Friday , October 18 2024
Breaking News

बेळगाव

आता नूतन पोलीस आयुक्तांकडे साकडे

बेळगाव (वार्ता) : छत्रपती शिवरायांच्या मुर्तीची बेंगलोर येथे झालेल्या विटंबनेच्या निषेधार्थ बेळगाव मध्ये निषेध करण्यात आला. मात्र पोलिसांनी त्यामध्ये अनेक तरुणांना नाहक अटक करून हिंडलगा कारागृहात डांबले आहे. अनेक तरुणांवर राज्यद्रोह सारखा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे बेकायदेशीर असून या तरुणांची तातडीने सुटका करण्यात यावी, अशी मागणी माजी नगरसेवक …

Read More »

भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगावतर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध

बेळगाव (वार्ता) : पंजाबमध्ये कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे कोलमडली होती. भाजप पक्षाने मागणी केल्याप्रमाणे गंभीर चुकांची जबाबदारी निश्चित केली पाहिजे. दोषी आढळलेल्यांना जबाबदार धरले पाहिजे, अशी मागणी करीत भाजपा महिला मोर्चा ग्रामांतर बेळगावतर्फे पंजाब काँग्रेसचा निषेध करण्यात आला. चरणजीत चन्नी यांच्या नेतृत्वाखालील पंजाब सरकारने समाजकंटकांना रीतसर पाठिंबा दिला आणि प्रोत्साहन …

Read More »

दगडफेक प्रकरणी अटक केलेल्या निष्पापांची सुटका करा

महिला संघटनांची मागणी बेळगाव (वार्ता) : बेळगावात घडलेल्या दगडफेक प्रकरणी पोलिसांनी काही निष्पापांना अटक केली आहे, त्यांची त्वरित सुटका करावी या मागणीचे निवेदन बेळगावात बुधवारी महिला संघटनांच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना देण्यात आले. बेंगळुरात अलीकडेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा विटंबनेनंतर या घटनेचा बेळगावातील धर्मवीर संभाजी चौकात निषेध करण्यात आला. त्यावेळी काही समाजकंटकांनी …

Read More »

विधान परिषद सदस्यांचा शपथविधी; चन्नराज हट्टीहोळी यांनी घेतली शपथ

बेळगाव (वार्ता) : राज्यात नुकत्याच पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकीत विजयी झालेल्या सदस्यांचा शपथविधी सोहळा आज बेंगळुरात पार पडला. यावेळी बेळगावचे एमएलसी चन्नराज हट्टीहोळी यांनीही विधान परिषद सदस्यत्वाची शपथ घेतली. नव्याने निवडून आलेल्या विधान परिषद सदस्यांचा शपथविधी गुरुवारी बेंगळुरातील विधानसौधमधील बँक्वेट हॉलमध्ये पार पडला. यावेळी सभापती बसवराज होरट्टी यांनी नव्या …

Read More »

न्यू सैनिक सोसायटीच्या विरोधात ग्राहकांची तक्रार

बेळगाव (वार्ता) : बेळगाव तालुक्याच्या न्यू सैनिक सोसायटीमध्ये गुंतवलेल्या पैशांना परत न करता सोसायटी बंद करण्यात आली आहे. त्यामुळे बेळगावकर ठेवीदारांनी आमचे पैसे परत द्या, असे आवाहन केले. येळ्ळूर येथील न्यू सैनिक सोसायटीमध्ये शेकडो ग्राहकांनी पैसे गमवले आहेत. पैसे परत मागितले असता पैसे परत करणार नाही, असे संतापजनक वक्तव्य सोसायटीच्या …

Read More »

अखेर सौंदत्ती श्री रेणुकादेवीसह बेळगाव जिल्ह्यातील मुख्य देवस्थान बंद आदेश जारी

बेळगाव (वार्ता) : कर्नाटक राज्यात कोरोना आणि ओमीक्रॉनचे संकट वाढले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने काल मंगळवारी नवे कडक निर्बंध लागू केले आहेत. आगामी दोन आठवडे रात्रीच्या कर्फ्यु बरोबरच शनिवार आणि रविवारी विकेंड कर्फ्यू लागू केला आहे. त्याचबरोबर पुढील दोन आठवडे सामाजिक, राजकीय मेळावे, समारंभावर निर्बंध लादले आहेत. मोर्चे, यात्रा …

Read More »

जिल्हा मध्यवर्ती कुस्तीगीर संघटना आयोजित रविवारचे कुस्ती मैदान लांबणीवर….

बेळगाव – मध्यवर्ती कुस्तीगीर संघटनेच्यावतीने रविवार दिनांक 9 जानेवारी रोजी बेळगावच्या आनंदवाडी येथील कुस्ती आखाड्यात जंगी कुस्त्यांचे मैदान आयोजित करण्यात आले होते. या मैदानाच्या तयारीसाठी कुस्तीगीर संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जोरदार तयारीही चालविली होती. बेळगाव परिसरातील कुस्तीगीर आणि कुस्ती शौकिनांना आनंदवाडी येथील रविवारच्या कुस्ती मैदानाचे वेध लागले होते. दरम्यान शासनाने वाढत्या कोरोना …

Read More »

स्केटिंगपटू अवनिशचा आणि आराध्याचा गौरव

बेळगाव : बेळगावचे स्केटिंगपटू अवनीश कामनावर आणि आराध्या पी. यांनी दिल्ली येथे घेण्यात आलेल्या 59 व्या नॅशनल रोलर स्केटिंग चॅम्पियनशिप स्केटिंग स्पर्धेत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवित पदक पटकाविले. 11 ते 21 डिसेंबर 2020 या दरम्यान ही स्पर्धा घेण्यात आली होती. या यशाबद्दल अवनीश कामनावर आणि आराध्या पी या स्केटिंगपटूंचा रेल्वे …

Read More »

स्मशानभूमीसाठी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन

बेळगाव (वार्ता) : कणबर्गी गावातील परिशिष्ट जातीच्या लोकांना स्मशानभूमीसाठी जागा मंजूर करावी, अशी मागणी संबंधित ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. माजी महापौर शिवाजी सुंठकर आणि माजी नगरसेवक संजय सुंठकर यांच्या नेतृत्वाखाली कणबर्गी येथील परिशिष्ट जातीच्या नागरिकांनी आज जिल्हाधिकार्‍यांना उपरोक्त मागणीचे निवेदन सादर केले. बेळगाव तालुक्यातील महानगरपालिकेच्या व्याप्ती येणार्‍या कणबर्गी …

Read More »

विमल फाऊंडेशन आयोजित भव्य कबड्डी, खो-खो स्पर्धेचे 16 जानेवारी रोजी आयोजन

बेळगाव (वार्ता) : महाद्वार रोडवरील श्री धर्मवीर संभाजी उद्यानाच्या मैदानावर विमल स्पोर्ट्स फाऊंडेशन यांच्यावतीने दुसर्‍या विमल जाधव स्मृती चषक खुल्या कबड्डी व खो-खो पुरुष व महिला स्पर्धेचे आयोजन रविवार ता. 16 जानेवारी रोजी सकाळी 9.00 वाजता प्रारंभ होणार आहे अशी माहिती विमल स्पोर्ट्स फाऊंडेशनचे अध्यक्ष किरण जाधव यांनी दिली आहे. …

Read More »