Monday , December 8 2025
Breaking News

कर्नाटक

युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने भिवशी, लखणापुर, पडलीहाल, अक्कोळ, ममदापूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी मीडिया खजिनदार नेताजी पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, मराठी भाषा संस्कृती वाचविणे यासाठी युवा समिती शैक्षणिक साहित्य वाटप गेले चार वर्षे करत आहेत. मुलांनी मराठी …

Read More »

गर्लगुंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील त्यांच्याकडून “त्या” शेतकऱ्याला आर्थिक मदत!

  खानापूर : बेकवाड (तालुका खानापूर) येथील शेतकरी गुंजाप्पा विठ्ठल पाटील या शेतकऱ्याची बैलजोडी बुधवार दिनांक 16 जुलै रोजी बेकवाड येथील तलावामध्ये बुडून मरण पावली होती. त्यामुळे शेतकऱ्याचे लाखों रुपयांचे आर्थिक नुकसान झाले होते. याबाबत गर्लगूंजी ग्राम पंचायत सदस्य प्रसाद विठ्ठल पाटील यांनी बेकवाड या ठिकाणी श्री.गुंजाप्पा पाटील या शेतकऱ्यांच्या …

Read More »

खानापूर पोलिसांकडून चोरीच्या विविध घटनांचा तपास; १५ लाख किमतीचा मुद्देमाल हस्तगत…

  खानापूर : गेल्या काही महिन्यांपासून खानापूर परिसरात झालेल्या विविध चोरीच्या घटनांचा खानापूर पोलिसांनी यशस्वीपणे तपास लावला आहे. वेगवेगळ्या चार ठिकाणी झालेल्या चोरीच्या प्रकरणांचा पोलिसांनी तपास करत आरोपींकडून १४ लाख ९० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जप्त केलेला हा मुद्देमाल आणि आरोपींना न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. वरिष्ठ पोलीस …

Read More »

भाजपचे माजी मंत्री, आमदार प्रभु चौहान यांच्या मुलाविरुद्ध एफआयआर दाखल

  बिदर : लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक आणि नंतर बलात्कार केल्याच्या प्रकरणात भाजपचे माजी मंत्री, आमदार प्रभु चौहान यांचा मुलगा प्रतीक यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे. तरुणीने दिलेल्या तक्रारीनंतर प्रतीक चौहान यांच्याविरुद्ध बिदर महिला पोलिस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आला आहे. प्रतीक चौहान यांनी लग्नाचे आश्वासन देऊन फसवणूक केल्याचा …

Read More »

संविधानाची हत्या करण्याचा पंतप्रधान मोदींचा प्रयत्न

  मल्लिकार्जुन खर्गे; साधना मेळाव्यातून सिध्दरामय्यांचे शक्ती प्रदर्शन बंगळूर : काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर संविधानाचा ‘खून’ केल्याचा आरोप केला. देशातील जनता भाजप आणि आरएसएसला संविधानात बदल करू देणार नाही, असा विश्वस त्यांनी व्यक्त केला. ते शनिवारी (ता. १९) म्हैसूर येथे आयोजित साधना मेळाव्यात बोलत होते. …

Read More »

युवा समितीच्या वतीने शिरोली ता.खानापूर सी. आर. पी मधील विविध शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण

  खानापूर : खानापूर तालुक्यातील शिरोली विभाग सी. आर. पी मधील हेम्मडगा, जामगाव, डोंगरगाव, गवाळी, आबनाळी, पाली, कोंगळे, मेंडील, नेरसे, सायाचिमाळ, चापवाडा, हनबरवाडा, पास्तोली, शिरोली, शिरोलीवाडा, तेरेगाळी, मेंगिणहाळ, तिवोली या शाळांना शैक्षणिक साहित्याचे वितरण करण्यात आले. सदर कार्यक्रम शिरोली मराठी प्राथमिक शाळा येथे आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिरोली …

Read More »

कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती विभू बखरू शपथबद्ध

  राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी दिली मुख्य न्यायाधीशांना शपथ बेंगळुरू : न्यायमूर्ती विभू बखरू यांनी कर्नाटक उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली. माननीय राज्यपाल थावरचंद गेहलोत यांनी आज राजभवनातील ग्लास हाऊस येथे आयोजित समारंभात माननीय मुख्य न्यायाधीशांना पदाची शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, विधान परिषदेचे अध्यक्ष बसवराज होरट्टी, उपमुख्यमंत्री …

Read More »

केएसआरटीसी कर्मचाऱ्यांवर सहा महिन्यांसाठी ‘एस्मा’चा बडगा

  वाहतूक कर्मचाऱ्यांना सरकारकडून धक्का बंगळूर : गेल्या ३८ महिन्यांपासून भत्ता आणि पगारवाढ यासह विविध मागण्यांसाठी ५ ऑगस्टपासून बेमुदत संपावर जाण्याची योजना आखणाऱ्या वाहतूक कर्मचाऱ्यांना कामगार विभागाने निषेध करण्यापासून परावृत्त करण्यासाठी ‘एस्मा’ जारी केला आहे. पगारवाढीसह विविध मागण्यांसाठी बेमुदत संपावर जाण्याचा निर्णय घेतलेल्या परिवहन कर्मचाऱ्यांना राज्य सरकारने धक्का दिला आहे. …

Read More »

म. मं. ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालय खानापूर येथे निवडणूक संपन्न!

  खानापूर : भारत प्रजासत्ताक देश आहे, जिथे लोकशाहीला अनन्य साधारण महत्त्व आहे. लोकांनी निवडून दिलेले प्रतिनिधी लोकशाहीत कारभार चालवितात म्हणूच त्यांना लोकप्रतिनिधी असे संबोधन केले जाते. लोकशाहीत मतदाराला “राजा” असे आदराने म्हटले जाते, कारण मतदारच राजकारणाचा कर्ताकरविता असतो.. निवडणूक ही लोकप्रतिनिधींना निवडून देण्याची एक सुक्ष्म प्रक्रिया असते, ती प्रकिया …

Read More »

निपाणी परिसरात युवा समितीच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी तालुका यांच्या वतीने शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमाला जोर निपाणी तालुक्यातील उच्च प्राथमिक मराठी शाळा मांगूर, कून्नुर, कोगनोळी, दत्तवाडी, गजबरवडी, अडी, बेनाडी, बारवाड, काररदगा येथे युवा समिती निपाणी तालुका पदाधिकाऱ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती निपाणी अध्यक्ष श्री. अजित …

Read More »