Monday , June 1 2026
Breaking News

संकेश्वर

संकेश्वरात बाईक रॅलींने “हर घर तिरंगाचा” संदेश

  संकेश्वर  (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली काढण्यात आली. संकेश्वर श्री शंकराचार्य संस्थान मठाजवळ नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी यांनी तिरंगा बाईक रॅलीला चालना दिली. नगरसेवकांची बाईक रॅली सर्व प्रभागात “हर घर तिरंगा” चा संदेश घेऊन पोचलेली दिसली. नगरसेवक हातात तिरंगा घेऊन भारत माता की जय …

Read More »

संकेश्वर पालिकेतर्फे हिरण्यकेशीचे गंगा पूजन

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेतर्फे आज हिरण्यकेशी नदीच्या नव्या पाण्याचे गंगा पूजन करण्यात आले.संकेश्वर ग्रामदैवत श्री शंकराचार्य संस्थान मठाचे श्री सच्चिदानंद अभिनव विद्यानू्सिंह भारती महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात हिरण्यकेशी गंगा पूजनाचा कार्यक्रम पार पडला. पुरोहित संतोष जोशी यांच्या मंत्रोच्चारात नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, माजी नगराध्यक्ष श्रीकांत हतनुरी यांनी हिरण्यकेशीचे गंगा …

Read More »

कृष्णा, उपनद्यांच्या पातळीत 3 फुटांनी वाढ

  बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात पावसाचे थैमान सुरूच असून या पार्श्वभूमीवर चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील कृष्णा नदीसह वेदगंगा आणि दूधगंगा या उपनद्यांची पाणीपातळी 3 फुटांनी वाढली असून, पाणी शेतजमिनीत पिकांना मोठा धोका निर्माण झाला आहे. आज पाण्याची पातळी पुन्हा 3 फुटांवर गेली आहे. पूरस्थिती निर्माण झाली आहे. नदीच्या काठावर. तसेच …

Read More »

कोळळगुत्ती डोंगर माथ्यावर भक्तांची अलोट गर्दी

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर-निडसोसी रस्त्यावरील कोळळगुत्ती डोंगर माथ्यावर वसलेल्या श्री बसवेश्वर,श्री बिरेश्वर देवस्थानची श्रावणी यात्रा भक्तीमय वातावरणात साजरी करण्यात आली. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती देवस्थानची यात्रा भरते. श्रावणातील दुसऱ्या सोमवारी कोळळगुत्ती डोंगरावरील श्री बसवेश्वर श्री बिरेश्वर देवाला अभिषेक करण्यात आला. यात्रोत्सवात यंदा निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींना …

Read More »

संकेश्वर पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीचा शुभारंभ

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पोस्ट कार्यालयात तिरंगा ध्वज विक्रीचा शुभारंभ करण्यात आला आहे. घरावर फडकविणेच्या तिरंगा ध्वजाचे २५ रुपये शुल्क आकारले जात आहे. पोस्टात उपलब्ध तिरंगा ध्वज पाॅलिस्टरचे आहेत. संकेश्वर पोस्ट कार्यालयात दोन हजार तिरंगा विक्रीसाठी दाखल झाल्याची माहिती पोस्ट अधिकारी दयानंद कंचगारट्टी यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना दिली. …

Read More »

संकेश्वरात संततधार पावसाने जनजीवन विस्कळीत…

  सकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात गेल्या तीन दिवसांपासून आश्लेषा (आसळकाचा) पाऊस संततधार बरसत असल्याने जनजीवन विस्कळीत झालेले दिसत आहे. पावसाची दिवसरात्र संततधार चालू असल्याने सर्वसामान्य लोक, कष्टकरी शेतकरी, किरकोळ व्यापारी, फेरीवाले आर्थिक अडचणींचा सामना करताना दिसत आहेत. संततधार वृष्टीने शेतकऱ्यांच्या कामला ब्रेक मिळालेला दिसत आहे. गावातील बरेच रस्ते पावसाने …

Read More »

संकेश्वरात बुधवारी नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली…

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरात देशाच्या अमृतमहोत्सवी स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने बुधवार दि. १० ऑगस्ट २०२२ रोजी सकाळी १० वाजता नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅलींचे आयोजन करण्यात आले आहे. नगरसेवकांची तिरंगा बाईक रॅली गावातील सर्व २३ प्रभागातील प्रमुख मार्गे काढली जाणार असल्याचे मुख्याधिकारी आर सी चौगुला यांनी सांगितले. आज पालिका सभागृहात …

Read More »

दूधगंगा नदीचे पाणी पुन्हा पात्राबरोबर

  कोगनोळी : कोगनोळी येथून राष्ट्रीय महामार्ग जवळ असणार्‍या दूधगंगा नदीचे पाणी पात्राबरोबर आले आहे. शनिवार तारीख 6 व रविवार तारीख 7 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे दूधगंगा नदीपात्रात पाण्याची वाढ झाली आहे. दुधगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने कोगनोळी, सुळगाव, मत्तीवडे, हंचिनाळ, करनूर, वंदूर आदी गावच्या लोकांना पुराचा धोका वाढला …

Read More »

चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली

बेळगाव : महाराष्ट्रातील कोकण भागात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे चिक्कोडी, निपाणी तालुक्यातील 8 पूल पाण्याखाली गेले आहेत. चिक्कोडी तालुक्यातील कृष्णा व तिच्या उपनद्या वेदगंगा व दूधगंगा नद्यांच्या पाणी पातळीत 4 फुटांनी वाढ झाली आहे. राजापूर बॅरेजमधून 41167 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सदलगा येथील दूधगंगा नदीत 16245 क्युसेक्स पाण्याचा …

Read More »

संकेश्वर पतंजली योग समितीतर्फे जडीबुटी दिन साजरा

  संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पतंजली योग समितीच्या वतीने येथील महालक्ष्मी समुदाय भवनमध्ये जडीबुटी दिन साजरा करण्यात आला. जडीबुटीचे जनक पूज्य आचार्य बाळकृष्ण यांचा जन्मदिवस जडीबुटी दिन म्हणून मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात तुळशीच्या रोपाला जलार्पणांने करण्यात आली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून सुरेखा शेंडगे उपस्थित होत्या. …

Read More »