Tuesday , December 16 2025
Breaking News

कर्नाटक

खानापूर-दारोळी, खानापूर-कबनाळी- मुघवडे बस सेवेची मागणी

खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुक्यातील दारोळी, कबनाळी, मुघवडे आदि गावाना बससेवा नाही आहे. त्यामुळे या गावच्या नागरिकांना तसेच विद्यार्थी वर्गाला खानापूरला ये-जा करणे खूप त्रासाचे झाले आहे. यासाठी दारोळी खानापूर अशी सकाळ संध्याकाळ बससेवा सुरू करावी. तसेच कबनाळी, मुघवडे खानापूर अशी बससेवा सकाळी ९ वाजता व संध्याकाळी ५ वाजता सुरू …

Read More »

कै. बाळाप्पा देसाई यांच्या स्मरणार्थ श्रीभुवराह नृसिंह लक्ष्मी नारायण मंदिराला देणगी

  खानापूर : हलशिवाडी येथील प्रतिष्ठित नागरिक कृष्णराव बाळासाहेब देसाई आणि त्यांचे बंधू श्री. मारुती देसाई (उद्योजक) कोल्हापूर, नारायण देसाई, प्रमिला पांडुरंग पाटील, सावंतवाडी, अरुंधती आबासाहेब दळवी (निवृत्त शिक्षिका) खानापूर यांनी आपले वडील कै. बाळाप्पा देसाई यांच्या स्मरणार्थ श्रीभुवराह नृसिंह लक्ष्मी नारायण मंदिराच्या रथ बांधणीसाठी 25 हजार रुपयांची रोख रक्कम …

Read More »

हबनहट्टी स्वयंभू मारूती देवस्थानात जेडीएस पक्षाचा महिला मेळावा संपन्न

  खानापूर (प्रतिनिधी) : खानापूर तालुका जेडीएस पक्षाचा जांबोटी विभाग महिला मेळावा हबनहट्टी येथील स्वयंभू मारूती देवस्थानाच्या परिसरात सोमवारी मोठ्या उत्साहात पार पडला. महिला मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी जेडीएसचे नेते व मलप्रभा साखर कारखान्याचे चेअरमन नासीर बागवान होते. यावेळी व्यासपीठावर जेडीएसचे जिल्हा उपाध्यक्ष लियाकत बिच्चणावर, तालुका ब्लॅक अध्यक्ष एम. एम. सावकार, बाळू पाटील, …

Read More »

अरिहंत दूध उत्पादक संघाकडून उच्चांकी लाभांश

उत्तम पाटील : सभासदांना लाभांश वाटप निपाणी (वार्ता) : दूध उत्पादक व शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन केलेल्या श्री अरिहंत दूध उत्पादक संघाकडून यावर्षी सभासदांना उच्चांकी बोनस दिल्याची माहिती संघाचे प्रमुख, युवा नेते उत्तम पाटील यांनी दिली. संघाच्या वतीने सभागृहात सभासदांना बोनस वितरण करण्यात आले. उत्तम पाटील यांनी, संघाकडून यावर्षी 2 …

Read More »

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना न्याय मिळावा

  डॉ. राजेश बनवन्ना : आम आदमी पक्षातर्फे तहसीलदार निवेदन निपाणी (वार्ता) : गेल्या ७५ वर्षापासून शेतकऱ्यांचे कोणतेही प्रश्न सोडवले गेलेले नाहीत. लालबहादूर शास्त्री यांनी शेतकऱ्यांना प्राधान्य देण्याचा प्रयत्न करून जय किसान जय जवान असा नारा दिला. पण त्याप्रमाणे कोणतेच काम झालेले नाही. शेतकरी हा अन्नदाता असून प्रत्येकाने त्यांच्या समस्या …

Read More »

राज्य स्तरीय उत्तम शिक्षक पुरस्काराने माणिक शिरगुप्पे सन्मानित

निपाणी (वार्ता) : बाहुबली विद्यापिठ बाहुबली संचलित तवंदी येथील अरुण शामराव पाटील हायस्कूलमधील मुख्याध्यापक व क्रीडा शिक्षक माणिक शिरगुप्पे  यांना राज्यस्तरीय उत्तम पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. बंगळुरू येथील शिक्षण खात्याच्या आयुक्त कार्यालयामधील सभा भवनात शिक्षणमंत्री बी.सी. नागेश यांच्या हस्ते हा गौरव करण्यात आला. माणिक शिरगुप्पे यांनी आज पर्यंत क्रीडा शिक्षक …

Read More »

मणतुर्गा, रुमेवाडी, असोगा येथे खानापूर समितीची जनजागृती

खानापूर : महाराष्ट्र एकीकरण समिती खानापूर तालुका, मराठी आपला बाणा मराठी आपली संस्कृती, मराठी आमचे अस्तित्व मराठी आमची ओळख. ही ओळखच पुसण्याचे काम राष्ट्रीय पक्षांकडून सुरू असताना मेंढरासारखे तुम्ही-आम्ही स्वस्त बसून होणार आहे का? ६० वर्षे समितीचे एकहाती नेतृत्व मान्य करून तालुक्याची धुरा समितीच्या हाती सोपविणारे तुमचे आमचे आई-वडील, आजी-आजोबा …

Read More »

नंदगड ड्यॅमची दुर्दैवी अवस्था

खानापूर (प्रतिनिधी) : नंदगड (ता. खानापूर) गावाच्या पश्चिमेस असलेल्या धरणाची अवस्था फार बिकट झालेली आहे. सदर धरण हे माजी आ. कै. बसपान्ना आरगावी यांनी नंदगड गावाच्या शेतकऱ्याच्या शेतीसाठी पाण्याची व्यवस्था करण्यासाठी बांधले होते. या नंतर नंदगड धरणाचा आणि म्हणावा तसा गावाचा विकास झालेला नाही. आजपर्यंत कुठल्यापन लोकप्रतिनिधींनी धरणाचा विकासाबद्दल विचार …

Read More »

भिवशीत उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन

  विविध क्षेत्रातील गुणवंतांचा सत्कार : मान्यवरांची उपस्थिती निपाणी (वार्ता) : भिवशी येथे युवा नेते उत्तम पाटील युवाशक्ती संघटनेचे उद्घाटन व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्षांनी माजी आमदार प्रा. सुभाष जोशी होते. प्रारंभी भागाचे युवा नेते उत्तम पाटील, माजी आमदार प्रा. जोशी व मानवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन झाले. …

Read More »

ओला दुष्काळ जाहीर करून तात्काळ नुकसान भरपाई द्या

राजू पोवार : रयत संघटनेच्या कार्यकर्त्यांची बैठक निपाणी (वार्ता) : परतीच्या पावसाने चिकोडी तालुक्यांमध्ये थैमान घातलेले आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कपाशीसह सर्व पिकांचे प्रचंड नुकसान झाले. सोयाबीनला कोंब फुटले तर तंबाखू ऊस भुईसपाट झाला आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी प्रचंड नैराष्यात आहे. समोर दिवाळी सारखा सण असतांना शेतकरी आसमानी …

Read More »