Saturday , December 13 2025
Breaking News

बेळगाव

जगातील दुसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या खादी राष्ट्रध्वजाचे अनावरण

  बेळगाव : सुवर्णसौधच्या भव्य पायऱ्यांवर मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वात मोठा खादी राष्ट्रीय ध्वज प्रस्तुत करून त्याचे अनावरण केले. यावेळी बोलताना मुख्यमंत्री सिद्धरामय्या म्हणाले की, “आपल्या देशात अनेक जाती आणि धर्म आहेत. आपण धर्मनिरपेक्ष राहायला हवे. एका माणसाने दुसऱ्या माणसावर प्रेम करावे, द्वेष करू नये. हे समतावादी …

Read More »

महाराष्ट्र आणि समितीचा हिवाळी अधिवेशनाच्या सभागृहात घेतला धसका!

  बेळगाव : कर्नाटकातील काही मंत्री आणि लोकप्रतिनिधींना महाराष्ट्र, बेळगावातील मराठी भाषिक आणि महाराष्ट्र एकीकरण समिती यांच्या विषयी मनात नेहमीच आकस असल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. काल महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने महामेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. काल दिवसभर सुवर्णसौध मध्ये बेळगाव शहरात मराठी भाषिक आणि महाराष्ट्रीय एकिकरण समितीने केलेल्या आंदोलनाची …

Read More »

युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट; सीमाभागातील मराठी बांधवांच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन

  बेळगाव : बेळगावमध्ये कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नेत्यांवर, शिवसैनिक आणि मराठी कार्यकर्त्यांवर काल, ८ डिसेंबर २०२५ रोजी झालेली दडपशाही आणि अटकेची कारवाई अत्यंत निषेधार्ह आहे. कर्नाटक सरकारच्या या लोकशाहीविरोधी वागणुकीचा सीमाभागातील मराठी माणूस तीव्र शब्दांत धिक्कार करत आहे. गेल्या अनेक दशकांपासून बेळगाव आणि सीमाभागातील मराठी बांधव केवळ भाषेच्या आधारावर …

Read More »

चर्मकार समाजाची उद्या ‘चलो सुवर्णसौध’ची हाक

  बेळगाव : चर्मकार समाजाने उद्या बुधवारी ‘चलो सुवर्णसौध’ची हाक दिली आहे. आपल्या विविध मागण्यांसाठी कर्नाटक राज्य चर्मकार संघ बंगळूर आणि जिल्हा विभागाच्या वतीने बुधवार दिनांक 10 डिसेंबर रोजी बेळगाव सुवर्णसौध येथे आंदोलन छेडण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने चर्मकार समाज बांधवांसाठी श्री शिवशरण हरळय्या विकास निगमची स्थापना करण्यात यावी व …

Read More »

बेळगाव अधिवेशनात बळ्ळारी नाल्याच्या विकासावर चर्चा होईल का?

  बेळगाव : बेळगाव सुवर्णसौधमध्ये हिवाळी अधिवेशन सुरु आहे आणि तिथे उत्तर कर्नाटक विकासावर विशेष चर्चा होणार आहे असे कळते. त्या लक्षवेधी चर्चेत गेल्या अनेक वर्षांपासून रेंगाळलेला बळ्ळारी नाल्याचा विकास नसल्याने परिसरातील दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना दरवर्षी खरीप, रब्बी पीकं घेणे मुश्कीलच झाले नाही. तर अवाढव्य पैसा खर्च करुन हाती कांहीच …

Read More »

महात्मा गांधी संस्थेकडून कावळेवाडी प्राथमिक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाणी उपलब्ध

  कावळेवाडी : येथील राष्ट्रपिता महात्मा गांधी सामाजिक संस्था व वाचनालयतर्फे गावातील प्राथमिक शाळेत स्वच्छ पिण्याचे पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आले. अध्यक्षस्थानी शाळा सुधारणा कमिटीचे अध्यक्ष राजू बुरुड उपस्थित होते. प्रारंभी शाळेच्या प्रभारी मुख्याधिपिका वैशाली कणबरकर यांनी उपस्थित मान्यवरांचे गुलाब पुष्प देऊन स्वागत केले गावातील प्राथमिक शाळेची समस्या लक्षात …

Read More »

समिती नेत्यांची धरपकड; महाराष्ट्र-कर्नाटक बससेवेवर परिणाम

  बेळगाव : महामेळाव्याच्या पार्श्वभूमीवर समिती नेते व कार्यकर्त्यांची पोलीस प्रशासनाने धरपकड केल्याने त्यांचे संतप्त प्रतिसाद महाराष्ट्र उमटले आहेत. त्याचाच परिणाम म्हणून दोन्ही राज्यातील बस सेवा तात्पुरती बंद करण्यात आली असून सीमा भागात तणावाचे वातावरण आहे. कर्नाटक – महाराष्ट्र सीमेवर शिवसेना ठाकरे गट आणि कन्नड संघटनांकडून निषेध करण्यात आले. आजपासून …

Read More »

वनमंत्री ईश्वर खांड्रे यांची बेळगाव प्राणीसंग्रहालयातील काळवीट विभागाला भेट

  बेळगाव : भुतरामनहट्टी येथील कित्तुर राणी चन्नम्मा प्राणीसंग्रहालयाला वनमंत्री ईश्वर बी खांड्रे यांनी आज भेट देऊन तेथील परिस्थितीची पाहणी केली. त्याचबरोबर प्राणी संग्रहालयातील वन्य प्राण्यांची अधिक काळजी घेण्याचे निर्देश दिले. हिवाळी अधिवेशनादरम्यान आजच्या पहिल्या दिवशी विधान परिषदेत बेळगावच्या प्राणिसंग्रहालयातील 31 काळवीटांच्या मृत्यू बाबत गंभीर चर्चा झाली होती. या पार्श्वभूमीवर …

Read More »

मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट आणि गोकाक जिल्हा स्थापनेची मागणी

  बेळगाव : जिल्हा पालकमंत्री सतीश जारकीहोळी आणि आमदार भालचंद्र जारकीहोळी यांच्या नेतृत्वाखालील गोकाक जिल्हा संघर्ष समितीच्या शिष्टमंडळाने सोमवारी बेळगाव येथील सर्किट हाऊस येथे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांची भेट घेतली आणि गोकाक जिल्हा स्थापनेची मागणी करणारे निवेदन सादर केले. शिष्टमंडळाने बेळगाव जिल्ह्याचे विभाजन करण्यासाठी पावले उचलावीत आणि प्रशासकीय आणि विकासात्मक कारणांसाठी …

Read More »

शेतकऱ्यांच्या हक्कासाठी २५ हजार शेतकरी उद्या सुवर्णसौधला घेराव घालणार

  बेळगाव : राज्य सरकारच्या विरोधात अन्नदात्यांचा संताप अनावर झाला असून, उद्या शेतकरी सुवर्णसौधला घेराव घालणार आहेत. शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि नुकसानभरपाईतील विलंबाबद्दल भाजप नेते आर. अशोक आणि बी. वाय. विजयेंद्र यांनी सरकारला धारेवर धरले. ९ डिसेंबर रोजी भाजपचे प्रदेशाध्यक्ष बी. वाय. विजयेंद्र आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते आर. अशोक यांनी मालिनी …

Read More »