बेनाडीतील तंगडे कुटुंबीयांची दिवाळी ; कुटुंबात आहेत ३२ सदस्य निपाणी (वार्ता) : शहरातील गगनचुंबी इमारतींमध्ये आणि कृत्रिम रोषणाईत हरवलेला सणाचा खरा आनंद अजूनही गावात सापडतो. नोकरी, व्यवसाय, मुलांचे शिक्षण व इतर कामानिमित्त अनेक जण शहरात वास्तव्यास आहेत. वर्षातून एकदा गावाकडे येऊन सणाला हजेरी लावून जाणाऱ्या कुटुंबांची संख्या आहे. पण …
Read More »निपाणी परिसरात सोमवारी झाली ओवाळणी; आज अभ्यंगस्नान
निपाणी (वार्ता) : दोन दिवसांपासून दीपावली उत्सवास अभूतपूर्व उत्साहात सुरवात झाली आहे. काही कुटुंबीयांनी सोमवारी ओवाळणीचा कार्यक्रम आटोपला. सोमवारी (ता. २०) नरक चतुर्दशी झाली. त्यानिमित्त पहाटे अभ्यंगस्नान करून दिवाळी साजरी करण्यात आली. या दिवशी अनेक कुटुंबीयांनी आपला भाऊरायाला ओवाळणी केली. मंगळवारी (ता. २१) लक्ष्मीपूजन असून, त्यानिमित्त बाजारपेठेसह घराघरांत चैतन्य …
Read More »निपाणी दर्गाहमध्ये दिवाळीचा पहिला अभिषेक
दिवाळी सणाचा उत्साह : मानकरी, उरूस कमिटीची उपस्थिती निपाणी (वार्ता) : श्री संत बाबा महाराज चव्हाण दर्गा प्रस्थापित श्री महान अवलिया हजरत पिरानेपीर दस्तगीर साहेब यांच्या यांच्या दिवाळी सणाला सोमवारी (ता. २०) धार्मिक विधीने प्रारंभ झाला. त्यानुसार उरूस उत्सव कमिटी व मानकरी यांच्या उपस्थितीतधार्मिक विधींना सुरुवात झाली. दर्गाह मधील …
Read More »साहित्यिक महादेव मोरेंचा वारसा चालवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन
लेखिका सुचिता घोरपडे; दिवंगत महादेव मोरेंच्या ‘भरारी’ पुस्तकाचे प्रकाशन निपाणी (वार्ता) : दिवंगत साहित्यिक महादेव मोरे यांनी अस्सल ग्रामीण भागात कथा, प्रवास वर्णन, सर्वसामान्यांची दुःखे शब्दबद्ध केले आहेत. त्यांच्या लेखनामुळे ग्रामीण साहित्यात मोठी भर पडली आहे. त्याची कर्नाटक आणि महाराष्ट्रातील साहित्य क्षेत्राने दखल घेतली आहे. त्यामुळे निपाणी शहराचे नाव …
Read More »देशाच्या प्रगतीत शंकरानंदांचे योगदान महत्वपूर्ण
सूर्यकांत पाटील- बुदिहाळकर; बी. शंकरानंद यांना अभिवादन निपाणी (वार्ता) : सध्या नेते मंडळी खुर्ची टिकवण्याचाच प्रयत्न करत आहेत. अशा आव्हानातून नागरिकांना पुढे जायचे आहे. ‘सत्तेसाठी मी आणि माझ्यासाठी सत्ता’ असे राजकारण सुरू आहे. मात्र बी. शंकरानंद यांनी आपल्या सत्तेचा उपयोग देशाच्या विकासासाठी केला आहे. त्यांच्या विचारांची आज देशाला गरज …
Read More »वसुबारस निमित्त निपाणीसह ग्रामीण भागात शेतकरी कुटुंबातर्फे गोपूजन
निपाणी (वार्ता) : वसुबारसने दिवाळी सणाला प्रारंभ झाला आहे. त्यामुळे पहिल्या दिवशी शहर व ग्रामीण भागातील शेतकरी कुटुंबातर्फे गोमातेची पूजा करून नैवेद्य अर्पण करण्यात आला.या सणासाठी लागणाऱ्या आकर्षक नक्षीदार पणत्या, विविध प्रकारच्या रंगीत रांगोळ्या, आकाश कंदील, सुवासिक तेल, अगरबती, मेणबती, कापूर, धुपासह अन्य साहित्य खरेदीसाठी निपाणी बाजारात ग्राहकांची …
Read More »श्रीरामसेना हिंदुस्थानतर्फे निपाणी तालुकास्तरीय दुर्गबांधणी स्पर्धेचे आयोजन
निपाणी (वार्ता) : छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापन केलेले हिंदवी स्वराज्य आणि त्यासाठी धारातीर्थ पडलेले मावळे, गडकोट, स्वराज्य रक्षक धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अजरामर रहावा, त्याची माहिती युवा पिढीला मिळावी, त्या उद्देशाने येथील श्री राम सेना हिंदुस्थान संघटनेतर्फे सलग ७ व्या वर्षी तालुका स्तरीय दुर्गबांधणी (किल्ला) स्पर्धेचे …
Read More »बोरगाव श्री अरिहंत दूध उत्पादक संघातर्फे दिवाळीनिमित्त विक्रमी लाभांशाचे वाटप
निपाणी (वार्ता) : बोरगाव येथील श्री अरिहंत दूध उत्पादक सहकारी संघातर्फे दूध उत्पादक शेतकऱ्यांना यंदा विक्रमी लाभांशाचे वाटप करण्यात आले. म्हैस दूध उत्पादकांना ४.५% व गाय दूध उत्पादकांना ३.६०% प्रमाणे दूध संघाचे अध्यक्ष शिवाजी तोडकर व मान्यवरांच्या हस्ते सदरचे लाभांश देण्यात आले संघाचे व्यवस्थापक बाहुबली कवटे यांनी, संघाचे संचालक …
Read More »तायक्वांदो स्पर्धेत गोल्ड मेडल पटकविल्याबद्दल नगारजीचा सत्कार
निपाणी (वार्ता) : येथील नगरपालिका इंग्लिश माध्यम शाळेतील युकेजीमधील विद्यार्थी तैमुर फैय्याज नगारजी यांने बेंगळुरू येथील कोरमंडलम इनडोअर स्टेडियम येथे झालेल्या राज्य स्तरीय तायक्वांदो स्पर्धेतील जी ४ या खेळामध्ये प्रथम क्रमांक आणि कुंफूमध्ये द्वितीय क्रमांक मिळवून गोल्ड मेडल फटकाविले आहे. त्याला प्रशिक्षक उत्तम सूर्यवंशी, कौस्तुभ जाधव,ऋषिकेश भोसले यांचे मार्गदर्शन …
Read More »गरजेच्या ठिकाणी अंधार, नको तिथे पथदिपाचा उजेड
निपाणी (वार्ता) : येथील रामनगर, अष्टविनायकनगर, वरदविनायकनगर कमलनगर येथील नागरी वस्तीमध्ये गेल्या दोन वर्षापासून पथदीप व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे या उच्चभ्रू परिसरातील नागरिकांना रात्रीच्यावेळी चाचपडत ये -जा करावी लागत आहे. तर आवश्यक नसलेल्या ठिकाणी लाखो रुपये खर्च करून पथदीप बसविले आहेत. नगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांतून संताप व्यक्त होत …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta