खानापूर : नुकताच खानापूर शहरातील रस्ता रुंदीकरण कामाला सुरुवात झाली आहे. या रुंदीकरणादरम्यान अतिक्रमण केलेले सर्व गाळे प्रशासनाने काढले आहेत. खानापूर कोर्ट ते शिवस्मारक येथील जवळजवळ सहा फूट अतिक्रमण हटविण्यात आले आहे. परंतु शहरांतर्गत अतिक्रमणे हटवत असताना इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट केले गेले नाही व इमारतींचा पुढचा भाग पाडण्यात आला …
Read More »खानापूर शहरातील अतिक्रमणे हटवण्यास प्रारंभ; खानापूर ब्लॉक काँग्रेसच्या पाठपुराव्याला यश
खानापूर : खानापूर शहराअंतर्गत रस्ता रुंदीकरणास प्रारंभ झाला असून मुख्य नकाशा नुसारच रस्त्याचे मोजमाप करून अतिक्रमित केलेले गाळे हटवण्यात आले आहेत. मध्यंतरी खानापूर शहरातील दोन माजी नगरसेवक पत्रकार दिनकर मरगाळे आणि विवेक गिरी यांनी आमरण उपोषण केले होते. त्यादरम्यान खानापूर तहसीलदारांनी मध्यस्थी करून त्यांना उपोषण मागे घेण्यास भाग पाडले …
Read More »माऊली अश्वाच्या रिंगण सोहळ्याने ममदापूर सोहळ्याची सांगता
आठवडाभर विविध कार्यक्रम ; परिसरातील भाविकांची गर्दी निपाणी (वार्ता) : ममदापूर (के. एल.) : हरिनाम सप्ताह निमित्त ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. आहे. येथील समाधी मठातील प्राणलिंग स्वामींच्या प्रमुख उपस्थितीत पालखीचे पूजन आणि ध्वजारोहण करून सोहळ्याचे उद्घाटन करण्यात आले. तालमीत आठवडाभर प्रवचन कीर्तन व हरिजागराचा कार्यक्रम झाला. …
Read More »केरळमधील काँग्रेसच्या पदयात्रेत माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर सहभागी
खानापूर : खानापूरच्या माजी आमदार आणि एआयसीसी सचिव डॉ. अंजली निंबाळकर यांनी केरळमधील कन्नूर, माहे येथे आयोजित काँग्रेसच्या विशेष पदयात्रेत सहभाग घेतला. आयएनसी पुडुचेरी आणि ब्लॉक काँग्रेस कमिटीच्या वतीने या मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. राष्ट्रीय राजकारणात आपल्या संघटनात्मक कौशल्याने हायकमांडचे लक्ष वेधून घेणाऱ्या डॉ. अंजली निंबाळकर सध्या काँग्रेसच्या …
Read More »मंत्री संतोष लाड फाउंडेशन, मराठा समाजातर्फे निपाणीतील ११ युवकांना रिक्षांचे वाटप
निपाणी (वार्ता) : कामगार मंत्री संतोष लाड फाउंडेशन आणि निपाणी तालुका मराठा समाजाच्या यांच्या संयुक्त विद्यमाने येथील ११ युवकांना येथील मध्यवर्ती छत्रपती शिवाजी चौकात आयोजित कार्यक्रमात रिक्षांचे वितरण करण्यात आले. बेळगाव येथील जयराज हलगेकर, अविनाश नलवडे आणि मान्यवरांच्या हस्ते शिवपुतळ्याचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आले. हलगेकर यांच्या हस्ते …
Read More »खेळामुळे मानसिक विकासाला प्रेरणा; शिवानी भोसले
कुर्ली हायस्कूलमध्ये वार्षिक पारितोषिक वितरण निपाणी (वार्ता) : शालेय पातळीवर क्रीडा स्पर्धेतील सहभागामुळे सकारात्मक भावनांना प्रेरणा मिळते. खेळामुळे ताण कमी होवून मानसिक विकास होण्यासाठी चालना मिळते, असे मत चिखली येथील नूतन जिल्हा परिषद सदस्या शिवानी भोसले यांनी व्यक्त केले. रयत शिक्षण संस्थेच्या कुर्ली येथील सिद्धेश्वर विद्यालयात आयोजित वार्षिक क्रीडा स्पर्धा …
Read More »निरोगी जीवनासाठी व्यसनापासून दूर राहा
‘महात्मा बसवेश्वर’ मध्येआरोग्य शिबिर : रुग्णांचा उत्स्फूर्त प्रतिसाद निपाणी ( वार्ता) : तान, तणावासह आहारातील बदलामुळे नवनवीन आजार निर्माण होत आहेत. त्यामुळे मानवी जीवन धोक्यात येत आहे. त्यापासून दूर राहण्यासाठी आहारावर नियंत्रण ठेवून नियमित व्यायाम करणे आवश्यक आहे. निर्व्यसनी राहून विवासनावर भर देणे गरजेचे असल्याचे मत डॉ. सी. बी. …
Read More »राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा
खानापूर : राजर्षी शाहू हायस्कूल ओलमणीमध्ये राष्ट्रीय विज्ञान दिन शाळेचे मुख्याध्यापक श्री. सी. एस. कदम सर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. विद्यार्थ्यांच्यात वैज्ञानिक दृष्टिकोन जागृत व्हावा तसेच डोळसपणाने त्यांना प्रत्येक गोष्टीचे ज्ञान प्राप्त व्हावे याकरिता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विज्ञान शिक्षिका श्रीमती व्ही. एल. चौगुले यांच्या शुभहस्ते सर …
Read More »विज्ञानाच्या प्रसारासाठी २५ वर्षापासून धडपडणारा अवलिया शिक्षक
निपाणीतील एस. एम.नदाफ यांचे कार्य ; आंतरराष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग *राष्ट्रीय विज्ञान दिन विशेष* निपाणी : विनायक पाटील (वार्ता) : विज्ञानाच्या सामर्थ्याची जाणीव प्रत्येकाला झाली पाहिजे. बालपणापासून विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाची आवड निर्माण होण्यासाठी त्यांना विविध स्पर्धेमध्ये सहभाग होण्याची संधी दिली पाहिजे. शालेय वयातच वैज्ञानिक दृष्टिकोन विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्यासाठी सतत नाविन्यपूर्ण उपक्रम …
Read More »खानापुरात रोजगार निर्मितीतून २५०० नोकऱ्यांचे उद्दीष्ट
प्रसाद पाटील यांनी घेतली उद्योग आणि वाणिज्य खात्याच्या सहसंचालकांची भेट खानापूर : तालुक्यात तरूण मोठ्या प्रमाणात बेरोजगार आहेत. स्थानिक पातळीवर पारंपारीक व्यवसायांव्यतिरिक्त रोजगार निर्मिती करणारे व्यवसाय नाहीत. अशा परिस्थितीत तालुक्यातील तरूण देशोधडीला लागला आहे. त्यांना तालुक्यातच रोजगार निर्माण करून देण्याचा ध्यास गर्लगुंजी येथील ग्राम पंचायत सदस्य प्रसाद पाटील यांनी …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta