आमदार राजेश पाटील यांनी केलेल्या मागणीनुसार मंत्रालयात झाली बैठक चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड व आजरा तालुक्यातील आरोग्याची व्यवस्था सक्षम करण्यासाठी सदरच्या ग्रामीण रुग्णालयाची क्षमता वाढविण्याचा निर्णय आरोग्य विभागामार्फत करण्यात येईल, असे राज्याचे आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी सांगितले. चंदगड व आजरा ग्रामीण रुग्णालयासंदर्भात मंत्रालयात आमदार राजेश पाटील यांनी …
Read More »उमगाव येथे जिओ टॉवरसमोर युवावर्गाचे निषेध आंदोलन…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील उमगाव येथील जिओ टॉवर अनेक वर्ष उभारूनही आजतागायत बंद असल्याने प्रशासन व कंपनीविषयक निषेध व्यक्त करत शेकडो युवकांनी एकत्र येत निषेध आंदोलन केले. गेली कित्येक वर्षे या जांबरे भागात नेटवर्क टॉवर नसल्याने सर्व ग्रामस्थ व युवावर्गाची गैरसोय होत आहे. या भागात अनेक गावे येत …
Read More »गडहिंग्लज सीमेलगत कर्नाटक हद्दीतील गावांना रुग्णालय सेवा उपलब्ध करून द्यावी
महाराष्ट्र एकीकरण युवा समितीमार्फत गडहिंग्लज तालुका प्रशासनाला निवेदन बेळगाव : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती मार्फत गडहिंग्लज तालुका प्रशासनाला गडहिंग्लज सीमेलगत कर्नाटक हद्दीतील गावांना सुद्धा रुग्णालय सेवा उपलब्ध करून द्यावी याबाबत निवेदन देण्यात आले. गडहिंग्लज हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर असणारा तालुका आहे, कर्नाटक सीमेवरील बहुतांश गावांचे नागरिक बाजार आणि रूग्णालयासाठी गडहिंग्लज …
Read More »कोल्हापूर : हुपरीच्या चांदी व्यापाऱ्याची स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या
कोल्हापूर : आजाराला कंटाळून (५५ वर्षीय) चांदी व्यापाऱ्याने पिस्तुलमधून स्वतःवर गोळी झाडून आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना आज (मंगळवार) सकाळी हुपरी येथे घडली. पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.हुपरी येथील चांदी व्यापारी कोरोनाबाधित होता. त्यांच्यावर उपचारही सुरू होते. त्यांना नुकताच डिस्चार्जही मिळाला होता. मात्र आजाराला कंटाळून त्यांनी स्वतःवर पिस्तूलातून गोळी झाडून …
Read More »पेट्रोल-डिझेल दरवाढीसंदर्भात चंदगड तालुक्यात काँग्रेसच्यावतीने जन आंदोलन
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यात आज दुपारी काँग्रेसच्यावतीने भाजप सरकारने वाढवलेल्या पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीसंदर्भात जन आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष संभाजीराव देसाई- शिरोलीकर यांनी केले. कोवाड, नागणवाडी, कार्वे येथील पेट्रोल पंपावर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन केंद्र सरकारचा निषेध व्यक्त केला. कार्वे येथील बेळगाव-वेंगुर्ला मार्ग …
Read More »देवरवाडी ग्रामपंचायतीने जपली सामाजिक बांधिलकी!
चंदगड : देवरवाडी ग्रामपंचायत आणि प्रिन्स पाईप कंपनी, देवरवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने कोरोना महामारीच्या काळात देवरवाडी गावातील ग्रामस्थांना जीवनावश्यक साहित्य कीट वाटप करण्यात आले. त्यामध्ये प्रत्येकी एका कुटुंबासाठी ५ किलो गहू पीठ,५ किलो तांदूळ, १ किलो तेल, १ किलो साखर, साबण, टूथपेस्ट आणि मास्क याचे वाटप करण्यात आले. उर्वरित जीवनावश्यक …
Read More »चंदगड तालुक्यात चार हत्तींचा कळप दाखल; शेतकऱ्यांनी दक्ष रहावे
चंदगड तालुक्यात कर्नाटकातुन दाखल झालेला हत्तींचा कळप तेऊरवाडी (एस. के. पाटील ) : महाराष्ट्रामध्ये सतत येणारा वनहत्तीचा कळप चंदगड वनपरिक्षेत्रात दाखल झाला आहे. मान्सून पूर्व शेतीच्या मशागतीची तयारी शेतकर्यांच्याकडून करण्यात येत असतानाच हत्तींचा कळप चंदगड तालुक्यात दाखल झाल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.कालच जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. त्याबरोबरच …
Read More »टॉवर नेटवर्कअभावी पारगडवाशीयांची गैरसोय…
ईसापूर, पारगड, वाघोत्रे भागांतील ग्रामस्थ हैराण चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यापासून कित्येक गावे नेटवर्कअभावी वंचित आहेत. त्यामुळे येथील ग्रामस्थांची गैरसोय होऊन त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. ग्रामस्थांना व युवावर्गाला नेटवर्कअभावी कोणतीही खाजगी स्वरूपाची कामे होत नाहीत, अत्यावश्यक व एखादी आपत्ती ओढवल्यास बाहेर गावी व तालुक्याच्या ठिकाणी संपर्क …
Read More »नगरसेवक बाळासाहेब हळदणकर रुग्णांसाठी ठरले देवदूत…
चंदगड (ज्ञानेश्वर पाटील) : चंदगड तालुक्यातील कोविड सेंटरला भेट देऊन अनेकदा येथील कोविड रुग्णांसाठी रोजच्या रोज एकवेळचे जेवण देऊन येथील रुग्णांची सेवा करण्याचे कार्य नगरसेवक बाळासाहेब हळदणकर यांनी केले आहे. जनसेवा हीं ईश्वरसेवा मानून आपल्या लोकांसाठी नेहमी ते सहकार्य करतं आहेत. लोकांना मास्क वाटप, गरजूना साहित्य वाटप, तसेच रुग्णांचे मनोबल …
Read More »रेडेकर रुग्णालय येथे माजी सैनिकांना सीजीएचएस दराने उपचार होणार…
गडहिंग्लज (ज्ञानेश्वर पाटील) : सैनिक हा आपल्या देशाचा कणा आहे. तो आपले कर्तव्य बजावत सीमेवर अखंडपणे उभा असतो. अश्या या जवानाला आरोग्यविषयक अडचणी येऊ नये यांसाठी आता आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड, कागल भागातील माजी सैनिकांसाठी कै.केदारी रेडेकर धर्मादाय रुग्णालय, गडहिंग्लज येथे सीजीएचएस दराने उपचार केले जाणार आहेत. या भागातील जवानाला …
Read More »