Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

बेळगावचे संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना पंडित चिदानंद जाधव स्मृती युवा गंधर्व पुरस्कार 2022 प्रदान

बेळगाव : सोलापूर येथे संपन्न झालेल्या समारंभात बेळगावचे युवा संवादिनी वादक सारंग कुलकर्णी यांना ‘पंडीत चिदानंद जाधव युवा गंधर्व’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. रुपये अकरा हजार आणि सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून सोलापूरचे पोलिस आयुक्त हरीश बैजल यांच्या हस्ते तो प्रदान करण्यात आला. यावेळी संयोजक भीमण्णा जाधव, डॉ. श्रीकांत …

Read More »

मच्छे शाळेतील विद्यार्थ्यांना देण्यात आली कोविड लस

आरोग्याची काळजी घेण्याचे मच्छे पालिका मुख्याधिकारी शिवकुमार यांनी केले विद्यार्थ्यांना आवाहन बेळगाव : मच्छे येथील सरकारी आदर्श मराठी आणि कन्नड शाळेत कोविड लसीकरण मोहीम राबविण्यात आली. या अभियानांतर्गत इयत्ता सहावी आणि सातवीच्या विद्यार्थ्यांना कोविड लस देण्यात आली. मच्छे नगरपालिका मुख्य अधिकारी शिवकुमार यांनी दीपप्रज्वलित करून लसीकरण अभियानाला चालना दिली. मागील …

Read More »

उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या स्नुषेचा राज्यपालांच्या हस्ते गौरव

बेळगाव : महाराष्ट्र व कर्नाटक राज्यात आजपर्यंत केलेल्या उल्लेखनीय सामाजिक कार्याबद्दल बेळगावच्या सामाजिक कार्यकर्त्या राजश्री राजेश तुडयेकर यांना आज मुंबई येथे आयोजित सोहळ्यात महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोशयारी यांच्या हस्ते राष्ट्रीय सेवा सन्मान पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मुंबई येथील गऊ भारत भारती गोरक्षक सेवा ट्रस्टतर्फे आज शनिवारी सकाळी सातवा वर्धापन दिन …

Read More »

वादळी वाऱ्यासह पावसाने झोडपले

बेळगाव : बेळगाव शहर परिसराला आज दुपारी विजांचा कडकडाट आणि वादळी वाऱ्यासह जवळपास अर्धा तास पावसाने झोडपल्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पाऊस व सोसाट्याचा वाऱ्यामुळे कांही ठिकाणी घरांच्या पडझडीच्या घटना घडल्या तर कांही रस्त्यांवर झाडे व झाडाच्या फांद्या कोसळून वाहतूक विस्कळीत होण्याचे प्रकार घडले. बेळगाव शहर परिसरासह तालुक्याला आज शनिवारी दुपारी …

Read More »

मॉडेल सायन्स अँड कॉमर्स कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ संपन्न

बेळगाव (प्रतिनिधी) : बेळगाव एज्युकेशन सोसायटी संचलित मॉडेल सायन्स अँड कॉमर्स इंटिग्रेटेड पीयू कॉलेज आणि अर्थ कोटा करियर अकॅडमीमधील पीयूसी द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ आणि वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवारी पार पडले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून बेळगावचे एसीपी एन. एस. बरमनी उपस्थित होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुनील काकतकर, संचालक अमित …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समितीच्या पाठपुराव्याला यश

बेळगाव : सलगरे जि.सांगली ते कर्नाटक हद्दी पर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली होती त्यामुळे सीमाभागातील अथणी तालुक्यातील गावातील सीमावासीयांना त्रास सहन करावा लागत होता त्या संदर्भात सांगलीचे मा.जिल्हाधिकारी साहेब याना हा रस्ता तातडीने दुरुस्ती करावा यासाठी मेलद्वारे निवेदन पाठवण्यात आले होते त्याची दखल घेऊन मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी प्रथम सार्वजनिक बांधकाम …

Read More »

भर रस्त्यात पतीकडून पत्नीचा निर्घृण खून

बेळगाव : घटस्फोटाबाबत न्यायालयात खटला सुरू असलेल्या पतीने पत्नीचा धारदार शस्त्राने हल्ला करत निर्घृण खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडली आहे. हिना कौसर नदाफ (वय 24) रा. चिंच मार्केट उज्वल नगर बेळगाव असे या मयत महिलेचे नाव आहे. शुक्रवारी दुपारी किल्ला तलावाजवळ घडलेल्या या खून नाट्याचा थरार पहाण्यासाठी …

Read More »

जिल्हा प्रशासनातर्फे ज्योती कोरी यांचा सत्कार

बेळगाव : कोलंबो येथे नुकत्याच झालेल्या निमंत्रितांच्या श्रीलंका मास्टर्स शॉर्ट कोर्स जलतरण अजिंक्यपद स्पर्धेत 4 सुवर्ण व 2 कांस्य पदकांची घसघशीत कमाई करून बेळगावचे पर्यायाने देशाचे नांव उज्ज्वल करणार्‍या नामवंत महिला जलतरणपटू आणि कडोली प्राथमिक आरोग्य केंद्राच्या कर्मचारी ज्योती कोरी (होसट्टी) यांचा जिल्हा प्रशासनातर्फे सत्कार करण्यात आला. कोलंबो, श्रीलंका येथील …

Read More »

पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेबाबत प्राचार्यांना मार्गदर्शन

बेळगाव : पदवीपूर्व प्रथम वर्षाच्या परीक्षेसंदर्भात मार्गदर्शन करण्यासाठी बोलाविण्यात आलेली सर्व महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक आज शुक्रवारी सकाळी शहरातील आर.एल.एस. कॉलेजमध्ये पार पडली. राज्यातील पदवीपूर्व प्रथम (पीयुसी) वर्षाच्या वार्षिक परीक्षेला येत्या सोमवार दि. 28 मार्चपासून प्रारंभ होणार आहे. या परीक्षेसंदर्भात सूचना व मार्गदर्शन करण्यासाठी बेळगाव जिल्हा पदवीपूर्व शिक्षण खात्याचे उपसंचालक नागराज …

Read More »

सकल मराठा समाजाच्या मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज

बेळगाव : सीमाभागातील मराठा समाजाने एकत्र व्हावं या एकमेव उद्देशाने निर्माण झालेल्या ‘सकल मराठा समाजाच्या’ मध्यवर्ती कार्यालयाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. २५ रोजी संध्याकाळी ६.०० वाजता श्री जत्तीमठ देवस्थान बेळगाव येथे होणार आहे. तरी सर्व समाज बांधवांनी उपस्थित राहावे…

Read More »