Tuesday , March 3 2026
Breaking News

संकेश्वर

निडसोसी श्रींचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा

संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस संकेश्वरातील सदभक्तगणांनी सरकारी प्राथमिक मुला-मुलींंच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाने उत्साही वातावरणात साजरा केला. येथील सरकारी प्राथमिक कन्नड-मराठी-उर्दू मुला-मुलींच्या तसेच गौतम शाळेतील विद्यार्थ्यांना सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, राजू बोरगांवी, कुमार बस्तवाडी, संदिप …

Read More »

संकेश्वर पालिकेला उशीरा जाग आली….

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वरातील नागरिकांची गेल्या कित्येक वर्षांपासून गावातील खड्ड्यातून वाटचाल सुरू आहे. गावात २४ तास पाणीपुरवठा योजनेसाठी खोदण्यात आलेल्या चरी (खड्डे) बुजविण्याचे काम तसेच ठेवून देण्यात आल्याने दुचाकी-चारचाकी वाहनधारकांची, ॲटोरिक्षा चालकांची चांगलीच गैरसोय होऊ लागली होती. संकेश्वरकरांना खड्ड्यातून ये-जा करावे लागत होते. संकेश्वर पालिकेने वेळोवेळी कांहीतरी सबब सांगून …

Read More »

गोरगरिब कष्टकरी मुलांच्या शिक्षणाला हातभर लावा : अ‍ॅड. पवन कणगली

संकेश्वर (महंमद मोमीन) : गोरगरिब कष्टकरी लोक वाढत्या महागाईमुळे त्रस्त आहेत. त्यांना मुलांचा शैक्षणिक खर्च परवडेनासा झाला आहे. यातून मुलाना शाळा सोडविण्याच्या घटना घडू नयेत. यासाठी सधन लोकांनी गोरगरिब कष्टकरी सर्वसामान्य मध्यमवर्गीय मुलांच्या शिक्षणाला हातभर लावण्याची आवश्यकता असल्याचे सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. पवन कणगली यांनी सांगितले. त्यांनी गरीब कुटुंबातील दहा मुला-मुलींना …

Read More »

संकेश्वर सिध्देश्वर वेदिकेतर्फे साहित्या आलदकट्टी यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर सिध्देश्वर साहित्य वेदिकेतर्फे युपीएससी परिक्षेत घवघवीत यश संपादन केलेल्या साहित्या आलदकट्टी यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सन्मान कार्यक्रम निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींच्या दिव्य सानिध्यात पार पडला. यावेळी बोलताना साहित्या आलदकट्टी म्हणाल्या सिध्देश्वर साहित्य वेदिकेच्या सत्काराचे आपणाला मोठा आनंद झाला आहे. वेदिकेचा सत्कार आपणाला …

Read More »

छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देणारे बाल महोत्सव : डॉ. स्मृती हावळ

संकेश्वर (महंमद मोमीन) : छोट्या दोस्तांच्या कलागुणांना वाव मिळावून देण्यासाठी बाल महोत्सवाचे आयोजन करण्यात आल्याचे महोत्सव संयोजक डॉ. स्मृती हावळ यांनी सांगितले. संकेश्वर रुक्मिणी मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलतर्फे आयोजित बाल महोत्सवात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. रुक्मिणी गार्डन येथे आयोजित बाल महोत्सवाचे उद्घाटन नगराध्यक्षा सौ. सिमाताई हतनुरी, बालरोगतज्ज्ञ डॉ. नंदकुमार हावळ, डॉ. …

Read More »

तुळजाभवानीतर्फे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर तुळजाभवानी गोंधळी समाजतर्फे गोंधळी समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करुन सन्मानित करण्यात आले. समाजाचे अध्यक्ष कृष्णा दवडते, परशराम शिसोदे, महेश दवडते यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थी प्राजक्ता हत्तळगे (93%), सुमित दवडते (86%), वैष्णवी सुगते (86%), प्रतिभा दवडते, मनिषा हत्तळगे (83%), दिव्या दवडते (75%) यांना शैक्षणिक …

Read More »

संकेश्वरात पर्यावरण दिन वृक्षारोपणाने साजरा…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त गौतम शाळा आवारात वृक्षारोपण कार्यक्रम उत्साही वातावरणात पार पडला. भिमनगर येथील गौतम प्राथमिक शाळा आवारात फ्रेंडस फौंडेशनच्यावतीने पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वृक्षारोपण कार्यक्रमाला संकेश्वर पालिकेचे उपनगराध्यक्ष अजित करजगी यांनी सहाय्य सहकार्य केले. वृक्षारोपण कार्यक्रमात भिमनगर येथील नागरिकांनी …

Read More »

शववाहिनी नादुरुस्त…

संकेश्वर (महंमद मोमीन) : संकेश्वर पालिकेची शववाहिनी नादुरुस्त झाल्याने खांद्येकऱ्यांचा शोध घेतला जात आहे. संकेश्वर हिरण्यकेशी नदी काठावर हिन्दु स्मशानभूमी, लिंगायत रुद्र भूमी असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य खांद्येकऱ्यांना करावे लागत आहे. संकेश्वरच्या नवीन वसाहतपासून स्मशान भूमी लांब पल्ल्याच्या अंतरावर असल्याने शव वाहून नेण्याचे कार्य कसरतीचे ठरतांना दिसत आहे.कांही लोक …

Read More »

जैनापूरनजीक सैनिक टाकळीच्‍या दाम्‍पत्‍याला डंपरची धडक, पत्‍नी ठार, पती जखमी

चिकोडी : डंपर व दुचाकीच्या झालेल्या अपघातात पत्नी जागीच ठार तर पती गंभीर जखमी झाला. ही घटना आज (दि. ४) दुपारी जैनापूरनजीक घडली. ज्योती राहुल शिरट्टी (वय २८, रा. सैनिक टाकळी) असे मृत पत्‍नीचे नाव असून राहुल शिरटी (वय ३२) असे जखमी पतीचे नाव आहे. अपघातानंतर डंपर चालक घटनास्‍थळावरुन पसार …

Read More »

घाईगडबडीने पेरणी करु नका : कुमार बस्तवाडी

संकेश्वर (महंमद मोमीन) : शेतकऱ्यांनी घाईगडबडीने पेरणी करुन आकाशाकडे डोळा लावून बसण्यापेक्षा हवामानाचा अंदाज घेऊन योग्य वेळी खरीपाची पेरणी करायला हवी असल्याचे संकेश्वर श्री शंकरलिंग कृषी पत्तीन सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष कुमार बस्तवाडी यांनी सांगितले. संस्थेच्या सभासद शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात सोयाबीन बियाणे वितरण कार्यक्रमात शेतकऱ्यांना उद्देशून ते बोलत होते. संस्थेचे अध्यक्ष …

Read More »