निपाणी (वार्ता) : येथील कमलनगर (रामनगर) मधील रहिवासी व वाळकी येथील सरकारी उच्च प्राथमिक कन्नड शाळेच्या शिक्षिका सरोजा कृष्णा खोत यांना तालुकास्तरीय उत्तम शिक्षिका पुरस्काराने देण्यात आला. शिक्षक दिनाच्या निमित्ताने चिक्कोडी येथे झालेल्या कार्यक्रमात शिक्षणाधिकारी आणि तालुका शिक्षक संघाच्यावतर्फे शिक्षणाधिकारी बी. ए. मेक्कनमर्डी, आमदार गणेश हुक्केरी, आमदार प्रकाश हुक्केरी …
Read More »विद्युत रोषणाई, मूर्तीच्या भव्यतेवर भर
निपाणी परिसरातील चित्र; गणेशोत्सव देखाव्यांची परंपरा दुर्मिळ निपाणी (वार्ता) : सळसळत्या उत्साहाचे प्रतीक आणि भक्ती भावाचा समजला जाणारा गणेशोत्सव सुरू झाला आहे. अनेक परंपरा असणारी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळे पूर्वी सजीव देखावे सादर करून प्रबोधन करत होते. पण गेल्या काही वर्षापासून त्याऐवजी आकर्षक विद्युत रोषणाई, गणेश मूर्ती आणि महाप्रसादावर भर …
Read More »निपाणी येथील मिरची बाजार स्वच्छतेसाठी नगरपालिका आयुक्तांना निवेदन
निपाणी (वार्ता) : येथील जोशी गल्लीतील मिरची बाजारात परिसरातील व्यापारी व नागरिक मोठ्या प्रमाणात कचरा टाकत आहेत. त्यामुळे या बाजाराची अवस्था गंभीर बनली आहे. परिसरातील व्यापारी व नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर असूनही येथून कचरा उचलला जात नसल्याने येथून ये,जा करणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत. त्याची तात्काळ दखल घेऊन …
Read More »गणेशोत्सव मंडळांवर सीसीटीव्हीची नजर
व्यवस्थेबाबत मंडळांना आदेश : सामाजिक विषयावर जनजागृती निपाणी (वार्ता) : अवघ्या काही तासावर येऊन ठेपलेल्या गणेशोत्सवा दरम्यान पोलिसांकडून मंडळांना सीसीटीव्ही लावण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. शहरात ३०० पोलिसासह होमगार्ड तैनात करण्यात आले आहेत. प्रत्येक मंडळाची दररोज तपासणी व्यवस्थेबाबतची चौकशी होणार आहे. शहरात सुमारे १०० गणेशोत्सव मंडळाची तर ग्रामीण भागात …
Read More »नूतन मराठी विद्यालयात विद्यार्थी बनले शिक्षक
निपाणी (वार्ता) : येथील छत्रपती शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित नूतन मराठी विद्यालय प्राथमिक, माध्यमिक व श्री वेंकटेश्वरा पदवीपूर्व महाविद्यालयाच्या संयुक्त विद्यमानाने शिक्षक दिन कार्यक्रम झाला. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांची भूमिका वठवून शिक्षकाबद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. अध्यक्षस्थानी नूतन मराठी विद्यालयाचे मुख्याध्यापक एस. एस. पचंडी तर प्रमुख पाहुणे संस्थेचे संचालक विक्रमादित्य …
Read More »‘गुरु भवना’साठी १० लाखाचा निधी
आमदार शशिकला जोल्ले; निपाणीत शिक्षक दिन निपाणी (वार्ता) : जीवनात आई-वडिलांसह शिक्षकांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे. शिक्षणामुळेच माणूस उच्च पदावर पोहोचणे शक्य आहे. सीमा भागातील शाळांमध्ये ३०० वर्ग खोल्या आपल्या निधीतून बांधले आहेत. यापूर्वी गुरु भवनाला निधी उपलब्ध केला आहे. आता पुन्हा १० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच गुरु …
Read More »श्री मराठा सौहार्द सहकारी संघाचे निपाणीत उद्घाटन
निपाणी (वार्ता) : येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी महाराज चौकात माजी आमदार काकासाहेब पाटील यांच्या हस्ते श्री. मराठा सौहार्द सहकारी संघाचे उद्घाटन झाले. काकासाहेब पाटील यांनी, मराठा समाजाने एकत्रित येऊन या संस्थेची स्थापना केली आहे. त्याच्या माध्यमातून सर्वसामान्यांना पत मिळवून देऊन त्यांचे जीवनमान उंचवावे, असे आवाहन केले. सहकार्यारत्न उत्तम पाटील …
Read More »श्रावण मासातील सत्संगामुळे जीवन सार्थकी
अदृश्य काडसिद्धेश्वर महाराज; समाधी मठात आराधना महोत्सव निपाणी (वार्ता) : श्रावण हा देव, धर्म, व्रतवैकल्य करण्याचा महिना आहे. या काळात महिनाभर प्रवचन कीर्तन असे विविध कार्यक्रम आयोजित केले जातात. त्यामधून अध्यात्म शांती व मन परिवर्तन होत असते. त्यासाठी प्रत्येकाने या महिन्यात जपनाम, अन्नदान, धार्मिक सेवा केली पाहिजे. या महिन्यातील …
Read More »गणेशमूर्तीची विटंबना थांबवा
विविध हिंदू संघटनांची मागणी; तहसीलदारांना निवेदन निपाणी (वार्ता) : अलीकडच्या काळात पर्यावरणाचे महत्त्व सर्वांच्या लक्षात येत आहे. तरीदेखील अनेक विषयांमध्ये प्रशासनाकडून अपेक्षित कृती होत नाही. त्यामुळे सामाजिक स्वास्थ्य धोक्यात आले आहे. गणेशोत्सवाच्या निमित्ताने ‘मूर्तीदान’ आणि ‘कृत्रित तलाव’ यांसारख्या मोहिमा राबवल्या जात आहेत. त्यामुळे एक प्रकारची मूर्तीची विटंबना होत आहे. …
Read More »सलीम नदाफ यांच्या विज्ञानवारी शनिवारी नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड
निपाणी (वार्ता) : महाराष्ट्रातील स्टेट इनोव्हेशन अँड रिसर्च फाउंडेशनतर्फे राष्ट्रीय नवोपक्रम स्पर्धा घेण्यात आली. त्यामध्ये निपाणी येथील संभाजीनगर शाळेतील विज्ञान शिक्षक सलीम नदाफ यांच्या ‘विज्ञानावरी शनिवारी’ या नवोपक्रमाची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. पुणे येथील एस. सी.ई.आर.टीच्या सहाय्यक संचालिका शोभा खंदारे यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र देऊन त्यांचा सन्मान करण्यात …
Read More »