Sunday , December 7 2025
Breaking News

संकेश्वर

’एसटी’ला आता विषाणूरोधक कोटिंग!

परिवहन मंडळाचे एक पाऊल पुढे : सुखकर अन् आरोग्यदायी होणार प्रवास निपाणी : राज्यात कोरोनाचा प्रभाव कमी जरी असला तरी भविष्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कर्नाटक राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी प्रवासाच्या माध्यमातून पसरू नये व प्रवाशांना सुरक्षितता वाटावी, यासाठी अँटिमायक्रोबियल केमिकल कोटिंग करण्यात येणार आहे. कोटिंग हे प्रभावशाली झाले का नाही हे …

Read More »

मतदारसंघाच्या विकासासाठी सदैव कटिबद्ध

मंत्री शशिकला जोल्ले : कोगनोळी येथे आहार किटचे वितरण कोगनोळी : 2008 साली मी या मतदारसंघात आले. तेव्हापासून आतापर्यंत मतदारसंघात संकट आले व मी आले नाही असे कधी झाले नाही. परवा आलो नाही याच्या पाठीमागे माझी वैद्यकीय कारण होते. त्यामुळे मी येऊ शकलो नाही याचा अर्थ विरोधकांनी वेगळा काढला. विरोधकांच्या …

Read More »

फांद्या छाटणीच्या नावाखाली डेरेदार वृक्षांची तोड

हेस्कॉमची कुर्‍हाड : छाटणी अशास्त्रीय असल्याचा आरोप निपाणी : दरवर्षी पावसाळ्याच्या तोंडावर हेस्कॉमकडून शहरातील वीजतारांना अडथळा ठरणार्‍या उंच वाढलेल्या झाडांच्या फांद्यांच्या छाटणी केली जाते. मात्र निपाणी शहर आणि उपनगरात मजुरांकडून अशास्त्रीय पद्धतीने फांद्या छाटल्या जात आहेत. फांद्या नसल्याने झाडे धोकादायक होऊन वादळवार्‍यात उन्मळून पडण्याच्या घटना घडत असल्याचे पर्यावरण प्रेमींचे म्हणणे …

Read More »

कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे

बंदोबस्त कडक : आरटीपीसीआरची मागणी कोगनोळी (वार्ता) : येथील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार वर असणार्‍या कोगनोळी सीमा तपासणी नाक्यावर परिस्थिती जैसे थे असून या ठिकाणी महाराष्ट्रातून कर्नाटकात प्रवेश करण्यासाठी आरटीपीसीआरची मागणी करण्यात येत आहे. सोमवार तारीख 9 रोजी दिवसभरामध्ये 51 चारचाकी वाहनातून सुमारे 200 प्रवाशांनी आपला रिपोर्ट दाखवून कर्नाटकात प्रवेश …

Read More »

रखडलेली घरे द्या, मगच सर्वे करा

राजेंद्र वड्डर : अतिरिक्त जिल्हाधिकार्‍यांना निवेदन निपाणी : दोन वर्षांपूर्वी सन 2019 साली अतिवृष्टी आणि महापूर परिस्थितीच्यावेळी निपाणी तालुक्यातील पडलेल्या घरांचा सर्वे करून त्यांना नवीन घरे बांधून देण्याची तयारी सरकारने दर्शविली होती. पण दोन वर्षाच्या काळात 594 घरे पूरग्रस्तांना बांधून देता आलेली नाही मात्र आता नुकत्याच झालेल्या अतिवृष्टी काळात पडलेल्या …

Read More »

हस्तांतर ठराव मागे न घेतल्यास तीव्र आंदोलन

म्युन्सिपल हायस्कूल बचाव कृती समिती : तहसीलदारांना निवेदन निपाणी (संजय सुर्यवंशी) : सत्तेच्या जोरावर निपाणी नगरपालिकेने सुस्थितीत असलेली म्युन्सिपल हायस्कूलची इमारत सरकारला हस्तांतर करून पाडण्याचा घाट घातला आहे. याबाबत सर्वसाधारण सभेत मंजूर केलेले दोन्ही ठराव बुधवार (ता. 25) ऑगस्टपर्यंत मागे न घेतल्यास गुरुवार (ता. 26) पासून निपाणी नगरपालिका समोर तीव्र …

Read More »

शिवसेनेतर्फे कोगनोळीत महामार्गावर रास्तारोको

आरटी-पीसीआरला विरोध : पोलिस-आंदोलकांत किरकोळ झटापट कोगनोळी (वार्ता) : ‘कर्नाटक सरकारचं करायचं काय, वर डोके खाली पाय‘ अशा जोरदार घोषणा देत कोगनोळी येथे राष्ट्रीय महामार्गावर असणार्‍या दूधगंगा नदीजवळ शिवसेनेच्यावतीने गुरूवारी (ता. 5) रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. कोगनोळी येथील कर्नाटक सीमा तपासणी नाक्यावर आरटी-पीसीआरची सक्ती केल्याने महाराष्ट्र- कर्नाटक सीमाभागातील नागरिकांवर …

Read More »

पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्ग 2 तासात सुरू होण्याची शक्यता

कोल्हापूर : पुणे – बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यासाठी सकाळी पोकलॅडची चाचणी यशस्वी झाली आहे. जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या परवानगी नंतर अत्यावश्यक सेवेतील अवजड वाहतूक सुरू करण्यात येणार असून, दोन तासात वाहतूक सुरू होईल असा विश्वास सहायक पोलिस निरीक्षक किरण भोसले यांनी व्यक्त केला. राष्ट्रीय महामार्गावर कोल्हापूरच्या दिशेने …

Read More »

‘पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग बंदच; अफवावर विश्वास ठेवू नका’

कोल्हापूर : शुक्रवारी दुपारी महामार्गावर पुराचे पाणी आले होते. त्यामुळे आज तिसऱ्या दिवशी बंदच आहे. गेल्या २४ तासात पाण्याची पातळी साडे तीन फुटाने कमी झालेली आहे; मात्र कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या महामार्गावर सुमारे तीन ते चार फूट व पुण्याकडे जाणाऱ्या महामार्गावर सुमारे सात ते आठ फूट पाणी असल्याचे पोलीस प्रशासनाने सांगितले. …

Read More »

केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी संकेश्वरमधील पूर
परिस्थितीची केली पाहणी

बेळगाव : केपीसीसी कार्याध्यक्ष सतीश जारकीहोळी यांनी संकेश्वर मधील पूर परिस्थितीची पाहणी केली. गेल्या चार दिवसापासून जिल्ह्यात सतत मुसळधार पाऊस चालू आहे. या पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी भरले आहे. नदी व नाले ओसंडून वाहत असून अनेक लोकांच्या घरांमध्ये पाणी शिरले असून मोठे नुकसान झाले आहे. त्याकरिता शनिवारी केपीसीसी कार्याध्यक्ष व …

Read More »