Monday , June 1 2026
Breaking News

कर्नाटक

अभिनेते कमल हासन यांचे कन्नड भाषेबद्दल वादग्रस्त वक्तव्य; कर्नाटकात तीव्र निषेध

  बेंगळुरू : चेन्नई येथे झालेल्या आगामी ‘ठग लाइफ’ या चित्रपटाच्या ऑडिओ लाँच कार्यक्रमादरम्यान दिग्गज अभिनेते कमल हासन यांनी एक वक्तव्य केले. यावरून कर्नाटकात मोठ्या प्रमाणात निदर्शने झाली आहेत. कन्नड भाषेचा उगम तमिळ भाषेतून झाला आहे, असे ते या कार्यक्रमात म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यावरून कन्नड समर्थक संघटना आणि नेत्यांनी तीव्र …

Read More »

“आमची नदी आमचा हक्क” संघटनेच्यावतीने 3 जून रोजी मोर्चा

  खानापूर : कळसा भांडूरा प्रकल्पामुळे पश्चिम घाटातील भीमगड अभयारण्य वनसंपदा तसेच जैवविविधतेला धोका निर्माण झाला असून या प्रकल्पामुळे उत्तर कर्नाटकाला वाळवंटाचे स्वरूप प्राप्त होणार आहे. खानापूर तालुक्यातील मलप्रभा नदी सुमारे 1500 किलोमीटर वाहत जाते आणि समुद्राला मिळते. त्याचप्रमाणे म्हादाई, कळसा भांडूरा, अघनाशिनी या नद्या देखील नैसर्गिकरित्या समुद्राला जाऊन मिळतात. …

Read More »

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवारी

  खानापूर : खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती कार्यकारिणीची बैठक शुक्रवार दिनांक ३० मे २०२५ रोजी दुपारी दोन वाजता राजा शिवछत्रपती स्मारक येथे आयोजित करण्यात आली आहे. यावेळी १ जून १९८६ रोजी कन्नड सक्ती आंदोलनात हौतात्म्य पत्करलेल्या व सीमाप्रश्नासाठी आहुती दिलेल्या हुतात्म्यांना अभिवादन करण्याबाबत विचारविनिमय करण्यासाठी बैठक बोलावलेली आहे. तरी …

Read More »

खानापूर तालुक्यातील जंगल, धबधब्यांच्या ठिकाणी प्रवेश बंदी

  बेळगाव : पावसाळ्यात खानापूर तालुक्यातील वनक्षेत्रे आणि धबधब्यांना पर्यटकांना भेट देण्यास वन विभागाने कडक बंदी घातली आहे. सुरक्षिततेच्या कारणास्तव आणि वन्यजीवांना धोका असल्याने पर्यटक, विशेषतः तरुणाई सोशल मीडियावर रेलचेल करताना आढळल्यास गंभीर कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. बेळगाव जिल्ह्यातील खानापूर तालुक्याच्या पश्चिम आणि दक्षिण भागातील निसर्गरम्य परिसर व धबधबे …

Read More »

भाजप आमदार शिवराम हेब्बार, आमदार एस. टी. सोमशेखर यांची पक्षातून हकालपट्टी

  बेंगळुरू : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि विजयपुरचे आमदार बसनगौडा पाटील यत्नाळ यांच्या हकालपट्टीनंतर भाजप हायकमांडने उत्तर कन्नड जिल्ह्यातील येल्लापूरचे आमदार शिवराम हेब्बर आणि बेंगळुरूचे यशवंतपूरचे आमदार एस.टी. सोमशेखर या दोघांची पक्षातून हकालपट्टी केल्याचा आदेश जारी केला आहे. गेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत दोन्ही आमदारांनी भाजपने जारी केलेल्या व्हिपचे उल्लंघन करून काँग्रेसला …

Read More »

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांच्या मुलासह पाच जणांना ठोकल्या बेड्या

  पिंपरी : वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात तिचा सासरा राजेंद्र हगवणे व दीर सुशील हगवणे हे दोघे फरार होते. त्यांनी पलायन केले त्यावेळी त्यांना काही जणांनी मदत केली. याप्रकरणी पाच जणांना पोलिसांनी अटक केली आहे. यात कर्नाटकचे माजी मंत्री वीरकुमार पाटील यांचा मुलगा प्रीतम पाटील यालाही अटक करण्यात आली आहे. …

Read More »

आता मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य

  बंगळूर : आता यापुढे मालमत्ता नोंदणीसाठी ई-स्वाक्षरी अनिवार्य असेल. आजपासून, मालमत्ता किंवा इतर नोंदणी प्रक्रियेसाठी इलेक्ट्रॉनिक स्वाक्षरी अनिवार्य आहे. या संदर्भात, महसूल विभागाने कर्नाटक मुद्रांक सुधारणा कायदा लागू करणारा आदेश जारी केला आहे. त्यानुसार, कोणत्याही नोंदणी प्रक्रिया डिजिटल केल्या जातील. या कायद्याने प्रक्रियेच्या सुरुवातीपासून शेवटपर्यंत विक्री करारांसह सर्व प्रकारच्या …

Read More »

मुसळधार पावसामुळे बेळगाव-चोर्ला महामार्ग बंद; खानापूर- जांबोटी मार्गाने वाहतूक वळवली

  खानापूर : खानापूर तालुक्यात पावसामुळे मलप्रभा नदीला पूर आला आहे. कणकुंबी येथे असलेल्या मलप्रभा नदीच्या उगमस्थानाजवळ, कुसमळी गावाजवळ एका नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. मुसळधार पावसामुळे पाण्याची पातळी अचानक वाढली आणि बांधकामाधीन भागातील तात्पुरता मातीचा रस्ता पूर्णपणे खचून गेला. यामुळे या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबली आहे. हा रस्ता जांबोटी …

Read More »

मुलांसाठी सुट्टी, गर्भवती महिला, वृद्धांसाठी मास्क अनिवार्य

  मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश: कोरोना नियंत्रणासाठी उपाययोजना बंगळूर : राज्यात कोविड-१९ चे रुग्ण वाढत असताना सर्व गर्भवती महिला, वृद्ध आणि दीर्घकालीन आजार असलेल्यांनी मास्क घालावेत. शाळेत येणाऱ्या मुलांना ताप, खोकला आणि इतर कोविड लक्षणे आढळल्यास अशा मुलांना सुट्टी देऊन घरी पाठवावे, अशा मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कडक सूचना दिल्या आहेत. …

Read More »

बळ्ळारीजवळ भीषण अपघात : चार जणांचा जागीच मृत्यू

  बळ्ळारी : टिप्पर लॉरी आणि कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात चार जणांचा जागीच मृत्यू झाला. बळ्ळारी जिल्ह्यातील संढोरमधील जयसिंगपुरजवळ हा अपघात झाला. दोन महिला आणि दोन मुलांचा जागीच मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी झाला आहे. मृतांची ओळख पटलेली नाही. संढोर पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

Read More »