Sunday , July 26 2026
Breaking News

‘व्हॅलेन्टाईन डे’मुळे तरुणाईचा उत्साह दुणावला

Spread the love

 

प्रेमाच्या उत्सवाने बाजारपेठेत रंगत; दुकानांमध्ये भेटवस्तूंची रेलचेल

निपाणी (वार्ता) : ‘व्हॅलेंटाइन डे’च्या सप्ताहाला शनिवार (ता. ७) पासून सुरवात झाली आहे. प्रत्येक ‘डे’ निमित्ताने प्रियजनाला काय भेट द्यायचे, याचे नियोजन तरुणाईने केलेआहे. त्यामुळे बाजारपेठेतील उलाढाल काही अंशी वाढलेली दिसून येत आहे. सप्ताहाला प्रारंभ झाल्याने तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रेमाच्या उत्सवाने येथील बाजारपेठेत रंगत येत असून दुकानांमध्ये भेटवस्तूंची रेलचेल दिसत आहे.
व्हॅलेन्टाईन डेच्या सप्ताहाची सुरवात ‘रोझ डे’ने झाली आहे. त्यानंतर अनुक्रमे प्रपोज डे, चॉकलेट डे, टेडी डे, प्रॉमिस डे, हग डे आणि अखेर १४ फेब्रुवारीला ‘व्हॅलेन्टाईन डे’ असा प्रेमाचा हा सप्ताह साजरा होणारा आहे. प्रत्येक दिवसाचे वेगळे महत्त्व असून, प्रिय व्यक्तीबद्दल भावना व्यक्त करण्यासाठी हा आठवडा तरुणांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देतो. व्हॅलेंटाइन डेच्या सप्ताहामुळे बाजारपेठेत नवचैतन्य निर्माण झालेले आहे. फुलांची दुकाने, भेटवस्तू विक्री केंद्र, चॉकलेटने दुकाने सजली आहेत. गुलाब, चॉकलेट्स, टेडी, गिफ्टला मागणी वाढत आहे.
रोझ डेनिमित्ताने गुलाबाला मागणी वाढली आहे .दहा रुपयांना मिळणारे गुलाबाचे फूल १५ ते २० रुपयांना विक्री केली जात आहे. गुलाबाच्या फुलात व गुलाबाच्या बुकेत आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. फुलांच्या दरात वाढ होऊनही फुलांना मागणी कायम आहे.
—-
सोशल मीडियाचा वापर वाढला
व्हॅलेंटाइन डे च्या सप्ताह निमित्ताने प्रत्येक डेच्या दिवशी गिफ्ट दिले जात आहे. गिफ्टबरोबर आता प्रेमींनी एकमेकांना सोशल मीडियाच्या माध्यमातून सप्ताह निमित्ताने शुभेच्छा संदेश देण्यास सुरवात केली आहे. त्यासाठी काहींनी रिल्स तयार केलेल्या आहेत, तर काहीनी पोस्टर तयार करून प्रेमींना सरप्राईज देण्याचा प्रयत्न सुरू केला आहे.

About Belgaum Varta

Check Also

मानकापूर शाळेच्या छतांची दुरुस्ती न केल्याने विद्यार्थी शिक्षकांची गैरसोय

Spread the love  तहसीलदारांच्या आदेशाला केराची टोपली निपाणी (वार्ता) : अडीच महिन्यापूर्वी बोरगाव, मानकापूर परिसरात …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *