Monday , June 1 2026
Breaking News

कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूलच्या मुलांनी तयार केला बोलीभाषा शब्दकोश

Spread the love

 

बेळगाव : कॅन्टोनमेंट बोर्ड मराठी हायस्कूल, कॅम्प शाळेतील मुलांनी गेली दोन वर्ष शोध घेऊन बेळगाव परिसरात बोलल्या जाणाऱ्या बोलीभाषेतील शब्द, वाक्प्रचार हा शब्दांचा अमुल्य ठेवा ऋणानुबंध हे शिर्षक देऊन. हस्तलिखित ग्रंथाद्वारे जपून ठेवण्याचा अभिनव उपक्रम करून मराठी राज भाषा दिनी प्रकाशन सोहळा पार पडला.
भाषाप्रेमी, तसेच भाषा अभ्यासकांना सुद्धा हा ग्रंथ मैलाचा दगड ठरेल असे उदगार शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. एन. बी. गावडे मॅडम यांनी काढले.
शाळेत नेहमीच नवनवीन उपक्रम होत असतात. पण हा शब्दांचा अमृतसाठा पुढील पिढीला वाचता यावा या उद्दात्त हेतूने हा ग्रंथ तयार केला असून या विद्यार्थ्यांना शाळेचे शिक्षक कुंभार सर यांचे मार्गदर्शन लाभले आहे. तर शाळेच्या मुख्याध्यापिका गावडे मॅडम यांची प्रेरणा मिळाली.
ऋणानुबंध शब्दकोशाचे प्रकाशन शाळेच्या मुख्याध्यापिका, शब्दकोशाचे हस्तलेखन करणारे विद्यार्थी आणि शाळेचे शिक्षक, विद्यार्थी यांच्या उपस्थितीत सोहळा पार पडला.

About Belgaum Varta

Check Also

सीमाप्रश्न सुटेपर्यंत लढा सुरूच; कन्नडसक्ती आंदोलनातील हुतात्म्यांना अभिवादन

Spread the love  बेळगाव : सीमाप्रश्नाची कायमस्वरूपी सोडवणूक होईपर्यंत मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीचा लढा सुरूच …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *