Monday , July 27 2026
Breaking News

कर्नाटक

खानापूर मतदारसंघातून आम आदमी पक्षाचा उमेदवार विधानसभा निवडणुक लढवणार

  खानापूर (प्रतिनिधी) : येत्या १० मे रोजी होणाऱ्या कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीसाठी खानापूर मतदारसंघातून खानापूर तालुक्यातुन आम आदमी राष्ट्रीय पक्षाचा उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती खानापूर तालुका आम आदमी पक्षाचे सचीव शिवाजी गुंजीकर यांनी पक्षाच्या कार्यालयात बोलविलेल्या बैठकीत दिली. यावेळी बोलताना ते म्हणाले की, खानापूर मतदारसंघातून विधानसभा निवडणुकीसाठी भाजप, …

Read More »

उत्तम पाटील यांचा शक्ती प्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल

  कार्यकर्त्यांचा गर्दीचा उच्चांक : मतदार संघाच्या विकासासाठी रिंगणात निपाणी : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवारपासून (ता.१२) अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. गुरुवारी (ता.१३) सकाळी बोरगाव पिकेपीएसचे अध्यक्ष उत्तम पाटील यांनी आपल्या हजारो कार्यकर्त्यांसह येथील शासकीय विश्रामगृहावर आपला उमेदवारी अर्ज निवडणूक अधिकारी जी. एन. मंजुनाथ यांच्याकडे दाखल केला. यावेळी कार्यकर्त्यांचा …

Read More »

वन्य प्राण्यांची शिंगे, कातडी विकणाऱ्याला अटक

  शिंदगी : सांबरची शिंगे, हरीण, अस्वल प्राण्यांची कातडी आणि अन्य अवयव विकणाऱ्या व्यक्तीला सीआयडीच्या वन पथकाने अटक केली. विजापूर जिल्ह्यातील शिंदगी तालुक्यातील अलगुर गावातील बस स्थानकाजवळ एक व्यक्ती वन्य प्राण्यांची शिंगे, कातडी विकत असल्याची माहिती मिळाली. पीएसआय रोहिणी पाटील आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सदर व्यक्तीला अटक करून कातडी, शिंगे आणि …

Read More »

भाजपच्या पहिल्या यादी विरुध्द मोठा असंतोष

  अनेकांचा बंडखोरीचा इशारा, बंडखोरी टाळण्यासाठी शर्थीचे प्रयत्न बंगळूर : विधानसभा निवडणुकीसाठी भाजपच्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर होताच बंडखोरीचा धुमाकूळ उठला आणि असंतोषाचा स्फोट झाला. भाजपचे तिकीट इच्छुक अनेक मतदारसंघात बंडखोरी करण्यासाठी पुढे सरसावले असून बंडखोरी शांत करण्यासाठी भाजप नेत्यांनी कंबर कसली आहे. उमेदवारांची यादी जाहीर झाल्यानंतर भाजपचे माजी उपमुख्यमंत्री …

Read More »

पंजाब येथे गोळीबारात बेनाडीचा जवान शहीद

आज मूळगावी अंत्यसंस्कार; गावावर शोककळा निपाणी/(वार्ता) : पंजाब (भटिंडा) येथे लष्करी छावणी परिसरात झालेल्या गोळीबारात बेनाडी (ता. निपाणी) येथील सागर आप्पासाहेब बन्ने (वय 25) हा जवान शहीद झाला. दरम्यान याची माहिती मिळताच गावावर शोककळा पसरली आहे. दरम्यान शहीद जवान सागर बन्ने याच्यावर आज गुरुवार दि.13 रोजी मूळगावी शासकीय इतमामात अंत्यसंस्कार …

Read More »

ज्येष्ठ नागरिक संघातर्फे अर्जुननगरमध्ये महिला मेळाव्यासह व्याख्यान

  निपाणी (वार्ता) : अर्जुननगर येथील ज्येष्ठ नागरिक सेवा संघातर्फे परिसरातील महिलांसाठी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले.  अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष रघुनाथ घोरपडे तर प्रमुख पाहुणे म्हणून गडहिंग्लज येथील प्रा. रामकुमार सावंत उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष दादासाहेब पाटील यांनी स्वागत केले.  प्रा. रामकुमार सावंत यांनी, सावित्रीबाई फुलेंना ज्योतिबा फुलेनी शिकवून पुण्यात भिडे …

Read More »

आंतरराष्ट्रीय पुरस्काराने सुनील दळवी सन्मानित

निपाणी (वार्ता) : गोवा हरमल पंचक्रोशी शिक्षण मंडळ, बेळगाव येथील इंटिग्रेटेड सोशल वेल्फेयर सोसायटी (रजि.)  व नॅशनल रूरल डेव्हलपमेंट फाउंडेशन तर्फे राष्ट्रीय पुरस्कार सोहळा गोवा येथे पार पडला. त्यामध्ये येथील धर्मवीर संभाजीराजे नगरातील सुनील दळवी यांच्या कलाकृतीची दखल घेऊन  त्यांना आंतरराष्ट्रीय पातळीवरील उत्कृष्ट कलाकार गौरव पुरस्कार देऊन मान्यवरांच्या हस्ते सन्मानित …

Read More »

खानापूरात २२ मे रोजी पारंपरिक पद्धतीने चित्ररथ शिवजयंती मिरवणूक

  खानापूर (प्रतिनिधी) : यंदा २२ एप्रिल रोजी होणाऱ्या शिवजयंतीला पारंपरिक पद्धतीने चित्ररथ मिरवणुकीला निवडणूक आचारसंहिता लागू होत असल्याने यंदाच्या शिवजयंतीला आचारसंहितेमुळे मर्यादा येणार आहेत. त्यामुळे खानापूरातील चित्ररथ मिरवणुकीला सोमवारी दि. २२ मे ही तारीख सोयीची होणार आहे, असे मत युवा नेते पंडित ओगले यांनी मंगळवारी दि. ११ एप्रिल रोजी …

Read More »

खानापूरात जनता पार्टी कर्नाटक पक्षाचे उमेदवार शंकर कुरूमकर

  खानापूर (प्रतिनिधी) : कर्नाटक राज्य विधानसभा निवडणुकीत खानापूर मतदारसंघातून जनता पार्टी कर्नाटक पक्षातून गंगवाळी (ता. खानापूर) गावचे सुपुत्र शंकर कुरूमकर यांना उमेदवारी जाहीर झाल्याची माहिती पक्षाचे प्रधान कार्यदर्शी नागेश यांनी खानापूरात पार पडलेल्या पत्रकार परिषदेत दिली. यावेळी बोलताना उमेदवार शंकर कुरूमकर म्हणाले की, खानापूर तालुक्यात इतर पक्षा प्रमाणेच जनता …

Read More »

जगदीश शेट्टरांना इतराना संधी देण्याचा दिल्लीहून फोन

  शेट्टर संतप्त, माघार घेणार नसल्याचे संकेत बंगळूर : भारतीय जनता पक्षाने (भाजप) कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टर यांना नवोदितांसाठी मार्ग काढण्याची सूचना केली असली तरी, शेट्टर यांनी आपण विधानसभा निवडणूक लढवू आणि कोणत्याही स्थितीत सुमारे २५ हजार मतांच्या मोठ्या फरकाने विजयी होऊ असे सांगून पक्ष श्रेष्ठींचा आदेश झिडकारण्याचे स्पष्ट …

Read More »