Monday , April 20 2026
Breaking News

कणकुंबी नाक्यावर विनापरवाना 7 लाखाचा मद्यसाठा जप्त

Spread the love

बेळगाव : गोवा राज्यातून महाराष्ट्रात विनापरवाना दारूची वाहतूक करताना अबकारी खात्याने धाड घालून मुद्देमालासह 7,75,193 रुपयाचा मद्यसाठा जप्त करण्यात आला असून ही कारवाई शुक्रवारी दुपारी कणकुंबी येथे करण्यात आली.
दत्तात्रेय हनुमंत खानापुरे रा. वड्डर छावणी खासबाग बेळगाव असे अटक केलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. हा केए 22 डी. 5685 या नंबरच्या आयशर कंपनीच्या वाहनातून गोव्याहून महाराष्ट्रात दारूची वाहतूक करताना अबकारी विभागाने कणकुंबी नाका येथे तपासणी केली असता या वाहनातून ट्रिपल एक्सरम, नॅशनल ओल्ड एस व्हिस्की, असे एकूण 180 बॉक्स म्हणजे 1,557 लिटर मध्य जप्त करण्यात आले आहे. याची एकूण किंमत 7,75,139 इतकी होते. अबकारी खात्याचे जिल्हा आयुक्त जयरामगौडा यांच्या नेतृत्वाखाली अबकारी खात्याची निरीक्षक चनगौडा पाटील, मंजुनाथ गलगली, उपनिरीक्षक चालुक्य व त्यांच्या सहकार्‍यांनी ही कारवाई केली.

About Belgaum Varta

Check Also

शिवजयंती आणि अक्षय तृतीया निमित्त कपिलेश्वर मंदिरात हापूस आंब्यांची आकर्षक आरास

Spread the love  बेळगाव : श्रीक्षेत्र दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कपिलेश्वर मंदिरात शिवजयंती आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *