Sunday , December 14 2025
Breaking News

बेळगाव

फिल्मी स्टाईलने लांबविली महिलेच्या गळ्यातील सोनसाखळी

  बेळगाव : फिल्मी स्टाईल पद्धतीने महिलेचा पाठलाग करत मोटरसायकल वरून येऊन चाकूचा धाक दाखवत गळ्यातील 20 ग्राम वजनाची अंदाजे एक लाख वीस हजाराची सोनसाखळी लांबून भामट्याने पलायन केल्याची घटना सोमवारी रात्री 8-45 च्या दरम्यान खानापूर रोड मच्छे येथे घडली. वीणा धोंडीराम तारणाळे मजगावकर नगर मच्छे असे सोनसाखळी लूटलेल्या महिलेचे …

Read More »

सावगाव रोडवरील अपघातात जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू

  बेळगाव : अशास्त्रीय पद्धतीने घातलेल्या गतिरोधकावरून पडून जखमी झालेल्या अभियांत्रिकी विद्यार्थ्यांचा सोमवारी खाजगी इस्पितळात उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. सावगाव रोड वरील अंगडी कॉलेज जवळ ही घटना घडली आहे ऋषिकेश सत्यप्रमोद कुलकर्णी (वय 27) राहणार बुधवार पेठ टिळकवाडी असे मृत विद्यार्थ्यांचे नाव आहे. बुधवार दिनांक 12 जुलै रोजी दुचाकीवरून कॉलेजला …

Read More »

भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस उत्साहात

  बेळगाव : भारत विकास परिषदेच्यावतीने 60 वा स्थापना दिवस तसेच डाॅक्टर्स डे असा संयुक्त कार्यक्रम रविवारी सायंकाळी उत्साहात साजरा करण्यात आला. प्रमुख अतिथी म्हणून डाॅ. अशोक खोबरे उपस्थित होते. प्रारंभी विनायक मोरे यांनी संपूर्ण वंदे मातरम सादर केले. प्रांत अध्यक्ष स्वाती घोडेकर यांच्या हस्ते भारतमातेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर …

Read More »

मुडलगी हत्या प्रकरणी पत्नी, प्रियकराला अटक

  बेळगाव : अमावस्येच्या मुहूर्तावर मंदिरात आलेल्या पतीचा निर्घृण खून केल्याप्रकरणी पोलिसांनी खून केल्याप्रकरणी पत्नी व प्रियकराला अटक केली आहे. विद्यार्थी श्रीधर अर्जुन तलवार (21) आणि सिद्धव्वा उर्फ ​​प्रियंका शंकर जगम्मट्टी (21) यांना अटक करण्यात आली आहे. मुदलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात सोमवारी ही घटना घडली. शंकर सिद्धप्पा जगम्मट्टी (२७) असे …

Read More »

जैनमुनी हत्या प्रकरण; आरोपींना न्यायालयीन कोठडी

  बेळगाव : चिक्कोडी तालुक्यातील हिरेकुडी येथील आचार्य श्री कामकुमार नंदी महाराज यांच्या खून प्रकरणातील आरोपींना 21 जूनपर्यंत न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश चिक्कोडी न्यायालयाने आज दिला. त्यामुळे आज दोन्ही आरोपींना हिंडलगा कारागृहात हलवण्यात आले आहे. जैन मुनी हत्याकांडातील आरोपी नारायण माळी आणि हसन धालायत हे गेल्या सात दिवसांपासून पोलिस कोठडीत …

Read More »

अरबाजच्या मारेकऱ्यांवर कठोर कारवाई करा; पिरनवाडी ग्रामस्थांचा भव्य मोर्चा

  बेळगाव : बेळगाव तालुक्यातील पिरनवाडी गावातील अरबाज रफिक मुल्ला या युवकाचा प्रशांत व प्रसाद नामक युवकांनी ‘बर्थ डे पार्टी करूया ये’ असे सांगून घरातून बोलावून नेऊन निर्घृण हत्या केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी बेळगाव ग्रामीण पोलिसांनी तातडीने तपासाची चक्रे हलवत आरोपींना अटक केली आहे. मात्र या आरोपींना फाशीची …

Read More »

मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी येथे तरूणाचा निर्घृण खून

  बेळगाव : अमावस्येनिमित्त मंदिरात आलेल्या एका व्यक्तीची निर्घृण हत्या केल्याची घटना बेळगाव जिल्ह्यातील मुडलगी तालुक्यातील वढेरहट्टी गावात घडली. शंकर सिद्धप्पा जगमट्टी (२७) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अमावस्येनिमित्त हे जोडपे बनसिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. पाच-सहा महिन्यांपूर्वी लग्न झालेल्या शंकर सिद्धप्पा जगमट्टी याची मंदिर परिसरात निर्घृण हत्या करण्यात आली …

Read More »

बॅंक खात्याला आधार लिंक गरजेचे!

  बेळगाव : राज्य सरकारने अन्नभाग्य योजना जारी केली आहे. या अंतर्गत प्रत्येक लाभार्थ्यांला 170 रु. शासनाकडून देण्यात येत आहेत. मात्र काही लाभार्थ्यांची बँक खाती निष्क्रिय झाली आहेत. तर काही लाभार्थ्यांची बँक खातीच नाहीत अश्या लाभार्थ्यांपर्यंत सरकारी योजना पोचविताना अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्वप्रथम लाभार्थ्यांनी 20 जुलै पूर्वी बँक …

Read More »

आनंदनगर येथे श्रमदानातून रस्त्याची दुरुस्ती

  बेळगाव : आनंदनगर, दुसरा क्रॉस येथील छत्रपती शिवाजी युवक मंडळच्यावतीने श्रमदानातून खड्डे बुजवून रस्त्याची दुरुस्ती करण्याबरोबरच सार्वजनिक बोअरची मोटर सुद्धा दुरुस्त करण्यात आल्यामुळे नागरिकात समाधान व्यक्त होत आहे. सध्याच्या पावसाळ्यामध्ये वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सोयीचे व्हावे यासाठी प्रशासनावर विसंबून न राहता छ. शिवाजी युवक मंडळाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी स्वतःच श्रमदानाने …

Read More »

समर्थनगर येथे डेंग्यू- चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर

  बेळगाव : समर्थनगर येथील श्री एकदंत युवक मंडळ यांच्यावतीने आणि डॉ. प्रकाश राजगोळकर यांच्या सहकार्याने डेंग्यू आणी चिकूणगुनिया प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या मूर्तीचे पुजन केल्यानंतर श्रीफळ वाढवून शिबिराला चालना देण्यात आली. यावेळी समर्थ नगर मलिकार्जुन नगर भागातील नागरिकांना डेंग्यू आणी चिकूणगुनिया …

Read More »