पाच जण ताब्यात : स्मशानात शिजला खुनाचा कट निपाणी (वार्ता) : जुन्या वादातून अभिषेक दत्तवाडे या युवकाचा खून झाल्याचे पोलिसांच्या तपासातून उघड झाले आहे. या प्रकरणी पाच आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे त्यामध्ये तीन आरोपी अल्पवयीन आहेत. सैफअली नगारजी (रा.जत्राट) आणि अमन एकसंबे (निपाणी) अशी त्यांची नावे आहेत. त्यांच्यावर गुन्हे …
Read More »सौंदलगा येथील मराठी मुलींच्या शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ उत्साहात
सौंदलगा : सौंदलगा येथील सरकारी मराठी मुलींच्या शाळेमध्ये सातवीच्या विद्यार्थिनींचा सदिच्छा समारंभ संपन्न झाला. यावेळी या कार्यक्रमाच्या सुरुवातीला संतोष पाटील यांनी सर्वांचे स्वागत करून कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली. यानंतर विद्यार्थिनींनी इशस्तवन सादर केले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष एसडीएमसीचे अध्यक्ष अजित कांबळे यांच्या व मान्यवरांच्या हस्ते बाबू जगजीवनराम व सरस्वतींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात …
Read More »अभिषेकच्या खून प्रकरणी पोलिसांचे कानावर हात!
निपाणी (वार्ता) : मूळ राहणार सैनिक टाकळी (ता. हातकणंगले) आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील अभिषेक शिवानंद दत्तवाडे या युवकाच्या खून प्रकरणात सहभागी अल्पवयीन संशयित स्वत:हून पोलिसांत हजर झाला होता. दरम्यान मंगळवारी (ता.5) पोलिसांनी चार जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी चालविण्याचे वृत्त सूत्रांकडून समजते. तरीही बुधवारी (ता.6) सायंकाळी निपाणीच्या मंडल …
Read More »बागेवाडी महाविद्यालयास नॅककडून ’ए’ मानांकनाची हॅट्ट्रिक!
अमर बागेवाडी : दोन दिवस घेतला प्रगतीचा आढावा निपाणी (वार्ता): बेळगाव येथील केएलई संस्थेच्या येथील जी. आय. बागेवाडी महाविद्यालयाला मंगळवारी (ता. 29) व बुधवारी (ता. 30) या दोन दिवशी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मानांकन मंडळ (नॅक) कमिटीने भेट दिली. दोन दिवसांत नॅक कमिटीने महाविद्यालयाचा दर्जा, गुणवत्तेसह सर्वांगीण विकासाचा आढावा घेतला. त्यानंतर …
Read More »जीवनात नेहमी धडपड आवश्यक!
परमात्मराज महाराज : ’अंकुरम’च्या शाळा इमारतीचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : जीवनात चांगली कामे होण्यासाठी मोठा जनसमुदाय मागे असणे आवश्यक आहे. विश्वासाशिवाय कोणतीही गोष्ट शक्य नाही. त्यासाठी विश्वास असणे अत्यंत महत्वाचे आहे. शुद्ध संकल्पनेमुळे यश निश्चित मिळते, असे मत आडी येथील दत्त देवस्थान मधील परमाब्धिकार परमात्मराज महाराज यांनी व्यक्त केले. येथील …
Read More »विविध समस्यांबाबत प्रभाग १४ मधील नागरिकांचे नगराध्यक्षांना निवेदन
निपाणी (वार्ता) : जत्राटवेस मधील प्रभाग १४ हा भाग अजूनही अनेक सुविधा पासून वंचितच आहे. येथील रस्ते, गटारींची दुरवस्था झाली असून अस्वच्छता व घाणीचे वातावरण तयार झाले आहे. अजूनही काही ठीकाणी पथदीपाची व्यवस्था नसल्याने येथील नागरिक अंधारातच वावरत यासह विविध मागण्यांचे निवेदन प्रभागातील नागरिकांतर्फे सामाजिक कार्यकर्त्या संजना घाटगे यांच्या हस्ते …
Read More »निपाणीत अंकुरम शाळेच्या इमारतीचे उद्घाटन 6 रोजी
परमात्मराज महाराजांची उपस्थिती : सहज, सुलभ भाषेत शिक्षण निपाणी(वार्ता) : येथील कलानिकेतन शिक्षण संस्थेतर्फे सर्वोत्तम व जागतीक पध्दतीनुसार कमी वयात हसत खेळत सहज व सुलभ अशी नवीन अभ्यासक्रम पध्दत सुरू केली आहे. पाल्याच्या शारीरिक व बौध्दीक विकासासाठी केआर ईईडीओ प्रणाली अंतर्गत निपाणीत प्रथमच ज्ञानदानाचे काम केले जात आहे. अंकुररम इंग्लिश …
Read More »निपाणीत युवकाचा खून
एक जण ताब्यात : पैशाच्या देवघेवीवरून कुणाचा संशय निपाणी (विनायक पाटील) : मूळ गाव सैनिक टाकळी आणि सध्या राहणार निराळे गल्ली येथील रहिवासी असलेल्या अभिषेक शिवानंद दत्तवाडे (वय १९) या युवकावर तिघा मित्रांनी धारदार चाकूने हल्ला करून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना रविवारी (ता.३) मध्यरात्री येथे घडली. याप्रकरणी खून करणाऱ्या …
Read More »ज्ञान मंदिरास दिलेली देणगी ही श्रेष्ठच
बी. एस. पाटील: माजी विद्यार्थ्यांकडून लॅपटॉप भेट निपाणी (वार्ता) : ज्ञानमंदिर हे विद्येचे सर्वश्रेष्ठ मंदिर असून येथे सर्व सामान्य विद्यार्थी शिक्षण घेत असतात. त्यांच्या शिक्षणासाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे हे गरजेचे असून यासाठी दिलेली देणगी ही सर्वात श्रेष्ठ असल्याचे मत मुख्याध्यापक बी. एस. पाटील यांनी व्यक्त केले. ते माजी …
Read More »शेतकर्यांच्या न्यायासाठी संघटितपणा आवश्यक
राजू पोवार : भाटनांगनुर येथे ’रयत’च्या शाखेचे उद्घाटन निपाणी (वार्ता) : शेतकरी हा देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असूनही याकडे शासनाचे जाणून बुजून दुर्लक्ष होत आहे. अशातच निसर्गाच्या लहरीपणामुळे वर्षानुवर्ष शेतकरी अडचणीत येत आहे. शासनातर्फे शेतकर्यांसाठी अनेक कायदे असूनही त्याची अंमलबजावणी तळागाळापर्यंत होत नाही. परिणामी शेतकरी वर्षानुवर्षे कर्जाच्या खाईत लोटत चालला आहे. …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta