बेळगाव : श्री शेतकरी संघटना मजगाव यांच्यावतीने आणि भाजप राज्य ओबीसी युवा मोर्चाचे सचिव आणि सकल मराठा समाजाचे संयोजक किरण जाधव यांच्या सहकार्याने दिनांक 4 व 5 मार्च रोजी झालेल्या रिकामी गाडी पळविण्याच्या जंगी शर्यतीतील विजेत्यांना रोख पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. मजगाव, महामार्गावर ही शर्यत झाली होती. बैलगाडी पूजन …
Read More »उचगाव येथे पारायण सोहळ्याला प्रारंभ
उचगाव : श्री ग्रंथराज ज्ञानेश्वरी सांप्रदायिक पारायण सोहळा मार्कंडेय नदीकिनारी उचगाव येथे तुकाराम बीज ते नाथ षष्ठी अखेर आज पासून सुरुवात करण्यात आली असून मंगळवार दिनांक 14 मार्च रोजी काला कीर्तनाने या पारायण सोहळ्याची सांगता होणार आहे. हभ प बाळू भक्तीकर आणि हभप गोपाळ मरूचे यांच्या अधिष्ठानखाली या पारायण …
Read More »19 मार्चच्या शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : म. ए. समिती नेते रमाकांत कोंडुसकर यांचे आवाहन
बेळगाव : राष्ट्रीय पक्षांकडून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे दोन वेळा अनावरण करून आणि त्यांचा वापर राजकारणासाठी करून मोठा अपमान केला आहे. याविरोधात मराठी माणसाने पेटून उठले पाहिजे. संघटित झालो तरच मराठी माणसांची ताकद वाढणार आहे. त्यामुळे 19 मार्च रोजीच्या दुग्धाभिषेक आणि शुद्धीकरण कार्यक्रमाला राजहंसगडवासियांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, …
Read More »पोलिसांवर हल्ला प्रकरण; शिवप्रेमींची निर्दोष मुक्तता
बेळगाव : पोलिसांवर हल्ला करणे आणि डिजेचा कर्णकर्कश आवाज करून सर्वोच्च न्यायालयाचा अवमान केल्याच्या प्रकरणांतून चार शिवप्रेमींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. विजय मोहिते, गजानन डोंगरे, सतीश घसारी, दुर्गेश घसारी (सर्व रा. टेंगिनकेरा गल्ली) अशी निर्दोष मुक्तता झालेल्यांची नावे आहेत. शिवजयंतीनिमित्त काढण्यात आलेल्या चित्ररथ देखाव्यावेळी त्यांनी हा हल्ला केल्याचा …
Read More »मल्लिकार्जुन वृद्धाश्रमामध्ये एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा
बेळगाव : शाहूनगर येथील श्री मल्लिकार्जुन वृद्धाश्रममध्ये जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून एंजल फाउंडेशनच्या वतीने महिला दिन साजरा करण्यात आला. वृद्धाश्रमातील आजींच्या हस्ते केक कापून महिला दिन साजरा करण्यात आला. तसेच आश्रमातील आजींना बिस्कीट, पुलावचे वाटप सुद्धा करण्यात आले. एंजल फाउंडेशनच्या संस्थापिका मीनाताई बेनके यांच्या हस्ते वृद्धाश्रममधील आजींचा शाल …
Read More »शहापूर परिसरातील विहिरींचे पाणी दुषित….!
बेळगाव : गेल्या दोन वर्षांपासून खराब असलेली ड्रेनेज वाहिकेमुळे कोरे गल्ली येथील विहिरींचे पाणी दूषित झाले असून यासंबधी गेल्या महिनाभरात ७ ते ८ वेळा तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग अभियंता यांच्याकडे करण्यात आली, पण हे तात्पुरती व्यवस्था करत असल्यामुळे पुन्हा पुन्हा ड्रेनेज वाहिका खराब तर होतच आहे पण विहिरी कायमस्वरुपी …
Read More »विजय संकल्प यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती : डॉ. रवी पाटील
बेळगाव : भाजपच्या विजय संकल्प यात्रेमुळे कार्यकर्त्यांमध्ये स्फूर्ती निर्माण झाली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत जास्तीतजास्त जागा जिंकण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. रवी पाटील यांनी केले. विजय संकल्प यात्रेला सुरुवात झाल्यानंतर ते बोलत होते. भाजप आमदारांनी आपल्या कार्यकाळात मतदारसंघात अपेक्षेपेक्षा अधिक विकासकामे करून प्रभाव पाडला आहे. पक्षामध्ये कोणताही गोंधळ …
Read More »बसवेश्वर चौक खासबाग येथे कचऱ्याचे साम्राज्य
बेळगाव : बेळगाव शहरात कचरा व्यवस्थापनाचे तीन तेरा वाजले असून महानगरपालिकेचे याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वॉर्ड क्र. 27 मध्ये कचरा उचल नियमित होत नाही. अवघ्या 100 मीटर अंतरावर ब्लॅक स्पॉट आहे त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत त्यामुळे त्या ठिकाणी कचरा टाकणे बंद झाले आहे. मात्र सफाई …
Read More »उत्तर मतदारसंघात विविध विकासकामांचे भूमिपूजन
बेळगाव : आमदार ॲड. अनिल बेनके यांच्या प्रयत्नामुळे सार्वजनिक बांधकाम खाते आणि बेळगाव महापालिकेच्या अनुदानातून हाती घेतलेल्या बेळगाव उत्तर मतदार संघातील विविध विकासकामांचा आज भूमिपूजनाद्वारे शुभारंभ करण्यात आला. सार्वजनिक बांधकाम विभाग व बेळगाव महानगरपालिकेच्या अनुदानातून आज गुरुवारी अशोकनगर, बेळगाव येथील 15 व्या क्राॅसमागील क्रांतिवीर संगोळी रायण्णा शाळेजवळ रस्ता व …
Read More »ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना डॉक्टरेट
बेळगाव : बेळगाव तालुक्याच्या कानाकोपऱ्यात कष्टकरी चळवळीला मार्गदर्शन करणारे ज्येष्ठ सर्वोदयी कार्यकर्ते शिवाजी कागणीकर यांना कर्नाटक राज्य पंचायत विभागाने मानद डॉक्टरेट ही पदवी देवून गौरविले आहे. या पदवीमुळे सीमाभागातील एका श्रमजीवी कार्यकर्त्याचा गौरव झाला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. रोजगार हमी योजनेत राबणाऱ्या कष्टकरी बांधवांना त्यांचा अधिकार मिळावा, यासाठी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta