Sunday , September 20 2026
Breaking News

कर्नाटक

हालशुगरमधील साखर चोरीची चौकशी न झाल्यास मंडल पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर धरणे आंदोलन

निपाणी (वार्ता) : निपाणी येथील श्री हालसिध्दनाथ सहकारी साखर कारखान्यात झालेल्या साखर चोरीच्या घटनेमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे. मात्र, या प्रकरणी पोलिसांना तपास करण्यासाठी उच्च न्यायालयाने निर्देश असूनही पोलीस तपासात हलगर्जीपणा करत आहेत. त्याविरोधात ७ ऑगस्ट पर्यंत तपास न झाल्यास ८ ऑगस्टपासून मंडळ पोलीस निरीक्षक कार्यालयासमोर …

Read More »

कर्नाटक मंत्रिमंडळ विस्तारावर मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांची खर्गेंसोबत महत्त्वाची चर्चा; नव्या चेहऱ्यांना संधीची शक्यता

  बंगळूर : राज्याचे मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार आणि उपमुख्यमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांनी शनिवारी अखिल भारतीय काँग्रेस कमिटी (एआयसीसी) अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांची भेट घेऊन राज्य मंत्रिमंडळ विस्ताराबाबत महत्त्वपूर्ण चर्चा केली. गेल्या तीन दिवसांपासून खर्गे हे बंगळुरात वास्तव्यास आहेत. यापूर्वी मुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि केपीसीसी …

Read More »

माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन

  बेंगळुरू : माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांच्या पत्नी चेन्नम्मा देवेगौडा यांचे शनिवारी बेंगळुरूतील रुग्णालयात हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्या ८५ वर्षांच्या होत्या. चेन्नम्मा या काही दिवसांपासून श्वसनाच्या त्रासाने आजारी होत्या. प्रकृती खालावल्याने त्यांना बुधवारी सायंकाळी बेंगळुरूतील मणिपाल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अतिदक्षता विभागात (ICU) त्यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टरांच्या …

Read More »

सोनम वांगचुक यांना ताब्यात घेतल्याबद्दल निपाणीत तहसीलदारांना निवेदन

  निपाणी (वार्ता) : जेष्ठ पर्यावरणवादी नेते सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचूक यांनी जंतरमंतरवर उपोषण आरंभीले होते. २० दिवसाच्या आंदोलनानंतर त्यांना पोलीसांनी आपल्या ताब्यात घेतले. निट पेपरफुटी हे निमित्त होते. पण ह्या निमित्याने एकुणच भ्रष्ट व्यवस्थे विरोधात हे प्रतीकात्मक आंदोलन होते. या निमित्त्याने देशातुन पाठींबा मिळाला. मोठ्या संख्येत युवक, युवक सहभागी …

Read More »

रोटरी क्लबच्या माध्यमातून समाजकार्य करा

  विजय मांजरेकर ; निपाणी रोटरी क्लबचा पदग्रहण सोहळा निपाणी (वार्ता) : रोटरी क्लब हे सामाजिक कार्य करण्याचे माध्यम आहे. त्याद्वारे प्रत्येकाने समाजकार्याला वाहून घ्यावे. ‌ समाजकार्यासाठी विविध प्रकारच्या योजना राबवणे आवश्यक आहे. पूर परिस्थिती आणि इतर अडचणीच्या वेळी मदत करण्याचे ध्येय बाळगावे. नेहमी सकारात्मक भूमिका घेऊन समाजाला सहकार करावे. …

Read More »

हस्ताक्षर स्पर्धेमुळे भाषिक कौशल्यांचा विकास : एस. डी. वडराळे

  कुर्ली हायस्कूलमध्ये हस्ताक्षर स्पर्धा निपाणी (वार्ता) : डिजिटल युगात वाचन व लेखनाकडे दुर्लक्ष होत आहे. शालेय स्तरावर हस्ताक्षर स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, एकाग्रता, सौंदर्यदृष्टी आणि भाषिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होते असे मत एस. डी. वडराळे यांनी व्यक्त केले. कुर्ली येथीलएच. जे. सी. चीफ फाउंडेशन, कुर्ली व राज्य मराठी विकास …

Read More »

केनवडे पी. एम. श्री. केंद्रशाळेत इको क्लबतर्फे वृक्षसंवर्धनाचा जागर

    निपाणी (वार्ता) : केनवडे येथील पी.एम.श्री. केंद्रशाळेत इको क्लब अंतर्गत वृक्षारोपण, वाचन प्रेरणा आणि पर्यावरण जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विजयकुमार पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून माजी प्राचार्य जीवन साळोखे गट शिक्षणाधिकारी सारिका कासोटे, पर्यावरणप्रेमी शिक्षक व भूमी वात्सल्य सोशल फाउंडेशनचे संस्थापक नामदेवराव चौगुले उपस्थित होते. …

Read More »

नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन सुसंस्कारित पिढी घडविण्याचे डॉ. खंडके यांच्या आवाहन

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित अक्कोळ येथील पार्श्वमती विद्यालयात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासह चारित्र्य संवर्धनाच्या उद्देशाने नैतिक मूल्ये हेच विद्यार्थ्यांचे खरे धन या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रम पार पडला. प्रमुख मार्गदर्शक म्हणून निपाणीतील डॉ. ऐश्वर्या खांडके यांनी विद्यार्थ्यांना जीवनात यशस्वी होण्यासाठी नैतिक मूल्यांचे महत्त्व समजावून सांगितले.अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक डॉ. राकेश तावदारे …

Read More »

रासाई शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलला महाराष्ट्र शासनाकडून १५ लाखाचा निधी मंजूर

    निपाणी (वार्ता) : रासाई-शेंडूर येथील विद्यासागर हायस्कूलच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री धर्मादाय देणगी निधीमधून पंधरा लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. हा निधी संरक्षण भिंत, खेळाचे मैदान आणि वाचनालय उभारण्यासाठी मंजूर झाला आहे. त्यासाठी बोरगाव येथील अरिहंत बँकेचे अध्यक्ष अभिनंदन उर्फ बच्चू पाटील आणि सहकाररत्न उत्तम …

Read More »

निपाणी भागात भुईमुगाचे मोड वानरांकडून फस्त

  उपद्रव वाढल्यानेअनेक गावांतील शेतकरी हैराण निपाणी (वार्ता) : निपाणी शहर आणि ग्रामीण भागातील अनेक गावांत वानरांचा उपद्रव वाढला आहे. नुकत्याच उगवून आलेल्या भुईमुगाचे कोवळे मोड फस्त करत बसलेले वानरांचे कळप शिवारात दृष्टीला पडत आहेत. आधीच या खरीप हंगामात विविध समस्यांनी त्रस्त असलेले शेतकरी आता तोंडचा घास हिरवताना पाहून रडकुंडीला …

Read More »