Tuesday , June 2 2026
Breaking News

कर्नाटक

शिवरायांच्या पवित्र पादुकांचे उद्या निपाणीत आगमन

  निपाणी : पंढरपूरच्या आषाढी वारीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्य पादुकांचे किल्ले शिवनेरीवरून प्रस्थान झाले आहे. या सोहळ्याचे हे 9 वर्ष असून परंपराने 29 वे वर्षे चालू आहे निपाणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या दिव्या पादुकांचे श्रीविरूपाक्षलिंग समाधी मठाचे मठाधीश परमपूज्य प्राणलिंग स्वामीजी यांच्या प्रयत्नाने यावर्षी ही शिवभक्तांना शिवरायांच्या दिव्य पादुकांचे यावर्षीही …

Read More »

खानापूरचे नुतन बीईओ बजंत्री यांनी स्विकारला पदभार

  खानापूर : नविन शैक्षणिक वर्षाला प्रारंभ होताच खानापूरच्या बीईओ राजश्री कुडची यांची तडकाफडकी बदली झाल्याने त्यांच्या जागी बेळगांव शहराचे बीईओ रवी बजंत्री यांची नेमणूक होताच सोमवारी दि. ३ जुलै रोजी सायंकाळी तीन वाजता आपल्या कार्याचा पदभार स्विकारला. यावेळी खानापूर बीईओ कार्यालयाचे मॅनेजर प्रकाश होसमनी यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत …

Read More »

स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यम शाळेत गुरुपौर्णिमा साजरी

  खानापूर : खानापूर शहरातील श्री स्वामी विवेकानंद इंग्रजी माध्यमाच्या शाळेत सोमवारी गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी करण्यात आली. या वेळी पालकांना ही आमंत्रित करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांचे चरण स्पर्श करून व फुले वाहून आशीर्वाद घेतले. शिक्षक व शिक्षकेतर वर्गाला शाळेच्या परंपरेप्रमाणे गुरुदक्षिणा देण्यात आली. विद्यार्थी वर्गाने गुरुपौर्णिमा विषयावर भाषण …

Read More »

सिदनाळ सन्मती विद्यामंदिरमध्ये गुरु पौर्णिमेनिमित्त गुरुवंदना कार्यक्रम

  निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापीठ संचलित सिदनाळ येथील सन्मती विद्यामंदिरात गुरुपौर्णिमा निमित्त गुरुवंदना कार्यक्र साजरा करण्यात आला. अध्यक्षस्थानी महावीर कलाजे तर प्रमुख पाहुणे म्हणून संचालक राजगोंडा पाटील, आर. जे. खोत उपस्थित होते. मुख्याध्यापक एम. बी. कोल्हापुरे यांनी स्वागत केले. गुरुपौर्णिमेचे औचित्य साधून शिक्षकांचा पुष्प देऊन सन्मान करण्यात आला. अनुष्का …

Read More »

सभासदांच्या हितासाठी प्रयत्नशील!

  अभिनंदन पाटील; ‘अरिहंत’च्या निपाणी शाखेचा वर्धापन दिन निपाणी (वार्ता) : सर्वसामान्य शेतकरी छोटे उद्योजक आणि व्यवसायिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी सहकाररत्न रावसाहेब पाटील यांनी अरिहंत क्रेडिट सौहार्द संस्थेचे रोपटे लावले होते. त्याचे आता वटवृक्षात रूपांतर झाले आहे. संस्थेच्या माध्यमातून कर्जपुरवठा करण्यासह सर्वसामान्यांचे हित जोपासले आहे. याशिवाय अरिहंत उद्योग समूहाच्या माध्यमातून सुरू …

Read More »

कर तोडणी पाहण्यासाठी रामपूरमध्ये अभूतपूर्व गर्दी

  महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा; वरून राजाच्या हजेरीने दिलासा निपाणी (वार्ता) : रामपूर (ता. चिकोडी) येथे सोमवारी (ता.३) महाराष्ट्रीयन बेंदूर साजरा करण्यात आला. बैलांना दुपारपर्यंत सजवून संध्याकाळी त्यांची वाद्यांच्या गजरात उत्साहात मिरवणूक काढून बैलपोळा सण उत्साहात साजरा झाला. यावेळी गाव कामगार पाटील महेश पाटील यांच्या बैलजोडींना कर तोडण्याचा मान देण्यात आला …

Read More »

मराठी अंगणवाडी शिक्षिका अर्जासाठी प्रथम भाषा कन्नड विषयाची अट अन्यायकारक!

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यात अंगणवाडी शिक्षिका भरतीसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. खानापूर तालुका हा मराठी भाषिक तालुका असुन तालुक्यात ८० टक्के नागरीक मराठी भाषिक आहेत. तर केवळ २० टक्के नागरीक कन्नड भाषिक आहेत. अशा तालुक्यात जर अंगणवाडी शिक्षिका भरतीच्या वेळी सरकारने अर्जदाराना प्रथम भाषा १२५ मार्काचा कन्नड विषय …

Read More »

भीमापूरवाडीतील सुवर्णंग्रामचे कामे अर्धवट स्थितीत

  राजेंद्र वडर यांचा आरोप; अधिकारी, ठेकेदारांचे संगनमत निपाणी (वार्ता) : भीमापूरवाडी गावाला २०१६-१७ साली सुवर्णं ग्राम योजनेत निवड करून पाच कोटी रुपये मंजूर करण्यात आले. या कामामुळे गावाचा सर्वांगीण विकास होणार असे वाटत असताना संबंधित अधिकारी व ठेकेदार यांच्या संगणमताने कामात आर्थिक व्यवहार करून काम अपूर्ण करण्यात आले आहे, …

Read More »

विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत शिक्षकाची भूमिका महत्त्वाची

  उत्तम पाटील; कुर्ली येथे एस. एस. चौगुले यांचा सत्कार निपाणी (वार्ता) : आजचा विद्यार्थी व त्याची मानसिकता बदलली आहे. पालकांच्या वाढत्या अपेक्षा, बदलत चाललेले सामाजिक वातावरण मोबाईलचा अति वापर, यामुळे विद्यार्थी भरकटत चालला आहे. कुशाग्र बुद्धिमत्ता असली तरी विद्यार्थ्यांच्या क्रयशक्तीला चालना देण्याची गरज आहे. भविष्याचा वेध घेतांना प्रतिभावंत विद्यार्थी …

Read More »

मराठी प्रेरणा मंचच्यावतीने उद्या खानापुरात गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव

  खानापूर : खानापूर तालुक्यातील मराठी माध्यम शाळातील, दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा गौरव, बेळगाव येथील प्रेरणा मंचच्यावतीने मंगळवार दि. ४ जुलै रोजी दुपारी ३ वा. ताराराणी हायस्कूलच्या सभागृहात करण्यात येणार आहे. दहावीच्या परीक्षेत नेत्रदीपक यश मिळविलेल्या अनुक्रमे पहिल्या सात विद्यार्थ्यांना प्रथम क्रमांकासाठी १० हजार रुपये, द्वितीय क्रमांक ५ …

Read More »