Monday , September 21 2026
Breaking News

कर्नाटक

कामगारांच्या हितासाठी विविध योजनांचा लाभ

  मीनाक्षीताई पाटील ; अरिहंतच्या कर्मचाऱ्यांचा स्नेह मेळावा निपाणी (वार्ता) : दिवंगत सहकाररत्न रावसाहेब पाटील (दादा) यांनी प्रत्येकाला आपलेसे मानून सहकार, सामाजिक, शैक्षणिक, धार्मिक जीवनात काम करताना प्रत्येकांच्या अडचणी सोडविल्या. संघर्षमय वाटचालीत खचून न जाता संकटांना सामोरे गेले. कोणताही स्वार्थ, पदाची अपेक्षा न करता विकासात्मक व शाश्वत कामांना प्राधान्य दिल्याचे …

Read More »

अक्कोळमधील रिव्हर्स तवेरा स्पर्धेत चेतन देवर्डे यांची तवेरा ठरली प्रथम

  निपाणी (वार्ता) : अक्कोळ येथील श्री सद्गुगुरु पंत महाराज बाळेकुंद्रीकर यांच्या यात्रेनिमित्त आयोजित रिव्हर्स तवेरा स्पर्धेत चेतन देवर्डे यांनी १० मिनिटात अंतर पार करून प्रथम क्रमांकाचे ५ हजार १ रुपयाचे बक्षीस पटकावले. माजी जिल्हा पंचायत सदस्य चेतन स्वामी यांच्या गाडीने १२ मिनिटे १३ सेकंदात अंतर पार करून द्वितीय क्रमांक …

Read More »

जळगे मलप्रभा नदीकाठी ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे आग; १२०० टन ऊस भस्मसात

  खानापूर : खानापूर तालुक्यातील जळगे येथील मलप्रभा नदीच्या काठावर असलेल्या ऊस पिकाला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग लागून अंदाजे १२०० टन ऊस भस्मसात झाल्याची घटना सोमवारी घडली. या आगीत परिसरातील शेतकऱ्यांचे ४० लाख रुपयांपेक्षा अधिक आर्थिक नुकसान झाल्याचे प्राथमिक अंदाजातून समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले, …

Read More »

खानापूर पोलिस स्थानकाकडून गुन्हेगारांना अभय : खानापूर ब्लॉक काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा

  खानापूर : खानापूर पोलिस स्थानकात चाललेल्या गैरकारभारामुळे गुन्हेगारांना अभय तर सामान्य नागरिकांना त्रास अशी काहीशी स्थिती निर्माण झाली असल्याचा आरोप खानापूर ब्लॉक काँग्रेसने केला असून यासंदर्भात वरिष्ठ पातळीवर तक्रार दाखल करण्यात येणार असल्याची माहिती ब्लॉक काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी दिली आहे. खानापूर पोलीस स्थानकात चालू असलेल्या अनागोंदी कारभाराबाबत ब्लॉक काँग्रेसकडे अनेक …

Read More »

मराठा समाजाच्या विकासासाठी मंजुनाथ भारती स्वामीजी आज खानापूरात मार्गदर्शन करणार!

  खानापूर : मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने एक महत्त्वपूर्ण चिंतन बैठक आयोजित करण्यात आली आहे. परमपूज्य वेदांताचार्य मराठा जगद्गुरू श्री. मंजुनाथ भारती स्वामीजी, गोसाई मठ, भवानी पीठ, गविपूरम (बेंगलोर) यांच्या दिव्य सान्निध्यात चिंतन बैठक आज सोमवार दि. 29 रोजी दुपारी 3.30 वाजता, खानापूर शहरातील मलप्रभा नदीकाठी असलेल्या हरे कृष्ण …

Read More »

खानापूर तालुक्यातील काही गावात उद्या वीजपुरवठा खंडित

  खानापूर : कर्नाटक विद्युत प्रसारण निगम लिमिटेडकडून तातडीच्या देखभाल व दुरुस्ती कामांमुळे खानापूर तालुक्यात सोमवार दि. 29 डिसेंबर रोजी दुपारी 1.00 ते सायंकाळी 5.30 वाजेपर्यंत तात्पुरता वीजपुरवठा खंडित राहणार आहे. 110 के. व्ही. खानापूर उपकेंद्रातून होणारा वीजपुरवठा या कालावधीत बंद ठेवण्यात येणार असल्याने तालुक्यातील अनेक गाव व परिसरांना त्याचा …

Read More »

हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला

  खानापूर : हलगा ग्राम पंचायतीचे अध्यक्ष सुनील पाटील यांच्यावर प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. त्यामुळे हलगा आणि परिसरात अध्यक्षांवर करण्यात आलेल्या हल्ल्याची जोरदार चर्चा सुरू झाली असून जखमी झालेल्या सुनील पाटील यांच्यावर बेळगाव येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हलगा येथे आयोजित करण्यात आलेल्या एका धार्मिक कार्यक्रमावेळी झालेल्या क्षुल्लक …

Read More »

ग्रामविकासाच्या दिशेचे महत्त्वाचे पाऊल : सहकाररत्न उत्तम पाटील

  बोरगाववाडीत रस्ते, गटार कामाचा प्रारंभ निपाणी (वार्ता) : ढोणेवाडी ग्रामपंचायत अंतर्गत १५ व्या वित्त आयोगातून बोरगाव वाडी येथे रस्ता आणि गटार बांधकामासाठी निधी मंजूर झाला होता. या कामाचा प्रारंभ सहकाररत्न उत्तम पाटील*यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवरांचा हस्ते करण्यात आला. ग्रामपंचायत अध्यक्षा गीतांजली माने यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. त्यानंतर ग्रामपंचायत …

Read More »

विज्ञान प्रदर्शन स्पर्धेतील विजेत्यांना युवा नेते राहुल जारकीहोळी यांच्याकडून बक्षीस वितरण

  विज्ञानाला प्राधान्य द्या : राहुल जारकीहोळी यमकनमर्डी : सतीश जारकीहोळी फाउंडेशनच्या वतीने दड्डी आणि हुनूर मास्तीहोळी क्लस्टरअंतर्गत येणाऱ्या वरिष्ठ प्राथमिक व माध्यमिक शाळांच्या विद्यार्थ्यांसाठी विज्ञान प्रदर्शन स्पर्धेचे आयोजन शुक्रवारी हुक्केरी तालुक्यातील अलदाळ गेस्ट हाऊसमध्ये करण्यात आले. या स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थ्यांना बीडीसीसी बँकेचे संचालक राहुल जारकीहोळी यांनी रोख बक्षीस व …

Read More »

श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे रविवारपासून दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला

  खानापूर : खानापूर तालुक्यातील श्री महालक्ष्मी हायस्कूल, तोपिनकट्टी येथे श्री महालक्ष्मी हायस्कूल माजी विद्यार्थी संघटनेच्या सौजन्याने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी “एस.एस.एल.सी. व्याख्यानमाला 2025–26” चे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेचा उद्घाटन समारंभ रविवार दिनांक 28 डिसेंबर 2025 रोजी सकाळी 9.00 वाजता श्री महालक्ष्मी हायस्कूल तोपिनकट्टी येथे श्री. पी. रामाप्पा B.E.O, खानापूर …

Read More »