Sunday , July 26 2026
Breaking News

सार्वजनिक वाचनालयातर्फे ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा

Spread the love

 

बेळगाव : सार्वजनिक वाचनालय, बेळगाव या संस्थेच्यावतीने मराठी भाषेबद्दल चर्चासत्र व पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्याद्वारे ‘मराठी भाषा गौरव दिन’ नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

गणपत गल्ली बेळगाव येथील सार्वजनिक वाचनालयाच्या सभागृहामध्ये या मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वाचनालयाचे अध्यक्ष नेताजी जाधव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमाच्या प्रारंभी वाचनालयाच्या कार्यकारिणीचे सदस्य दिवंगत अनंत जांगळे यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. नेताजी जाधव यांनी शोक प्रस्ताव मांडला. तसेच त्यांनी प्रमुख वक्ते सरकारी सरदार्स हायस्कूल बेळगावचे शिक्षक रणजीत चौगुले, वाचक प्रकाश पिराळे दि बेकर्स को-ऑप. सोसायटीचे चेअरमन राजाराम सूर्यवंशी आणि साई गणेश को-ऑप. सोसायटीचे चेअरमन यल्लाप्पा नागोजीचे यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. त्यानंतर पुस्तक प्रदर्शनाचे उद्घाटन वक्ते रणजीत चौगुले यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाले.

याप्रसंगी मराठी भाषेबद्दल आयोजित केलेल्या चर्चासत्रात वक्ते रणजीत चौगुले यांनी मराठी भाषा समृद्ध करण्यात बेळगावातील साहित्यिकांचेही फार मोठे योगदान असल्याचे सांगून त्या साहित्यिकांची आठवण करून दिली. वाचनालयाचे नियमित वाचक प्रकाश पिराळे यांनीही चर्चासत्रात सहभाग दर्शवला होता. कार्यक्रमास सार्वजनिक वाचनालयाचे पदाधिकारी, सदस्य वाचक आणि मराठी भाषा साहित्यप्रेमी बहुसंख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कार्यवाह लता पाटील यांनी केले, तर प्रसन्न हेरेकर यांनी सर्वांचे आभार मानले. मराठी भाषा गौरव दिनाच्या निमित्ताने यावेळी आयोजित गोवा बुक फेस्टिव्हलमध्ये खरेदी केलेल्या पुस्तकाच्या प्रदर्शनाला साहित्यप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

About Belgaum Varta

Check Also

बेळगाव सीसीबीची धडक कारवाई; खुनाच्या गुन्ह्यातील फरार आरोपी गांजासह अटकेत

Spread the love    गोव्यातून गांजा आणून विक्रीचा प्रयत्न; १.७०४ किलो गांजा, मोबाईल जप्त बेळगाव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *