Monday , December 8 2025
Breaking News

निपाणी

न्यायालयाच्या आदेशानुसार नाव नोंदणीची रितसर प्रक्रिया

  बुदिहाळचे वसंत पाटील यांची तहसीलदारांविरोधात तक्रार निपाणी (वार्ता) : बुदिहाळ येथील शेत जमिनीच्या नाव नोंदणी विषयी खोटे मृत्युपत्र मृत्यू दाखले जोडले गेले आहेत, अशा आशयाची माहिती देत जंगम यांनी तहसीलदारांविरोधात शासनाच्या महसूल विभागासह इतर अधिकाऱ्यांना निवेदन दिले होते. या निवेदनाला प्रतिउत्तर म्हणून बुदिहाळ येथील सदर जमीन पारंपरिक पद्धतीने करणारे …

Read More »

निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकाऱ्यांनी घेतली खासदार विशाल पाटील यांची भेट

  निपाणी (वार्ता) : सांगली येथील खासदार विशाल पाटील यांची निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती पदाधिकारी यांनी भेट घेतली. या भेटीदरम्यान सीमा प्रश्नसंदर्भात चर्चा करण्यात आली. समिती पदाधिकाऱ्यांच्या हस्ते खासदार पाटील यांचा सत्कार करण्यात आला. सीमाप्रश्न १९५६ पासून ताटकळत आहे, तो सुटावा म्हणून निवेदन देण्यात आले.सन २००४ पासून प्रलंबित असलेला …

Read More »

आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धेत श्रीपेवाडीचा पारितोष पाटील प्रथम

  निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालयातील माजी विद्यार्थी सोमशेखर कानडे यांनी आपल्या आई भारती अनिल कानडे यांच्या स्मरणार्थ नूतन मराठी शाळेत आंतरशालेय वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या. त्यामध्ये श्रीपेवाडी येथील जी. एम. संकपाळ हायस्कूल मधील विद्यार्थी पारितोष पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. अध्यक्षस्थानी …

Read More »

विद्यार्थ्याकडून स्वयंम अध्ययन करून घेणे गरजेचे

  प्रा. तुकाराम गडकरी : ‘महात्मा बसवेश्वर’तर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : महात्मा बसवेश्वर क्रेडिट सौहार्द संस्थेने सहकाराबरोबरच विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी वेळोवेळी प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे. औद्योगिक क्रांतीतून रोजगार निर्मिती झाली. पण आता आयटी क्रांतीमुळे रोजगार जात आहेत. त्यावर उपाय म्हणून विद्यार्थ्यांना बदलत्या काळानुसार शिक्षण देणे आवश्यक आहे. …

Read More »

बसस्थानकात पाणी विकत बनला हमी योजना तालुका सदस्य; निपाणीच्या ‘यासिन’चा संघर्ष

  निपाणी (वार्ता) : कुटुंबातील अठरा विश्वे दारिद्र्य, अपूर्ण शिक्षण, मुलींची लग्ने अशा परिस्थितीमध्ये यासीन मनेर यांचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरू होता. त्यामुळे बस स्थानकात बसमध्ये पाण्याची बाटली, बिस्किट, चॉकलेट, सोडा, सरबत, गोळ्या विकून पोटाची खळगी भरावी लागली. अजूनही त्यांचा संघर्ष सुरूच असून त्यांच्या प्रामाणिकपणाचे फळ म्हणून कर्नाटक राज्य रोजगार हमी …

Read More »

आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळेत निपाणीतील दोन शिक्षकांचा सहभाग

  निपाणी (वार्ता) : बंगळूर येथील ‘हॉल ऑफ सायन्स’ रॉयल सोसायटी ऑफ केमिस्ट्री येथे आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र कार्यशाळा पार पडली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेचे शिक्षक सलीम नदाफ आणि भोज येथील न्यू सेकंडरी स्कूलचे शिक्षक दिलीप शेवाळे यांनी सहभाग घेतला. दोन दिवस चाललेल्या या कार्यशाळेत देश विदेशातील माध्यमिक शिक्षक सहभागी झाले …

Read More »

निपाणीत ३० रोजी दहीहंडीचा थरार; गोविंदा पथकाला दीड लाखाचे बक्षीस

  दौलतराव पाटील सोशल फाउंडेशन व पैलवान अजित नाईक युवा शक्तीतर्फे आयोजन निपाणी (वार्ता) : येथील दिवंगत दौलतराव पाटील सोशल फाऊंडेशन, हेल्थ क्लब व पैलवान अजित नाईक युवाशक्ती संघटनेच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी (ता.३०) दुपारी ४ वाजता म्युनिसिपल हायस्कूलच्या मैदानावर दीड लाख रुपयांच्या दहीहंडीचा थरार आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती …

Read More »

निपाणीत मुस्लिम समाजाचा विराट मोर्चा

  रामगिरी महाराजांवर कारवाई करा; तहसीलदारामार्फत पंतप्रधानांना निवेदन निपाणी (वार्ता) : महाराष्ट्र मधील नाशिक जिल्ह्यातील रामगिरी महाराजांनी धर्म आणि अल्लाहच्या शरियतचा प्रचारक आणि तत्वज्ञानाचा विरोधी वक्तव्य केले आहे. ईश्वरानंतर आदरणीय, मुहम्मद अल मुस्तफा अहमद अल मुजतबा यांचा अवमान केला होता. त्याच्या निषेधार्थ शुक्रवारी (ता.२३) येथील मुस्लिम समाजाने मूक मोर्चा काढून महाराजांवर …

Read More »

हिंदू हेल्पलाईनकडून जखमी वानराला जीवदान

  निपाणी (वार्ता) : तवंदी गावाशेजारी राष्ट्रीय महामार्ग रस्त्याजवळ हिंदू हेल्पलाईनचे कार्यकर्ते सुमित पाटील यांना वानर जखमी अवस्थेत आढळून आले. वानराला कुत्र्याच्या झुंडीचा त्रास होत होता. यावेळी सुमित पाटील यांनी कुत्र्याच्या झुंडीपासून वानराला सोडवून या वानराला सुरक्षित ठिकाणी ठेवले. त्यानंतर वैद्यकीय उपचार करून परिसरात सोडून देण्यात आले. घटनेची माहिती पाटील …

Read More »

कंत्राटी कामगारांना कायम करण्यासाठी दंडाला काळ्या फिती लावून काम

  निपाणी (वार्ता) : कर्नाटक राज्य आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्या (एनएचएम) उपकंत्राटी कर्मचारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेंतर्गत उपकंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमित करण्याच्या मागणीसाठी दंडाला काळ्या फिती बांधून गुरुवारी (ता.२२) आंदोलन केले. राष्ट्रीय आरोग्य अभियान योजनेअंतर्गत डॉक्टर आणि सहाय्यक कर्मचारी काम करत आहेत. नोकरीच्या सुरक्षेशिवाय असुरक्षितता आहे. योजनेंतर्गत कर्मचारी …

Read More »