Sunday , September 20 2026
Breaking News

निडसोसी श्रींचा वाढदिवस शैक्षणिक साहित्य वाटपाने साजरा

Spread the love


संकेश्वर (महंमद मोमीन) : निडसोसी मठाचे पंचम श्री शिवलिंगेश्वर महास्वामीजींचा ७९ वा वाढदिवस संकेश्वरातील सदभक्तगणांनी सरकारी प्राथमिक मुला-मुलींंच्या शाळेत शैक्षणिक साहित्य वाटपाने उत्साही वातावरणात साजरा केला. येथील सरकारी प्राथमिक कन्नड-मराठी-उर्दू मुला-मुलींच्या तसेच गौतम शाळेतील विद्यार्थ्यांना सभापती सुनिल पर्वतराव, नगरसेवक संजय शिरकोळी, रोहण नेसरी, गंगाराम भूसगोळ, राजू बोरगांवी, कुमार बस्तवाडी, संदिप पाटील, किरण नेसरी, प्रदीप माणगांवी, नागेश क्वळी, सचिन सपाटे, सोनू मुडशी, सुजल नष्टी, सोनू बेळवी, बाबूराव मरीगुद्दी, मलप्पा रवदी, सिध्दराम गुडशी, मलप्पा कर्देण्णावर यांचे हस्ते शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. शालेय मुला-मुलींना नोटबूक पेन-पेन्सील वाटप करुन श्रींचा वाढदिवस भक्तीपूर्वक साजरा केल्याने भक्तगणांनी आनंद व्यक्त केला जात आहे.

About Belgaum Varta

Check Also

गणेशोत्सवासाठी यमकनमर्डी पोलिसांकडून गणेश मंडळाना मार्गदर्शक सूचना : पीएसआय आर. बी. पाटील

Spread the love  मंडप, मिरवणूक व विसर्जनावेळी नियमांचे पालन करण्याचे आवाहन दड्डी वार्ताहर.. आगामी गणेशोत्सवाच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *