बेळगाव : धामणे ग्रामपंचायतीच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5च्या पोटनिवडणुकीत यल्लाप्पा रेमानाचे यांनी आपल्या प्रतिस्पर्ध्यांना पराभूत करून विजय संपादन केला आहे. धामणे ग्रामपंचायतच्या कुरबरहट्टी, धामणे वार्ड नं. 5 ची पोटनिवडणूक गेल्या रविवारी पार पडली. या निवडणुकीसाठी 951 पैकी 810 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. मतमोजणीनंतर आज बुधवारी या निवडणुकीचा …
Read More »जिल्ह्यातील धबधब्यांच्या भेटींवर निर्बंध : जिल्हाधिकारी नितेश पाटील
बेळगाव : अनेक दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून जनतेला जिल्ह्यातील सर्व पाण्याच्या धबधब्याजवळ जाण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. धबधब्याजवळ येताना फूटपाथ कोसळल्याने अनेकांना जीव गमवावा लागल्याच्या घटना राज्यभरात नोंदल्या जात आहेत. अशा दुर्घटना टाळण्यासाठी जिल्ह्यातील धबधब्याजवळील हालचालींवर निर्बंध घालण्यात आले …
Read More »गणेशोत्सव मंडळांना वीज बिलात सवलत द्या
मध्यवर्ती महामंडळाची मागणी; पालकमंत्री जारकीहोळींना निवेदन बेळगाव : हेस्कॉमने वीजदरात मोठी वाढ केल्यामुळे सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना आर्थिक फटका बसणार आहे. त्यामुळे मंडळांना वीज बिलात सवलत देण्यात यावी. तसेच गणेशोत्सवाबाबत लवकर बैठक बोलवावी, अशी मागणी मध्यवर्ती सार्वजनिक गणेशोत्सव महामंडळातर्फे करण्यात आली आहे. यासंदर्भात पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांना निवेदन देण्यात आले. …
Read More »रमाकांत कोंडुसकर यांनी घेतली विस्थापित विणकर कुटुंबांची भेट
बेळगाव : कल्याणनगर, वडगाव येथे मुसळधार पावसामुळे पडझड झालेल्या घरांना आज सकाळी श्रीराम सेना हिंदुस्थानचे अध्यक्ष व म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांनी भेट देऊन पाहणी केली. तसेच संबंधित कुटुंबीयांना नुकसान भरपाई मिळवून देण्याचे आश्वासन दिले. सध्या पडणाऱ्या पावसामुळे कल्याणनगर, वडगाव येथील प्रेमा परशराम ढगेन्नावर, प्रसाद बसवराज मळी …
Read More »सांबरा ग्रा. पं. अध्यक्षपदाच्या निवडणुकीत रचना गावडे विजयी तर उपाध्यक्षपदी मारुती जोगाणी
सांबरा : सांबरा ग्रामपंचायत अध्यक्ष-उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांनी बाजी मारली. अध्यक्षपदी रचना राहुल गावडे तर उपाध्यक्षपदी मारुती टोपाण्णा जोगाणी हे निवडून आले आहेत. मंगळवार दि. २५ रोजी अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक जाहीर करण्यात आली होती. अध्यक्षपद सामान्य महिला तर उपाध्यक्षपद सामान्य पदासाठी जाहीर करण्यात आले होते. अध्यक्षपदासाठी भाजपातर्फे रचना …
Read More »आंबेवाडी ग्रामपंचायतीवर पुन्हा समितीचा झेंडा…
अध्यक्षपदी लक्ष्मी यळगूकर तर उपाध्यक्ष पदी शंकर सुतार हिंडलगा : गेल्या अडीच वर्षांपूर्वी समिती नेते आर. एम. चौगुले यांच्या नेतृत्वाखाली आंबेवाडी ग्रामपंचायतीवर चेतन पाटील यांना अध्यक्ष करून महाराष्ट्र एकीकरण समितीचा भगवा फडकवला होता. यावेळी विधानसभेच्या निवडणुकीत समितीच्या उमेदवाराचा पराभव झाल्यामुळे सगळ्या ग्रामपंचायतीवर आपलीच सत्ता येणार असे मनसुबे बाळगणाऱ्यांना चांगलीच …
Read More »दूधसागर जवळ दरड कोसळल्याने रेल्वे वाहतूक ठप्प
बेळगाव : ब्रागांझा घाट सेक्शनवरील कॅसलरॉक आणि कारनझोल स्थानकांदरम्यान मंगळवारी सायंकाळी उशिरा दरड कोसळल्याने दक्षिण पश्चिम रेल्वे मार्गावरील रेल्वे वाहतूक ठप्प झाली. अनेक गाड्या रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती रेल्वे वेस्ट विभागाने दिली आहे. दूधसागरला जाणाऱ्या रस्त्यावर कॅसलरॉक पासूनच्या तिसऱ्या बोगद्याजवळ दरड कोसळली आहे. रेल्वे वाहतूक सायंकाळपासून बंद आहे. …
Read More »पुढील 24 तासांत कर्नाटकसह अनेक ठिकाणी पूरस्थिती; हवामान खात्याचा अंदाज
बेळगाव : बुधवारी उत्तर कर्नाटकातील अनेक ठिकाणी मोठ्या पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने पुढील 24 तासांत कोस्टल कर्नाटक, कोकण आणि गोवा, एन.आय कर्नाटक, लगतच्या तेलंगणा आणि महाराष्ट्रातील अनेक परिसरात हवामान उपविभागातील काही पाणलोट आणि परिसरांमध्ये मध्यम स्वरूपाच्या पुराचा धोका संभवतो. पुढील 24 तासांत अपेक्षित पावसाच्या घटनेमुळे …
Read More »बेळगाव शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांनाही सुट्टी जाहीर
बेळगाव : बेळगाव शहर व ग्रामीण भागातील प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात येणार असल्याचे जिल्हाधिकारी नितेश पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी सुट्टी जाहीर केली जाते. केवळ खानापूर तालुक्यात शाळांसह पीयू महाविद्यालयांना सुट्टी देण्यात आली आहे. अंगणवाडी केंद्रांनाही सुट्टी बेळगाव, खानापूर, मुदलगी, सौंदत्ती, यरगट्टी आणि निप्पाणी तालुक्यातील …
Read More »येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक उद्या
बेळगाव : येळ्ळूर ग्रामपंचायत अध्यक्ष- उपाध्यक्ष निवडणूक-उद्या बुधवार दि. २६ रोजी होणार आहे. अध्यक्षपद सामान्य महिलेसाठी आहे तर उपाध्यक्षपद सामान्यसाठी आले आहे. ग्रामपंचायतवर म. ए. समितीची सत्ता आहे. त्यामुळे समितीच्या उमेदवार अध्यक्ष-उपाध्यक्ष होणार हे निश्चित झाले आहे. सध्या म. ए. समितीचे १७ सदस्य आहेत. तर भाजपचे दहा आणि काँग्रेसचे …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta