केले. सेक्रेटरी के. व्ही. प्रभू यांनी आभार मानले. कार्यक्रमास डाॅ. व्ही. बी. यलबुर्गी, सुहास गुर्जर, सुभाष मिराशी, व्ही. आर. गुडी, जयंत जोशी, चंद्रशेखर इटी, विनायक घोडेकर, मालतेश पाटील, रामचंद्र तिगडी, पी. जी. घाडी, विजय कुलकर्णी, शुभांगी मिराशी, लक्ष्मी तिगडी, प्रिया पाटील, तृप्ती देसाई, ॲड. बना कौजलगी, नंदिता, ज्योत्स्ना गिलबिले, शालिनी नायक आदि उपस्थित होते.