खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथील कार्यक्षेत्रातील अंगणवाडी व आशा कार्यकर्त्या यांचा सत्कार ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामपंचायत अध्यक्ष यल्लाप्पा गुरव होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून तहसीलदार रेश्मा तालीकोटी, महिला व बालविकास अधिकारी राममूर्ती के. व्ही., तालुका वलय अधिकारी सुनंदा यमकनमर्डी, तालुका आरोग्य अधिकारी संजीव नांद्रे, बिडी आरोग्य …
Read More »ओलमणीजवळ श्रीरामसेनेकडून गोव्याला जाणाऱ्या गाईंची सुटका
खानापूर (प्रतिनिधी) : ओलमणी ता. खानापूर जवळ श्रीराम सेनेकडून गोव्याला घेऊन जाणाऱ्या गाईंची सुटका करण्यात आली.याबाबत मिळालेली माहिती अशी की, गाईंनी भरलेला तामिळनाडूतून गोव्याला जाणारा टीएन ५२ एफ ४४५० क्रमांकाचा ट्रक ओलमणी गावाजवळ श्रीराम सेना हिंदुस्थानचे कार्यकर्ते किरण साबळे, विनायक साबळे, परशराम पवार, परशराम चव्हाण, प्रकाश तोराळकर, प्रशात साबळे, मारूती …
Read More »बाळगुंद गावाला जोडणारा रस्ता मार्गी लावा
बैठकीत नागरीकांची मागणी खानापूर (प्रतिनिधी) : बाळंगुद तालुका खानापूर येथे गुरुवारी हिंदू धर्म जनजागृती व विकास योजना मार्गी लावण्यासाठी खास बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत मार्गदर्शन करण्यासाठी खानापूर तालुका भाजपा नेते पंडित ओगले उपस्थित होते. यावेळी ग्रामस्थांनी बाळगुंद गावाला जोडणार्या रस्त्याचा प्रश्न उपस्थित केला. या प्रश्नाला उत्तर देतााना …
Read More »बेकवाड येथे पौष्टिक आहार शिबिर संपन्न
खानापूर (प्रतिनिधी) : बेकवाड तालुका खानापूर येथे गुरुवार दि. 16 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता मराठा मंडळ हायस्कूल बेकवाड येथील सभागृहात तहसील कार्यालय, बालविकास व महिला शिष्य अभिवृध्दी व तालुका आरोग्य खाते यांच्या संयुक्त विद्यमाने पौष्टिक आहार शिबीराचे आयोजन पार पडले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्राम पंचायत अध्यक्ष यल्लापा गुरव होते. …
Read More »पंतप्रधान मोदीच्या वाढदिवसानिमित्त खानापूरातून पत्राव्दारे शुभेच्छा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका भाजप पक्षाच्यावतीने शुक्रवारी दि. 17 रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या 71 व्या वाढदिवासाचे औचित्य साधुन खानापूर येथील रेल्वे स्टेशन रोडवरील पोस्ट ऑफिसमधून खानापूर तालुका भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्ते आदीनी पोस्ट पत्राव्दारे शुभेच्छा पाठविल्या. यावेळी खानापूर तालुका भाजपचे अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी, भाजप नेते …
Read More »खड्ड्यामुळे गर्लगुंजी-नंदिहळ्ळी रस्त्याची दुर्दशा
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील गर्लगुंजी गावापासुन ते नंदिहळ्ळी गावापर्यंतच्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. ऐन पावसाळ्यात रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन धारकांना या रस्त्यावरून ये-जा करणे कठीण होत आहे. त्याचबरोबर खानापूर-गर्लगुंजी-नंदिहळ्ळी बससेवाही रस्त्याची दुर्दशा झाल्याने व रस्त्यावर जागोजागी खड्डे पडल्याने सुरळीत धावत नाही. त्यामुळे प्रवाशांबरोबर विद्यार्थी वर्गाचे शैक्षणिक …
Read More »खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेतर्फे पीजीआर सिंधिया यांची भेट
खानापूर : खानापूर तालुका क्षत्रिय मराठा परिषदेच्या सदस्यांनी नुकतीच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांची बेंगळुरू मुक्कामी भेट घेतली. यावेळी मराठा समाजाच्या विविध समस्यासंदर्भात चर्चा करण्यात आली. मराठा समाज हा आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेला असून या समाजाला विविध स्तरावर आरक्षण मिळवून देण्याबाबत चर्चा करण्यात आली. तसेच माजी मंत्री पीजीआर सिंधिया यांनी …
Read More »वाढीव वीजबिलांच्या मुद्द्यावर आ. अंजली निंबाळकरांनी उठवला आवाज!
बेळगाव : कोरोना संकटाच्या काळातही नागरिकांना अव्वाच्या सव्वा वीजबिले आकारल्याच्या मुद्द्यावर खानापूरच्या आ. डॉ. अंजली निंबाळकर यांनी गुरुवारी विधिमंडळ अधिवेशनात आवाज उठवला. वाढीव वीजबिलांच्या शॉकने शेतकरी, सर्वसामान्य नागरिक मेटाकुटीला आले आहेत. याकडे त्यांनी लक्ष वेधले. विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी, गुरुवारी प्रश्नोत्तराच्या तासात चर्चेवेळी खानापूरच्या आ. अंजली निंबाळकर यांनी वाढीव वीजबिलांच्या …
Read More »करंबळच्या बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला मलप्रभा नदीत
खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील करंबळ गावच्या बेपत्ता झालेल्या तरूणाचा मृतदेह मलप्रभा नदीत सापडला. त्या तरूणाचे नाव परशराम जयराम पाटील वय २७ असे आहे.याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की, गेल्या पंधरा दिवसापूर्वी कामाला जातो म्हणून घराबाहेर पडलेल्याचा दोन दिवस झाले तरी पत्ता नाही. म्हणून घरच्यानी शोधाशोध करून पाहिले. परंतु कुठेच …
Read More »निट्टूरात कर्जबाजारी शेतकऱ्याची वीष घेऊन आत्महत्या
खानापूर (प्रतिनिधी) : ऐन गणेशोत्सवाच्या काळात निट्टूर (ता. खानापूर) येथील शेतकरी व विट व्यावसायिक विठ्ठल चंद्रकांत कुदळे (वय ४०) याने पीकेपीएस सोसायटी, नरेवा को-ऑप. सोसायटी, तसेच वैयक्तिक, हात उसने अशा प्रकारे जवळपास १० लाख रूपये कर्ज काढले होते.सध्याच्या कोरोना काळात व्यवसायही थंडावला आहे. शेतीचे उत्पन्नही कमी झाले.या विचारात सतत मनस्ताप …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta