संकेश्वर : संकेश्वर शहरातील निलगार गणपती उत्सवाशी निगडित दु:खद घटना समोर आली आहे. निलगार गणपतीची परंपरा जपणारे आणि गणपतीचे प्रमुख सेवेकरी असलेले अशोक हेद्दूरशट्टी यांचे आज निधन झाले. त्यांच्या आकस्मिक निधनामुळे संकेश्वर निलगार गणपती भक्तांमध्ये शोककळा पसरली आहे. भाविकांच्या भावनांचा विचार करून आज व उद्या (दि. ३१ ऑगस्ट व …
Read More »सार्वजनिक श्री गणेश मंडळ गर्बेनहट्टी यांच्या खुल्या कबड्डी ट्राॅफीवर म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर यांची मोहर!
खानापूर : म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर हे सांस्कृतिक, कला, क्रीडा स्पर्धामध्ये नेहमी अग्रेसर असणारं विद्यालय असून तालुक्यातील कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांनी इथे शिक्षण घेतात. शिक्षणात बरोबर क्रीडा क्षेत्रातही खेडोपाड्यातील विद्यार्थिनींनी आपला नावलौकिक वाढवून सरकारी सेवेतील आरक्षणाचा फायदा घ्यावा या हेतूने कार्यरत असणाऱ्या मराठा मंडळ शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा डॉक्टर राजश्री …
Read More »जिल्हा पोलीस अधीक्षकांनी घेतले जिजाऊ गणेश मंडळाच्या बाप्पाचे दर्शन….
खानापूर : बेळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक डॉ. भीमाशंकर गुळेद यांनी आपल्या पत्नीसोबत खानापूर येथे माजी आमदार डॉ. अंजली निंबाळकर यांनी स्थापन केलेल्या जिजाऊ गणेश मंडळाच्या गणपतीचे दर्शन घेतले. यावेळी जिजाऊ गणेश मंडळाच्या वतीने एसपी डॉ. भीमाशंकर गुळेद आणि त्यांच्या पत्नीचा सत्कार करण्यात आला. या प्रसंगी डॉ. अंजली निंबाळकर यांचे बंधू …
Read More »अभिनेता दर्शनच्या पत्नी-मुलाविरुद्ध अश्लील पोस्ट; महिला आयोगाची कारवाईची मागणी
बंगळूर : चॅलेंजिंग स्टार आणि अभिनेता दर्शनची पत्नी विजयालक्ष्मी आणि मुलगा विनेश यांच्याबद्दल सोशल मीडियावर अश्लील पोस्ट टाकणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी महिला आयोगाने पोलिसांना पत्र लिहिले आहे. महिला आयोगाने पोलिस आयुक्तांना आयोगाला मिळालेल्या तक्रारीच्या आधारे कारवाई करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. नेलमंगला येथील भास्कर प्रसाद यांनी महिला आयोगाकडे …
Read More »धर्मस्थळ प्रकरण: खोटे बोलण्यासाठी सूत्रधाराने दिली सूपारी
चिन्नय्याच्या जबाबाने खळबळ; तिमारोडी पुन्हा अडचणीत? बंगळूर : धर्मस्थळ प्रकरणाला रोज एक वेगळे वळण मिळत आहे. एकीकडे, सुजाता भटची चौकशी सुरू असताना, दुसरीकडे एसआयटीच्या ताब्यात असलेल्या जागल्या (चिन्नय्या) ने आपणास खोटे बोलण्यासाठी पैसे देण्यात आल्याची माहिती दिल्याचे समजते. दरम्यान, जागल्याने आनलेली कवटी महेश शेट्टी तिमारोडी यांच्या बागेतून आणल्याची माहिती …
Read More »लालबहादूर शास्त्री विद्यालयाचे योगा आणि बुद्धिबळ स्पर्धेत यश
मणगुत्ती : दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित, लालबहादूर शास्त्री विद्यालय मणगुत्ती, तालुका हुक्केरी येथे झालेल्या तालुकास्तरीय योगा स्पर्धेत लालबहादूर शास्त्री विद्यालयाच्या मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला या संघाची चिकोडी जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. या संघामध्ये पुढील विद्यार्थिनींचा सहभाग आहे. कुमारी सुषमा पाटील, दिया धनाजी, दिव्या पाटील, गौतमी पाटील …
Read More »शेतकऱ्यांना वेळेवर कर्ज वाटप करण्याचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांचे निर्देश
बेंगळुरू : मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी आज सहकार विभागाच्या प्रगतीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना वेळेवर कृषी कर्ज वाटप सुनिश्चित करण्याचे निर्देश दिले. राज्यात 37 लाख शेतकऱ्यांना 28 हजार कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. आतापर्यंत 8.69 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना 8,362 कोटी रुपयांचे कर्ज वाटप करण्यात आले …
Read More »पोलीस महासंचालक संदीप पाटील यांचे जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धेत सुयश
बेंगळूर : कर्नाटकचे पोलीस महासंचालक (आयजीपी) आणि बेळगावचे माजी जिल्हा पोलीस प्रमुख संदीप पाटील यांनी कोपनहेगन येथे आयोजित जागतिक ट्रायथलाॅन स्पर्धा यशस्वीरीत्या पूर्ण करून आपल्या देशासह राज्याचा नावलौकिक वाढवला आहे. डेन्मार्कची राजधानी कोपनहेगन येथे नुकतीच जागतिक ट्रायथलॉन स्पर्धा पार पडली. जगातील सर्वात खडतर स्पर्धांपैकी एक असलेल्या या स्पर्धेमध्ये विविध …
Read More »आमदार विठ्ठल हलगेकर डीसीसी बँक निवडणुकीच्या रिंगणात; निवड समितीची घोषणा
खानापूर : खानापूर विधानसभा मतदारसंघातील लोकप्रिय आमदार विठ्ठल हलगेकर हे बेळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी (डीसीसी) बँकेच्या निवडणुकीच्या शर्यतीत उतरले आहेत. खानापूर येथील शांतिनिकेतन शाळेत गुरुवारी (२८ ऑगस्ट) आयोजित पत्रकार परिषदेत सर्व पक्षांच्या प्रतिनिधींनी स्थापन केलेल्या निवड समितीचे अध्यक्ष यशवंत बिर्जे यांनी ही माहिती दिली. आमदार विठ्ठल हलगेकर, गर्लगुंजी पीकेपीएसचे …
Read More »संघाचे गीत गाईल्याने कोणाचे मन दुखावले असेल तर माफी मागतो : डी. के. शिवकुमार
काँग्रेसशी माझे नाते भक्त आणि देवासारखे बंगळूर : उपमुख्यमंत्री आणि काँग्रेस अध्यक्ष डीके शिवकुमार यांनी विधानसभेच्या कामकाजादरम्यान राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) गीताच्या ओळींचा उल्लेख केला होता. यामुळे बराच गोंधळ उडाला आणि काँग्रेस नेत्यांनी स्वतः डी. के. शिवकुमार यांच्या शब्दांवर आक्षेप घेतला. बी. के. हरिप्रसाद यांनी, केपीसीसी अध्यक्ष म्हणून …
Read More »
Belgaum Varta Belgaum Varta