Sunday , December 7 2025
Breaking News

कर्नाटक

ज्योती शटवाजी- पाटील यांचे सीए परीक्षेत यश

  खानापूर : नुकताच झालेल्या सीए परीक्षेमध्ये ज्योती संभाजी शटवाजी- पाटील हिने घवघवीत यश मिळवले आहे. त्याबद्दल तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मूळचे कुणकीकोप तालुका खानापूर येथील व सध्या विनायक नगर पिरनवाडी येथे वास्तव्य असणारे संभाजी पाटील यांची कन्या असून ती बालपणापासून एक हुशार विद्यार्थीनी म्हणून ओळखली जात होती. तिचे …

Read More »

केंद्रीय मंत्र्यांसोबत सिंचन प्रकल्पांवर शिवकुमारांची चर्चा

  वरिष्ठ अधिकारी, वकिलांसोबत दिल्लीत महत्त्वाची बैठक बंगळूर : केंद्रीय वन आणि पर्यावरण मंत्री भूपेंद्र पाटील यांच्याशी झालेल्या बैठकीनंतर, उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी राज्यातील सिंचन प्रकल्पांबाबत दिल्लीत वरिष्ठ अधिकारी आणि वकिलांसह एक महत्त्वाची बैठक घेतली. या बैठकीला कृषी मंत्री चेलुवरयस्वामी, सरकारचे अतिरिक्त मुख्य सचिव गौरव गुप्ता यांच्यासह वरिष्ठ अधिकारी, वकील …

Read More »

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री दिल्ली दौऱ्यावर राजकीय वर्तुळात औत्सुक्य

    बंगळूर : मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्या दिल्ली दौऱ्यामुळे काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांसोबतच्या बैठका आणि चर्चांना उधाण आले आहे. परदेश दौऱ्यावरून परतलेल्या राहुल गांधींसोबतच्या या दोन्ही नेत्यांच्या भेटींना राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. राज्यातील काँग्रेस सरकारच्या कारभारावर नाराज असलेल्या आमदारांना शांत करण्यासाठी प्रदेश काँग्रेस प्रभारी सुरजेवाला …

Read More »

महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत शैक्षणिक साहित्य वाटप…

  निपाणी : महाराष्ट्र एकीकरण युवा समिती निपाणी यांच्या शैक्षणिक उपक्रमांतर्गत निपाणी परिसरातील उच्च प्राथमिक मराठी शाळा इयत्ता पहिलीच्या वर्गामध्ये मातृभाषेतून प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. उच्च प्राथमिक मराठी मुला- मुलींची शाळा जत्राट व नागनूर येथे शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी निपाणी तालुका महाराष्ट्र एकीकरण समिती …

Read More »

यादगिरीत दूषित पाणी पिल्याने तिघांचा मृत्यू

  सहा जणांची प्रकृती गंभीर बंगळूर : यादगिरी जिल्ह्यातील सुरपुर तालुक्यातील तिप्पनतागी गावात दूषित पाणी पिऊन तीन जणांचा मृत्यू झाला. ६ जणांची प्रकृती गंभीर आहे. मृतांची ओळख देविकेम्माहोट्टी (वय ४८), वेंकम्मा (वय ६०) आणि रामण्णा पुजारी (वय ५०) अशी आहे. १० दिवसांपूर्वी दूषित पाणी पिऊन उलट्या आणि जुलाब झाल्याने तिप्पनतागी …

Read More »

दुसऱ्या टप्प्यात पहिल्या दिवशी बेळगाव, गुलबर्ग्याच्या आमदारांशी चर्चा; सुरजेवाला यांनी जाणून घेतल्या तक्रारी

  जाहीर वक्तव्य न करण्याची ताकीद बंगळूर : राज्य सरकारवर नाराज असलेल्या कॉंग्रेस आमदारांना शांत करण्यासाठी दुसऱ्या फेरीच्या चर्चेला प्रदेश काँग्रेस प्रभारी रणदीप सिंग सुरजेवाला यांनी आज सुरवात केली. पहिल्या टप्यात बेळगाव आणि गुलबर्गा काँग्रेस आमदारांची स्वतंत्र बैठक घेतली आणि त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या. कोणत्याही आमदाराने पक्ष अडचणीत येईल असे …

Read More »

बेळगावसह १० महानगरपालिकांनी दिली बंदची हाक; संपाचा निर्णय

  बेंगळुरू : राज्यातील १० महानगरपालिकांनी विविध मागण्या पूर्ण करण्याच्या मागणीसाठी बंदची हाक दिली आहे आणि संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील १० महानगरपालिका ८ जुलै रोजी पूर्ण दिवस बंद पाळतील आणि महानगरपालिकांचे कर्मचारी सामूहिक रजा घेऊन निषेध करतील. बेळगाव महानगरपालिका आणि बीबीएमपीसह राज्यातील १० महानगरपालिकांचे कर्मचारी विविध मागण्या पूर्ण …

Read More »

भाजप नेते प्रवीण नेत्तारू हत्या प्रकरण: फरार आरोपीला अटक

  बंगळूर : भाजप युवा मोर्चा सदस्य प्रवीण नेत्तारू यांच्या हत्येचा तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) शुक्रवारी गेल्या दोन वर्षांपासून फरार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली. एनआयएच्या पथकाने कतारहून आलेल्या आरोपी अब्दुल रहमानला आज कन्नूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर ताब्यात घेतले आहे. प्रवीण नेत्तारूच्या हत्येप्रकरणी एनआयएने आधीच २१ आरोपींना अटक केली …

Read More »

फौजदारी मानहानीचा खटला : शिवकुमारविरुद्धच्या खटल्याला उच्च न्यायालयाने दिली स्थगिती

  बंगळूर : उच्च न्यायालयाने शुक्रवारी भाजपच्या नेतृत्वाखालील सरकारच्या काळात ‘भ्रष्टाचार दर यादी’च्या नावाखाली जाहिरात प्रकाशित केल्याच्या आरोपाखाली उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्याविरुद्ध राज्य भाजप शाखेने दाखल केलेल्या फौजदारी मानहानीच्या खटल्याच्या सुनावणीला स्थगिती दिली. या प्रकरणातील सह-आरोपी कर्नाटक प्रदेश काँग्रेस समिती (केपीसीसी) लाही न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला. भाजप विधान परिषदेचे …

Read More »

खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर समितीतर्फे निषेध

  मराठी भाषिक संतप्त खानापूर : सीमाप्रश्न संपला आहे असे वादग्रस्त विधान करणाऱ्या खासदार इराण्णा कडाडी यांचा खानापूर तालुका म. ए. समितीच्या वतीने तीव्र निषेध केला आहे. यावेळी झालेल्या बैठकीत माजी आमदार दिगंबर पाटील आणि समितीचे अध्यक्ष गोपाळ देसाई यांनी सदर विधानाचा तीव्र शब्दात निषेध केला असून असे वक्तव्य मराठी …

Read More »